राशिभविष्य
बुधवार दि. 14 ते मंगळवार दि. 20 मे 2025 पर्यंत
दीडकी
तसे पाहिले तर सगळे ग्रह आपापल्या गतीने भ्रमण करत असतात. त्यातल्या त्यात चंद्र, सूर्य, बुध, मंगळ, शुक्र हे फास्ट मूव्हींग ग्रह आहेत. मे महिन्यामध्ये पाच गृह आपापल्या राशी बघत आहे. पण गुऊ, राहू, केतू, शनी यांची गती कमी असल्यामुळे त्यांच्या राशी बदलाला जास्त महत्त्व असते आणि त्यामुळेच त्यांचा इम्पॅक्ट-परिणाम जास्त बघायला मिळतो. राहू केतूला एक रास भोगायला दीड वर्षे लागतात, म्हणून लेखमालेचे नाव दीडकी. तुम्ही म्हणाल ‘राहू द्या ना!!’ पण असो. राहूची आपल्या जीवनात व्याप्ती किती आहे? सध्या तुम्ही हा लेख वाचत आहात आणि बाजूलाच मोबाईल ठेवलेला आहे! हा राहू! इंटरनेटवर जे तुम्ही पाहता, ते राहूमुळे! व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवता ती राहूची माया!! फेसबूकवर, इन्स्टावर अपडेट करता तो राहूचा प्रताप! मनातील भीती राहूमुळे, भुते-खेते यांचे चाळे राहूमुळे! अभासी दुनियेचा बेताज बादशाह म्हणजे राहू. वैद्यकीय भाषेत मेंदुच्या पुढच्या भागाला... ज्याला ‘फ्रंटल कोर्टेक्स’ म्हणतात तो राहूच! ओशो रजनीश यांच्यापासून राम-रहीमपर्यंत दुनियेला झुकवणारा राहू. संन्यास, त्याग, तपस्या, अनासक्ती, पैसे असूनसुद्धा गरिबाची राहणी, कुष्टविकार, पराकोटीची, जीवावर उदार होऊन दाखवलेली वीरता, 18 मे पासून आपले सैनिक जे जिगर दाखवतील ते असामान्य शौर्य म्हणजे केतू. 18 मे रोजी राहू कुंभेत आणि केतू मकरेत जाईल आणि केतू सिंहेत. राहू केतू मागचा जन्म आणि हा जन्म यातील दुवा आहेत. ज्योतिषी राहू आणि केतूला 5, 7, 9 अशा दृष्ट्या मानतात. पण हे अनुभवायला येत नाही. केतूची दृष्टी असूच शकत नाही. कारण त्याला मुळात शिरच नाही. राहूची माझ्या अनुभवाला आलेली 5, 7 आणि 12 वी दृष्टे आहे. राहूची उपास्य देवता सरस्वती. कारण बुद्धीचा अंकुष नसेल तर राहू सैराट सुटतो. पण माझ्या मते उच्छिष्ट मातंगिनी ही राहूची उपास्य देवता आहे. गणपतीचे डोके शंकराने छाटले, म्हणून केतू पीडेसाठी गणपतीची उपासना करतात. माझ्या मताप्रमाणे राहू केतूची शांती करण्याच्या भानगडीत न पडता त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपल्यात बदल करून योग्य तो फायदा उचलला जाऊ शकतो, जसे राहू म्हणजे तुमच्या घरातील टॉयलेट. ते जितके स्वच्छ तितका राहू शांत. सगायी कामगारांची देवी म्हणजे राहूची सेवा. कुत्र्यांना बिस्किट घालण्यासारख्या साध्या सोप्या उपायाने केतू खूश होतो हे त्रिवार सत्य. टॉयलेटमध्ये निळा बल्ब लावा आणि बघा राहूची पीडा कशी कमी होते! बघुया या राहू केतूच्या राशी परिवर्तनाचा परिणाम : 1) मेष : राहू आणि केतूच्या गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना प्रेमसंबंधात समस्या येऊ शकतात. भांडणे होणे, ताटतूट, ब्र्रेकअप, आई-वडिलांशी न पटणे तसेच, त्यांना कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि कामाच्या ठिकाणी रस नसण्याची समस्या येऊ शकते. त्यामुळे मनात नसताना नोकरीत बदल, प्रमोशनमध्ये अडचणी, गुप्त शत्रूंचा त्रास, पती-पत्नीमध्ये कलह, विदेश यात्रेसंबंधी चिंता असे काहीसे फळ आहे. 2) वृषभ : या राशीच्या लोकांना नोकरीत बदल होण्याची शक्मयता आहे, पण ते बदल त्यांच्यासाठी फायद्याचे ठरतील, हे निश्चित नाही. या काळात त्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखलसुद्धा व्हावे लागू शकते. मनात नको ते विचार येणे, चुकीच्या मार्गाचा अवलंब करावा का अशा मोहात पडणे, आपला खरा चेहरा न दाखवता वेगळे स्वरूप दाखवणे. यामुळे नुकसान होण्याची शक्मयता जास्त आहे. 