For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:05 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

बुधवार दि. 31 डिसेंबर 2025 ते मंगळवार दि. 6 जानेवारी 2026 पर्यंत

Advertisement

मेष

परदेशी व्यवहारातून आपल्याला लाभ संभवतो अथवा नोकरीतून आपल्याला परदेशी जायला मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतील हाताखालील लोकांची चांगली मदत मिळेल. भावंडांचा सुखाचा सहवास मिळेल. आपल्या आईचा छोटा प्रवास घडवून आणाल. तिच्या भावंडांची तिला भेट होण्याची देखील शक्यता आहे.

Advertisement

उपाय : रोज दशरथकृत शनिस्तोत्र सूर्यास्तानंतर वाचा.

वृषभ

तुम्ही दैनंदिन व्यवसाय करीत असाल तर त्यात वृद्धी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. त्याच्या सल्ल्यानुसार व्यवसायात बदल केलात, तर आपण फायदेशीर ठराल. तुमची एखादी हरवलेली अथवा इथे तिथे ठेवून विसरून गेलेली वस्तू मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : शुक्रवारी तिन्हीसांजेला महालक्ष्मी पूजन करा.

मिथुन

सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता जास्त आहे किंवा पैत्रुक संपत्तीचा लाभ मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. पण तो लाभ मिळविताना वाणीवर म्हणजेच बोलण्यावर अतिशय संयम राखणे गरजेचे आहे. नाही तर ‘बनता बनता काम बिगड जाएगा’ अशी परिस्थिती होईल.

उपाय : कपाळावर केशरी गंध लावा.

कर्क

या आठवड्यात भाग्य आपल्याला अनुकूल आहे, असे दिसते. पण आळशीपणा सोडला, तर भाग्य आपल्याला साथ देईल. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कदाचित तीर्थयात्रा घडेल. संतांचा सहवास मिळण्याचीही शक्यता आहे. काही धर्मकार्य किंवा दानधर्म आपल्या हातून संभवतो.

उपाय : जनावरांना खाऊ घाला.

सिंह

वडील अथवा वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा व त्यांचे आशीर्वाद घ्या. उद्योगात बरकत येण्याची शक्यता आहे. मानमरातब, उच्च पद प्राप्तीदेखील मिळण्याची शक्यता आहे. पण प्रलोभनाला अगर कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका.

उपाय : रोज गणपती अथर्वशीर्ष पठण करा.

कन्या

हा आठवडा आपला खूप छान जाईल, असे दिसते. या आठवड्यात सभा-समारंभात आपण सहभागी होण्याची शक्यता आहे. जो समारंभ आपल्याला आनंद देऊन जाईल. वडील भावंडांच्या, मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होतील. काही मौल्यवान वस्तुंची देवाणघेवाण संभवते.

उपाय : सोमवारी शंकराला अभिषेक करून पांढरे तिळ व तांदूळ वाहा.

तुळ

आपल्याला परदेशगमनाचा योग दिसतो. कदाचित नोकरीत उच्च पद प्राप्ती मिळून परदेशी जाण्याचा संभव आहे. या आठवड्यात आपल्या हातून खर्चही बराच होईल. पण अपव्यय होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही चांगल्या गोष्टीसाठीच खर्च होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला खूपच छान जाईल.

उपाय : रोज महालक्ष्मीला लाल गुलाब वाहा.

वृश्चिक

मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. खचून जाऊ नका. रात्र संपतेच. दिवस उजाडतोच. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपल्या कामामुळे आपल्याला नावलौकिक मिळेल. आपल्या संततीचे भाग्य उजळेल. आपल्याकडे जर एखादा पाळीव प्राणी असेल, तर कदाचित त्याचा वियोग संभवतो.

उपाय : मंगळवारी बजरंग बाण म्हणा.

धनु

कुटुंबात वादग्रस्त प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. सांभाळून रहा. पैतृक संपत्तीसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही वाणीवर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काही अंश मिळेल. शांत रहा. शक्तीपेक्षा युक्ती वापरा. सामंजस्य व समाधान अंगी बाणा.

उपाय : दत्तगुरुंचे नामस्मरण करा.

मकर

या आठवड्यात लहान भावंडांच्या सहवासाचे सुख आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. कदाचित या सर्वांबरोबर एका छोट्या सहलीचा आनंदही लुटाल. या सहलीचे आयोजन तुमच्याकडून अतिशय छान तऱ्हेने होईल आणि तुमच्या या संयोजनाचे खूप कौतुक होण्याची शक्यता आहे. आनंदी रहा.

उपाय : रोज तुळशीला पाणी घाला.

कुंभ

आईच्या तब्येतीची काळजी घ्या. परदेशातून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण जरा सांभाळून व्यवहार करा. प्रलोभनाला बळी पडू नका. जमीन खरेदीचा व्यवहार करत असाल, तर कागदपत्रांची चाचणी जाणकारांकडून करून घेऊनच पुढे पाऊल टाका. वाहन जपून चालवा. सांभाळा.

उपाय : शिव आराधना करा.

मीन

या आठवड्यात आपण जरा सांभाळूनच रहावे. काही कामाचा ताण आपल्यावर पडण्याची शक्यता आहे. आपल्या तब्येतीला सांभाळून कामाचे नियोजन करण्याची गरज आहे. सध्या फार काम अंगावर ओढवून घेऊ नका. मुलांच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यावे लागणार आहे. तेव्हा सांभाळा.

उपाय : शनिवारी शनिला काळी उडीद व तेल वाहा.

Advertisement
Tags :

.