राशिभविष्य खजाना
बुधवार दि. 28 मे ते 3 जून 2025 पर्यंत
गुरु बदल 2025 : गुरुबळ-बाशिंगबळ बाबा लगीन!
ज्योतिषांच्या रोजच्या दिनक्रमात 90 टक्के प्रश्न हे विवाहाच्या संदर्भातच असतात. अगदी नवीन जन्मलेल्या बाळाच्या कुंडली करण्याच्या वेळीसुद्धा ‘याच्या लग्नाचे कसे काय?’ असा प्रश्न हमखास विचारताना पाहण्यात येतो. ‘मुलाला/मुलीला बाशिंगबळ आहे का पहा’, असे विचारायला लोक येतातच. पारंपरिक ज्योतिषशास्त्रात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. पराशरांपासून आधुनिक बी. व्ही. रामण यांच्यापर्यंत गुरु ग्रहाची महती सांगितली गेलेली आहे. पण याच ग्रंथांमध्ये गुरु ग्रहासंबंधीचे अनेक विरोधाभासदेखील दिसतात. उदाहरणार्थ सप्तमात गुरु असेल तर विवाह टिकत नाही. पण खरे सांगू का? हे पूर्णपणे सत्य नाही. हजारो कुंडल्यांचा सखोल अभ्यास केला तर सप्तमातला गुऊ चांगले फळ देताना दिसतो. मग असे का लिहिले असेल? तर ज्योतिषशास्त्रातला एक नियम आहे की, ‘कारको भाव नाशयते’. लग्नाचा-विवाहाचा कारक गुऊ हा सप्तम या विवाहाच्या स्थानात बसला तर त्या स्थानाची हानी होते हा त्यामागचा तर्क. पण हा तर्क केवळ धनु राशीच्या गुऊबद्दल लागू होताना दिसतो. आता मुख्य मुद्दा असा की, गुऊबळ किंवा बाशिंगबळ म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की, सारे ग्रह आपापल्या गतीने फिरत असतात. आकाशाला 12 सम भागात विभागले तर 12 राशी तयार होतात. म्हणजे हे ग्रह या राशींमधूनच आपल्या मार्गावरून पुढे जात असतात. (काही वेळा मागे जात असल्याचा भास होतो त्याला ‘वक्री’ असे म्हणतात.) अशावेळी गुऊ ग्रह तुमच्या राशीपासून कितवा आहे यावरून गुऊबळ-बाशिंगबळ ठरते. तुमच्या राशीपासून गुऊ जर दुसरा, पाचवा, सातवा, नववा किंवा अकरावा असेल तर तुम्हाला गुऊबळ आहे. चौथा, आठवा किंवा बारावा असेल तर गुऊबळ अजिबात नाही. विषय अजिबात किचकट नाही. सोबतच्या टेबलवरून सहज कळेल. कळीचा मुद्दा हा आहे की, गुऊबळ असूनदेखील विवाह ठरत नाही/होत नाही हे अनेक पत्रिकांच्या अभ्यासावरून कळते. काय कारण असावे बरे? याला आपण म्दहनहगहू ंग्as म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला जे सोयिस्कर वाटते तेच स्वीकारायचे! लक्षात घ्या, केवळ गुरुच नाही 9 च्या 9 ग्रह आपापले योगदान दिल्याशिवाय कोणतीही घटना घडत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर समजा एखाद्याचा रोडवर अपघात होणार आहे, तर त्याने अगोदर घराबाहेर तरी पडले पाहिजे. म्हणजे त्रितियेश अॅक्टिव्ह झाला पाहिजे. अपघात म्हणजे अष्टमेश अॅक्टिव्ह झाला पाहिजे. जर ऊग्णालयात हलवायचे झाले तर द्वादशेश अॅक्टिव्ह झाला पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की, केवळ गुरुने काहीही होत नाही! गोचरी चंद्र कोणत्याही पक्षात 1/3/6/7/10/11 आणि शुक्ल पक्षात 2/5/9 येत असल्यास मुहूर्त लाभतो. शुक्ल पक्षात चंद्र बलाला प्राधान्य दिले जाते व कृष्ण पक्षातील ताराबलाला प्राधान्य देतात. त्यानंतर गोचरी ग्रहांचे बलाबलही विचारात घेतात. जसे चंद्र राशीपासून रवी 3/6/10, मंगळ, शनी 3/6 बुध 2/4/6/8/10 शुक्र 1/2/3/4/5/8/9/12 या स्थानी असलेले सर्व ग्रह शुभ आणि एकादश स्थानी असलेले सर्व ग्रह शुभ, आपल्या चंद्र राशीपासून गुऊ 2/5/7/9/11 असता अॅक्टिव्ह होतो आणि विवाहास अनुकूलता प्राप्त होते. आता चंद्र रास महत्त्वाची की लग्न रास हा ज्याचा त्याचा प्रश्न!
