राशीभविष्य खजाना
बुधवार दि. 21 ते मंगळवार दि. 27 मे 2025 पर्यंत
दीडकी
7) तूळ : या राशींच्या लोकांना चांगलाच परिणाम मिळणार आहे. शुक्र राहूचा आवडता. दैत्यांचा गुरु. सतत क्रोधी असणाऱ्या राहूला ब्यालन्स्ड तूळ रास न आवडण्याचे कारणच नाही. आधीच रोम्यांटिक तूळवाल्या राशीच्या लोकांना प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील, पण त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, त्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. खासकरून पोटाच्या संबंधित विकारांपासून सावध रहावे. कोणताही आजार अंगावर काढू नये. लाल रंगाचा कमीत कमी वापर करावा. घालत असलेल्या घड्याळाची डायल केवळ पांढरी असावी याची काळजी घ्यावी. 8) वृश्चिक : या राशीच्या लोकांना त्यांच्या घरात आराम आणि भावनिक सुरक्षितता मिळेल. पण म्हणतात ना, ‘आराम हराम है!’ त्याप्रमाणे आळसाचे प्रमाण देखील तितकेच वाढणार आहे. कामाच्या उद्देशाच्या बाबतीत त्यांना यश मिळेल, पण त्यांना कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. दाम करी काम या म्हणीचा अर्थ तुम्हाला या काळातच कळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व्हावयास हवी हा आग्रह कसा सोडायचा, हे तुम्ही या काळात शिकाल. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणे गरजेचे असेल. पैशांच्या बाबतीत काही लोक तुम्हाला टोपी घालायचा प्रयत्न करतील. पण तुमच्या हुशारीने तुम्ही स्वत:चा बचाव कराल. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. 9) धनु : ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या सारख्या साक्षात्काराची सवय करून घ्या. आपले कोण आणि बाहेरचे कोण हे कळेल. या राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच, त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वादविवाद, भांडणे वाढतील. पण त्याचा फायदा इतर लोकांना घेऊ देऊ नका. विशेष करून ज्यांचे विवाह हल्ली हल्ली झाले आहेत त्यांनी ही गोष्ट नीट मनात घर करून ठेवावी. 10) मकर : या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल, पण त्यांना कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच, त्यांना प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. फक्त पाण्याच्या जागांपासून सावध राहणे गरजेचे असेल. जे लोक विदेश यात्रा करू इच्छितात त्यांना मनोकामना पूर्तीचा आनंद मिळेल. 11) कुंभ : या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे, पण त्यांना पैशांची बचत करायला पाहिजे. पैसे नको तिथे खर्च होतील. हिशोब लागणार नाही. तसेच, त्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. 12) मीन : या राशीच्या लोकांना प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील, पण त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, त्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायात चांगले यश मिळेल.
सगळ्यांना उपयोगी ठरतील असे राहू केतूचे उपाय :
राहूपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर पहिली गोष्ट करा. स्वत:च्या घरचे टॉयलेट साफ करा! सफाई कामगारांना सन्मानाने वागवा आणि त्यांना नशेचे पदार्थ सादर अर्पण करा. भारत आणि श्रीलंका या दरम्यानच्या समुद्रात सापडणाऱ्या एका विशेष माशाचे डोकीकडील हाड ज्याला मत्स्य मणी म्हणतात, अभिमंत्रीत मत्स्य मणी हा रामबाण उपाय राहूसाठी आहे. राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हणतात. राहूला शिर आहे पण धड नाही. त्यामुळे घरात कोणत्याही देवतेचे, महापुऊषाचे केवळ शिर असलेले मुखवटे, शो पीस ठेवणे म्हणजे राहूला स्वत:हून आमंत्रण देणे. बऱ्याच लोकांच्या घरी तुम्ही गणपती, तिऊपती बालाजी, हनुमान, कोल्हापूर महालक्ष्मी यांचे पितळेचे, बांबू वेताचे असे अर्ध पुतळे, नुसतेच शिर पाहिले असतील. हे सगळे राहूचे रीप्रेसेंटेटीव! म्हणून असले मुखवटे चुकूनही घरी, गाडीत ठेवू नका. त्यांचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी देवी दुर्गेचे पूजाविधी केले जातात. असे मानले जाते की, ज्यांच्यावर देवी दुर्गेचा आशीर्वाद असतो त्याच्यावर राहू आणि केतूचा वाईट प्रभाव पडत नाही. राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी दररोज नागावर नृत्य करणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा करावी. रोजच्या पूजेदरम्यान ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्यांना राहू आणि केतूच्या दोषाने त्रास होत असेल, त्यांनी राहू-केतू ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे आणि नियमानुसार रोज त्यांच्या बीजमंत्रांचा जप करावा. असे केल्याने त्यांचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. राहू-केतूग्रस्त लोकांनी गरीब मुलीच्या लग्नात यथाशक्ती दान करावे. शास्त्रात कपिला गाईचे दान करणे उत्तम मानले गेले आहे. असे मानले जाते की, यामुळे राहू केतूचा वाईट प्रभाव कमी होऊ शकतो. ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यांनी हलके निळे कपडे घालून दान करावे. ज्यांच्या कुंडलीत केतू दोष आहे, त्यांनी फिकट गुलाबी रंगाचे कपडे घालून दान करावे.