3) मिथुन : कष्ट कमी आणि परतावा जास्त अशी अपेक्षा असलेल्या लोकांना कष्ट जास्त आणि परतावा कमी अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल, पण त्यांना कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच, त्यांना प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. 4) कर्क : कर्क राशीच्या लोकांना पैसे स्वाभाविकपणे बचत करण्याची सवय असते. पण या काळामध्ये पैसे आले कसे आणि गेले कसे याचा हिशेब लागणे अवघड जाईल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे, पण त्यांना पैशांची बचत करायला पाहिजे. तसेच, त्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. 5) सिंह : या राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच, त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पण मुळातच सूर्याचा शत्रू असलेल्या राहूच्या या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या इगोमुळे, आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्यांवर हुकूमत चालवण्याच्या सवयीमुळे सगळ्या बाजूने कोंडी होण्याची शक्मयता आहे. 6) कन्या : या राशीच्या लोकांना कामात यश मिळेल, पण त्यांना कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच, त्यांना प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासाच्या दरम्यान किंवा सहज झालेल्या भेटीगाठीमध्ये समोरचा माणूस कधी टोपी घालेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मोह टाळून इन्व्हेस्टमेंट करताना सावध राहणे गरजेचे असेल.
(क्रमश:)
मेष
हा आठवडा आर्थिक नजरेने उत्तम आहे पण तुमच्यात आळस असेल. कोणतेही नवीन काम सुरू केल्यावर ते अर्धवट सोडल्यासारखे वाटेल. पैसा खर्च होईल. नवीन मित्र बनण्याचीही शक्मयता आहे. कुटुंबासोबत दिवस आनंदात जाईल. एक अर्थपूर्ण आणि यशस्वी प्रवास कालावधी असेल. गुऊवारी मनात अस्वस्थता राहील. आरोग्य नरम राहील.
उपाय : बदाम दान द्या.
वृषभ
प्रत्येक गोष्टीत नवीन उत्साह येईल. कामात कल्पकतेने सक्रिय व्हाल. यावेळी तुमची नजर उच्च ध्येयाकडे असेल. चांगल्या कल्पना आणि दृढनिश्चयाने तुम्ही उंच सशस्त्र उ•ाण करण्यास तयार असाल. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जीवनात नवीन संधींसह नवीन बदल घडतील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तुमची जवळीक वाढेल. आरोग्य चांगले राहील.
उपाय : लवंग जवळ ठेवा.
मिथुन
भांडण भडकवल्यानंतर वाद निर्माण करू शकतात. आरोग्यात चढ-उतार होण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. गरजेपेक्षा कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम कराल. सामाजिक वर्तनात खर्चाचे प्रमाण अधिक असेल. तुम्ही तुमच्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्याल. शुक्रवार दुपारपर्यंतचा काळ चांगला आहे.
उपाय : स्वस्तिक जवळ ठेवा.
कर्क
लग्नाची इच्छा असलेल्या लोकांसाठी चांगले. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. तुम्ही तुमच्या कल्पना आणि आदर्शांशी तडजोड करणार नाही. नवीन वस्तू खरेदी कराल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. बुधवारी दुपारनंतर आणि गुऊवारी सकाळी 10-11 दरम्यान वेळ प्रतिकूल वाटेल. आरोग्य नरम राहील. कठोर परिश्र्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.