आता जाता जाता :
13 जून 2025 ते 5 जुलै 2025 पर्यंत गुरु अस्त आहे. (म्हणजे सुर्याच्या जवळ असल्याने त्याच्या शुभत्वात कमी येते.) त्याचप्रमाणे 14 डिसेंबर 2025 ते 29 जानेवारीपर्यंत शुक्र अस्त आहे. त्यामुळे या काळात विवाहासाठी योग्य मुहूर्त नाहीत. गौण-म्हणजे दुय्यम दर्जाचे व आपत्कालीन मुहूर्त आहेत (म्हणजे विवाह कार्य करायचेच आहे, गत्यंतर नाही, अशावेळी योग्य विद्वान मुहूर्त शास्त्राRचा सल्ला घ्यावा.)
15 मे 2025 पासून 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत गुऊ मिथुन राशीमध्ये असेल : कर्क, तूळ, धनु, कुंभ राशींना उत्तम गुऊबळ/बाशिंगबळ. मिथुन, सिंह, वृश्चिक, मीन गुरू-सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून बळ प्राप्त. कन्या, मकर, वृषभ यांना गुरुबळ नाही.
19 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 गुरु कर्क राशीत असल्याने : सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना उत्तम गुऊबळ. कर्क, कन्या, धनु, मेष- सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून बळ प्राप्त. तूळ, कुंभ, मिथुन राशींना गुरुबळ नाही.
6 डिसेंबर 2025 ते वर्षाखेरपर्यंत गुऊ पुन्हा मिथुन राशीमध्ये असल्याने : कर्क, तूळ, धनु, कुंभ राशींना उत्तम गुरुबळ/बाशिंगबळ. मिथुन, सिंह, वृश्चिक, मीन गुरु-सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून बळ प्राप्त. कन्या, मकर, वृषभ यांना गुरु बळ नाही.
मेष
आरोग्याच्या समस्या दूर होतील पण निष्काळजीपणा करू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याचा विचार कराल. नोकरदार वर्गाला इन्क्रिमेंट किंवा प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. लाभ मिळवण्याकरता जास्त कष्ट करावे लागतील. मित्रांमध्ये वाद होण्याची शक्मयता आहे. विदेश प्रयाणाकरता प्रयत्न करत असाल तर अनुकूल काळ आहे.
उपाय : हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी.
वृषभ
धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. सहज पूर्ण होणारी कामे घडल्याने थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. वादावादीमुळे घरचे वातावरण बिघडू नये, याची काळजी घ्या. प्रवास शक्मयतो टाळा. नोकरदार वर्गाला अनेक संधी प्राप्त होतील ज्यामुळे आर्थिक बाजू सुधारेल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. शक्मयतो जोडीदाराचा सल्ला घ्या. छोट्यामोठ्या अपघातापासून सावध रहावे. लांबून चांगली बातमी कळेल.
उपाय : गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे.
मिथुन
नवचैतन्य आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण असा काळ आहे. याचा फायदा उचलायचा प्रयत्न करा. तब्येतीची विशेष तक्रार असणार नाही. धनागम सहजतेने होईल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवासात सावध रहावे. एखादी व्यक्ती फसवू शकते. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रांची नीट चाचणी करावी. वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. भाग्याची साथ आहे.
उपाय : शनिवारी पिंपळाला दूध घातलेले पाणी घालावे.
कर्क
प्रत्येक काम रेंगाळून पूर्ण होत आहे असे वाटत असेल तर कामाचा वेग वाढला तरच समाधान प्राप्त होईल. धार्मिक कारणाकरता प्रवास होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रॉपर्टीच्या कामात सावध राहिलेले बरे. या काळात मन करमणुकीच्या साधनांकडे जास्त असेल. प्रेमसंबंध सुधारतील. संततीविषयी चांगली घटना घडेल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचा जाच संभवतो. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे.