मेष
आर्थिक बाजू भक्कम राहील. मित्रमंडळींचा सहयोग मिळेल. भावंडांशी मतभेद संभवतो. कौटुंबिक सुख चांगले आहे. विचार करून निर्णय घ्या. व्यवसायात नफा मिळेल. परिश्र्रमाशिवाय फळ मिळणार नाही. व्यवसाय भागीदारीत असेल तर नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत बदल होईल. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
उपाय : कोळसे नदीत सोडा.
वृषभ
आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल, अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधात गोडवा राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस आर्थिक प्रगती करेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आज आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत असलेल्यांना आज पदोन्नती मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय : जलचरांना खाणे द्या.
मिथुन
कामाच्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती संमिश्र्र राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्मयता कमी आहे. प्रेमसंबंधांमध्ये वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनातही वाद होण्याची शक्मयता आहे. आरोग्य चांगले राहील पण ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत त्यांनी सावध रहावे.
उपाय : कावळ्यांना फरसाण घाला.
कर्क
चांगला काळ आहे, योग्य तो फायदा उचलणे मात्र तुमच्या हातात असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. उच्च पद प्राप्त करू शकता. चांगली बातमी मिळण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो. जीवनसाथी बरोबर वाद विवाद टाळा.
उपाय : साखर दान करा.
सिंह
आव्हानांनी भरलेला काळ असू शकतो पण त्याच बरोबर कामात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अनेक लोकांबरोबर खटके उडतील. कुणालाही मानसिक त्रास होईल असे काही बोलू नका. आर्थिक स्थितीत यश मिळेल. कुठे पैसे गुंतवले असतील तर तिथून आर्थिक फायदा होण्याची शक्मयता आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
उपाय : शिजवलेला भात गरजूला दान करा.
कन्या
करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्र्रम करावे लागतील. खर्चावर लक्ष ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. व्यापारी वर्ग त्यांच्या मित्रांसोबत बिझनेस ट्रिपला जाऊ शकतो. घरातील वयोवृद्ध व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचा त्रास होईल पण संयम ठेवावा. कुटुंबातील इतर संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
उपाय : गायीला तूप चपाती घाला.
तूळ
कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणणारे योग आहेत. तुमच्या सल्ल्यामुळे अनेकांचे भले होईल पण विरोधाभास असा की, तुम्ही स्वत:ला फायदा करून देऊ शकणार नाही. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते. पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे. नातेसंबंध सुधारतील. तब्येत सुधारेल.
उपाय : मंदिरात तूप द्यावे.
वृश्चिक
रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्थितीचा परिणाम शारीरिक अवस्थेवर होण्याची शक्मयता आहे. शक्मयतो प्रवास टाळा, आरोग्य बिघडण्याची शक्मयता जास्त आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. मानसिक तणाव कमी होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे आपले वागणे सुधारायची गरज आहे.
उपाय : मारुती मंदिरात मसूर डाळ द्यावी.
धनु
प्रवासाची एक छोटीशी योजना मन:स्थिती हलकी करू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. आज तुम्हाला नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळतील. त्यांचा नियोजित कामात उपयोग होईल. मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना आज चांगला फायदा होईल. खासगी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशनशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
उपाय : बिब्बा ओवाळून टाका
मकर
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल, यश मिळण्याची शक्मयता आहे, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत चांगल्या डॉक्टरांशी संपर्क साधाल. मालमत्तेशी संबंधित कामात थोडा विलंब होण्याची शक्मयता आहे. मित्रांकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा करण्यास हरकत नाही.
उपाय : गायीला कणीस घाला.
कुंभ
हा काळ संमिश्र्र जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. तुम्हाला काही धार्मिक विधीत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
उपाय : खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी.
मीन
तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचे खर्च वाढतील. काही नवीन कामात तुमची ऊची वाढेल. कार्यालयात ओव्हर टाईम करावे लागू शकते. अडथळ्यांनी भरलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात परस्पर समन्वय वाढेल. तुमचे कुटुंबीय काही कामासाठी तुमची प्रशंसा करतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल. तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल होतील.
उपाय : हळदीच्या पाण्याने स्नान करा.