खजाना भविष्य
बुधवार दि. 28 जानेवारी ते मंगळवार दि. 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत
मेष
छोट्या छोट्या गोष्टींवर राग येण्याचा संभव आहे. चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण रागावर संयम ठेवावा. क्रोधाने दुसऱ्याचे आणि स्वत:चे मानसिक स्वास्थ्य बिघडते. संततीकडे लक्ष द्या. परीक्षेचे दिवस आहेत. त्यांच्या अभ्यासात आपल्या मार्गदर्शनाची गरज लागण्याची शक्यता आहे.
उपाय : मारुतीची उपासना करा.
वृषभ
घरातील मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. नोकरीत असाल, तर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पण नोकर-चाकरावर अति विश्वास ठेवू नका. कर्ज प्राप्तीसाठी धडपड करीत असाल, तर कदाचित या आठवड्यात आपले काम होईल, असे वाटते. भावंडांच्या सहवासाचे सुख या आठवड्यात लाभण्याची शक्यता आहे.
उपाय : महालक्ष्मीची आराधना करा.
मिथुन
विवाहेच्छुचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. किंवा प्रेमीजनांना त्यांच्या घरातून विवाहास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. काही दैनंदिन व्यवसाय असेल, तर व्यवसायवृद्धी होण्याची शक्यता आहे. आपली कोणती वस्तू हरवली असेल किंवा अनवधानाने कुठेतरी ठेवली असेल, तर मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : घरात तुटक्या-फुटक्या वस्तू ठेवू नका.
कर्क
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विशेषत: सासुरवाडीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण कशाची न कशाची तरी चिंता वाटत राहील. पण चिंता करू नका. आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर आलेल्या अडचणींवर नक्कीच मात कराल. सरकारी योजनेतून लाभ संभवतो.
उपाय : सोमवारी महादेवावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
सिंह
या आठवड्यात तुम्ही काही धार्मिक कार्यात गुंतण्याची शक्यता आहे. कदाचित त्यामुळे काही तीर्थस्थळी प्रवासही होण्याची शक्यता आहे. आपल्याला मनापासून या संसारापासून अलिप्त राहावेसे वाटण्याचा संभव आहे. पण यासाठी बुवाबाजीच्या फंदात पडू नका. ती सर्व प्रलोभने आहेत.
उपाय : हनुमान चालिसाचा पाठ करा.
कन्या
या आठवड्यात आपल्या कामाच्या ठिकाणी आपले कौतुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच आपला मान मरातब वाढण्याचा संभव आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलात, तर आपली नक्की प्रगती होण्याची शक्यता आहे. कदाचित थोडा वेळ लागेल. पण फळ नक्की मिळेल.
उपाय : शुक्रवारी तिन्हीसांजेला महालक्ष्मीला लाल गुलाब वाहा.
तुळ
या आठवड्यात आपल्याला हाती घेतलेल्या कुठल्याही कामात यशच मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील. त्यातून काही फायदा मिळण्याचा संभव आहे. वडील भावंडांची, इतर नातेवाईकांची, मित्रपरिवाराची कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भेट होईल. त्यातून तुमच्या प्रगतीच्या संधी मिळतील. संधीचा फायदा घ्या.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
वृश्चिक
परदेशातून फायदा संभवतो. कदाचित नोकरीसाठी परदेशी जाल अथवा परदेशी मालाच्या आयात निर्यातीचा व्यवसाय करण्याची संधी मिळेल. पण यामध्ये पाऊल टाकताना चोहोबाजूंनी विचार करून पाऊल टाका. नोकरीचे ठिकाण योग्य आहे की नाही, अथवा ज्या व्यक्तीसोबत व्यवहार करायचा ती विश्वासू आहे की नाही, हे पहा. प्रलोभने टाळा.
उपाय : शिवाची आराधना करा.
धनु
मन थोडे चंचल, अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना अडचणी येण्याचा संभव आहे. द्विधा मन:स्थिती होईल. पण मनाला सांभाळा. शांतपणाने विचार करून निर्णय घ्या. मुलांचा कुठला तरी लांबचा प्रवास घडेल. आपली आई जर कुठल्या सामाजिक कार्यात कार्यरत असतील, तर त्यांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.
मकर
कौटुंबिक समस्यांना थोडेफार सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून आपल्याला सहकार्य मिळेल. पण आपल्या वाणीवर थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. काही देण्याघेण्याचा व्यवहार करायचा असेल, तर सांभाळून करा. आपले काही नुकसान तर होत नाही ना याचा विचार करा. डोळ्यांना सांभाळा.
उपाय : गुरुवारी गाईला गूळ-चपाती खाऊ घाला.
कुंभ
नोकरीत असाल, तर आपल्या कामावर वरिष्ठ खूश होतील. आपले काम सर्वांना खूपच आवडेल. पण त्याचे फळ मिळण्यास थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. आपल्याला काही लेखन करावेसे वाटले, तर खुशाल करा. त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या शेजाऱ्यांशी आपली चांगली गट्टी होण्याची शक्यता आहे.
उपाय : शनिवारी शनिचे दर्शन घ्या.
मीन
आपल्याला थोडे आध्यात्मिक ज्ञान मिळवावेसे वाटण्याची शक्यता आहे. काही वाईट नाही. त्यातून नुकसान न होता आत्मोन्नतीच होईल. नवीन घर बांधणे किंवा घेणे याचा विचार करत असाल, तर तो विचार तूर्तास थांबवा. घराची स्वप्ने पूर्ण होतील. पण थोड्या उशिराने होईल. हा आठवडा ठीक जाईल, असे दिसते.
उपाय : शनिवारी काळे उडीद, तेल शनिला वाहा.