उपाय : केशराचा टिळा लावावा.
सिंह
येणाऱ्या काळात अनेक प्रकारे तब्येतीला सांभाळावी लागेल. लहान मोठे आजार त्रास देऊ शकतात. पैशाची आवक चांगली असेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील. प्रवासात नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. प्रॉपर्टीच्या कामात दुसऱ्याच्या मदतीने सफलता प्राप्त होईल. प्रेमींनी गैरसमज टाळले तरच नाते सुव्यवस्थित राहील. नोकरदार वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील.
उपाय : मूठभर तांदूळ पाण्यात सोडावे.
कन्या
स्वभाव करारी बनेल पण त्यात हट्टीपणा येऊ देऊ नका. कामे पूर्ण करण्याचा उत्साह वाढेल. आर्थिक स्रोत बळकट होईल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराची साथ असल्यामुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. आळस झटकून कामाला लागा. अचानक फायदा होण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. अपघातापासून सावध रहा.
उपाय : मंदिरात दूध दान द्यावे.
तूळ
मनात विविध नकारात्मक विचार आले किंवा नैराश्याचा सूर लागला तर त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. पुढे अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत, याची खात्री बाळगा. सरकारी कामे होतील. प्रवासाचे अनेक योग आहेत. रोजच्या जीवनात बदल म्हणूनसुद्धा प्रवास करू शकता. प्रॉपर्टीची कामे वेळाने का होईना पण पूर्ण होतील. तब्येतीला जपावे लागेल. नियमित आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
उपाय : हिरव्या वस्तूचे दान द्यावे.
वृश्चिक
तब्येतीची काळजी करण्याचे कारण नाही. फक्त टेन्शन घेणे टाळावे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. कामानिमित्त केलेल्या प्रवासात चांगले यश प्राप्त होईल. गुंतवणूक करत असताना सावध राहणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्मयता असेल. वैवाहिक जोडीदार मनासारखे वागेल. भागीदारीतून फायदा होईल.
उपाय : वडाच्या पानावर श्रीराम लिहून मारुतीला अर्पण करावे.
धनु
सगळ्या प्रकारच्या लाभाची शक्मयता आहे. लाभस्थानातील लक्ष्मी योग बऱ्याचशा इच्छा पूर्ण करेल. मोठ्या भावंडांकडून किंवा मित्रांकडून मदत मिळवून समस्या दूर होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त होण्याची शक्मयता आहे. तब्येत सुधारण्याकरिता प्रयत्न करावे. प्रवासातून फायदा होईल. प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरदार वर्गाने सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या घटनेचा त्रास होऊ शकतो.
उपाय : वाहत्या पाण्यात बत्तासे सोडावे.
मकर
जोडीदारामुळे बराचसा लाभ होण्याची शक्मयता आहे. व्यापारी वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. दुखणे अंगावर काढू नका. कागदपत्रे व्यवहारात मनासारखे यश मिळेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात अनपेक्षितरीत्या कलाटणी मिळून इच्छापूर्ती होईल. संततीकडून सुवार्ता कळू शकते. छोट्या गुंतवणुकीतून लाभ होईल. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. तीर्थयात्रा घडू शकते.
उपाय : बुधवारी गणेश पूजन करावे.
कुंभ
एक प्रकारचे धाडस येईल. पूर्वी येत असलेले टेन्शन दूर होईल. या काळात तुम्ही स्वत:कडे लक्ष द्यावे. अचानक धनलाभाचे योगही आहेत त्यामुळे अडकलेले पैसे वसूल करण्याचा प्रयत्न जरूर करावा. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार करत असताना जपावे लागेल. मानसन्मानात वृद्धी होईल. मित्रांची साथ मिळेल.
उपाय : धार्मिक ठिकाणी हळदीच्या गाठी दान द्याव्यात.
मीन
सप्ताहाचा मध्य हा विशेष लाभकारी ठरण्याची शक्मयता आहे. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता संधी मिळतील. स्वभावामध्ये एक प्रकारचा हट्टीपणा येण्याची शक्मयता आहे. दुसऱ्याने तुमच्यावर अधिकार गाजवलेला तुम्हाला चालणार नाही. संततीच्या दृष्टीने थोडी काळजी वाटू शकते. नोकरीपेशा लोकांना अनुकूल काळ आहे. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला अनुमोदन मिळेल.
उपाय : काळ्या गाईची सेवा करावी.