राशिभविष्य खजाना
मेष
परदेशगमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे, संधीचा फायदा घ्या. अर्थातच त्यासाठी खर्च करावा लागणार आणि तो चालेल. पण फालतू आणि अवास्तव खर्च शक्यतो टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुमची एखादी हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू या आठवड्यात सापडण्याची शक्यता आहे.
उपाय : शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल वाहा.
वृषभ
आपला काही छोटेखानी व्यवसाय असेल, विशेषत: सौंदर्य प्रसाधने, अलंकार वगैरे तर त्यात चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदाराकडूनही चांगलाच फायदा संभवतो. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्यता आहे. जोडीदार हुशार व छान मिळेल. हा आठवडा छान जाईल, असे दिसते.
उपाय : शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करा.
मिथुन
अचानक धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून काही चर्चा चालू असेल तर ती आपल्या बाजूने होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी कोणताही आततायीपणा करू नका. शांतपणाने समजुतीने घ्या. कदाचित सरकारी धोरणातूनही लाभ आपल्याला मिळू शकतो.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
कर्क
छोटा मोठा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कदाचित काही धार्मिक स्थळी भेट देऊन याल किंवा नदी-समुद्र किनारी सहल होईल. घरातील वृद्ध मंडळींचा सहवास लाभेल. त्यात तुमचे मन छान रमून जाईल. या आठवड्यात काही दानधर्म कराल. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
उपाय : कपाळी केशरी गंध लावून बाहेर पडा.
सिंह
या आठवड्यात आपल्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नती होण्याचा संभव आहे. व्यवसायात असाल तर व्यवसायवृद्धी होण्याचा संभव आहे. मानसन्मान, प्रतिष्ठा मिळेल. समाजात आपली मान उंचावली जाईल, असे काहीतरी तुमच्या हातून घडेल. पण ‘ग’ची बाधा होऊ देऊ नका.
उपाय : शंकराची आराधना करा.
कन्या
काही राजकीय समारंभात अगर घरगुती समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. काही उंची भेटवस्तू मिळतील. मंडळीमध्ये छान वेळ जाईल. नातेवाईक भावंडे यांच्याही भेटीगाठी होतील. समाजात मान, मरातब, प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा छान जाईल.
उपाय : रोज तुळशीला पाणी घाला.
तुळ
परदेशगमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे किंवा परदेशातून आर्थिक लाभ संभवतो. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. पण ती संधी स्वीकारताना चोहोबाजूंनी विचार करून पाऊल उचला. या आठवड्यात आईसाठी छोट्या तीर्थयात्रेचे आयोजन कराल. तुमच्या हातून सत्संगाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
उपाय : गायीची पूजा करा.
वृश्चिक
मन थोडे अस्थिर व चंचल होण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टीने मन हळवे होण्याचा संभव आहे. म्हणून या आठवड्यात मनाला ताब्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्यातरी कलेकडे मन आकर्षित होण्याची किंवा स्वत: नीटनेटके व सुंदर दिसण्यासाठी अगर ठेवण्यासाठी धडपड कराल.
उपाय : हनुमान चालिसाचा मंगळवारी पाठ करा.
धनु
कौटुंबिक सुख या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहवासात वेळ छान जाईल. पण वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. आपण काय बोलतो, ते सहजच असले तरी विचार करा. सहज म्हणून बोललेले शब्द समोरच्या माणसाला मनाला लागणार नाहीत ना याचा विचार करा.
उपाय : गुरुवारी दत्ताचे कुठलेही एक स्तोत्र म्हणा.
मकर
आपल्या हातून काहीतरी चांगले लिखाण होण्याची शक्यता आहे आणि त्या लिखाणाच्या पद्धतीची व हस्ताक्षराची खूपच प्रसंशा केली जाईल. भावंडाबरोबर छोट्याशा रेल्वे प्रवासाला जाल. त्याचेही आयोजन तुमच्याकडून खूप छान केले जाईल. फक्त कानांना जपा. थंडीचे दिवस आहेत.
उपाय : शनिवारी सूर्यास्तानंतर शनिस्तोत्र वाचा.
कुंभ
आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. घर, वाहन किंवा जमीन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तूर्तास विचार स्थगित ठेवा. कारण व्यवहार करताना कदाचित फसवले जाण्याची शक्यता आहे. काही नवीन ज्ञान आत्मसात करण्यास धडपडत असाल तर थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
उपाय : मंगळवारी बजरंग बाण म्हणा.
मीन
मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांची प्रगती समाधानकारक असेल. तुम्ही स्वत: विद्यार्थी असाल तर कष्ट केलेच पाहिजे त्याला पर्याय नाही. कष्टाचे फळ मिळतेच. पण भूलथापांना मात्र बळी पडू नका. अभ्यासाव्यतिरिक्त अथवा अभ्यासात चंचलता येण्यासाठी अनेक प्रलोभने येतील, सांभाळा.
उपाय : शनिवारी शनीला तेल वाहा.