उपाय : कोळसे नदीत सोडा.
सिंह
सरकारी कामात यश मिळेल. पित्तामुळे डोकेदुखी राहील. अति रागामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा. मंगळवारच्या दरम्यान कौटुंबिक सुख-शांतीच्या दृष्टीने चांगली बातमी मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. तुमच्या कामाचे कौतुक होईल पण पुरेसा आर्थिक लाभ मिळणार नाही. काही मोठ्या चिंतेतून तुम्हाला आराम वाटेल. धार्मिक कार्यात ऊची राहील.
उपाय : गोड खाऊन कामाला जा.
कन्या
मनातून नकारात्मक विचार काढून टाका. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला स्वार्थी प्रवृत्ती सोडून इतरांचा विचार करण्याचा सल्ला दिला जातो. मनाच्या द्विधा मन:स्थितीत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. पितृपक्षाकडून लाभ होतील, परंतु मालमत्तेशी संबंधित कामात सावधगिरीने पुढे जा. मुलांवर खर्च होईल. भावनेने वाहून जाण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन अवलंबला पाहिजे.
उपाय : गुळ दान द्या.
तूळ
प्रतिकूल काळ जाणवेल. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्मयता आहे. तुमची निर्णयक्षमता कमकुवत झाल्याचे तुम्हाला जाणवेल. मानसिक गुंतागुंतीमुळे तुमच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. कर्जाचा बोजा वाढू शकतो. तुमची हुशारी वापरून तुम्ही व्यवसायात निर्णय घ्याल. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जुन्या मित्राची भेट होईल.
उपाय : चांदी जवळ ठेवा.
वृश्चिक
आठवड्याच्या सुऊवातीला तुमचे विचार खूप सकारात्मक असतील. यामुळे तुम्हाला तुमच्या सभोवतालचे वातावरण अधिक अनुकूल वाटेल. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट आणि कायमस्वरूपी मालमत्तांमध्ये गुंतवणूक कराल. अनुचित कामांपासून दूर रहा अन्यथा नुकसान होण्याची शक्मयता आहे. या काळात केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.
उपाय : दूध दान द्या.
धनू
आठवड्याच्या सुऊवातीपासून व्यस्त राहाल. नोकरदार लोकांना दूरच्या ठिकाणी बदली हवी असेल तर अशीच परिस्थिती निर्माण होईल. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या आधुनिक संपर्क माध्यमांद्वारे तुम्ही लोकांच्या सतत संपर्कात राहाल. पालकांसोबतच्या व्यवहारात संयम ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात.
उपाय : तुरटी जवळ ठेवा.
मकर
गेल्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही भावनांच्या प्रवाहात वाहून गेलात, तरीही परिस्थिती अशीच राहिली तर आठवड्याच्या सुऊवातीला तुमच्या भावना दुखावल्या जातील. जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्याची शक्मयता असल्याने, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि शक्मय असल्यास, तडजोड करण्याची वृत्ती ठेवा. सप्ताहाच्या मध्यात आक्रमक स्वभाव राहील.
उपाय : गाईची सेवा करा.
कुंभ
व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्मयता आहे. मौजमजेत आणि मनोरंजनात वेळ जाईल. घरामध्ये एखाद्या शुभ प्रसंगाचे आयोजन केले जाईल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये अडथळा येईल आणि नुकसान होण्याची शक्मयता आहे. या काळात धार्मिक कार्य कराल. धार्मिक व आध्यात्मिक कार्य विशेष राहील. पैशाची देवाणघेवाण करू नका.
उपाय : तेल दान द्या.
मीन
व्यवसायात लाभ होईल. नवीन ओळख होऊ शकते. घर किंवा वाहन खरेदीचीही शक्मयता आहे. कामात यश मिळू शकते. जनसेवेची कामे कराल. ठरवलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. बाहेर कुठेतरी, सिनेमा किंवा हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन बनवला जाऊ शकतो. मानसिक शांती मिळेल. पालकांशी मतभेद होऊ शकतात. रचनात्मक कार्य कराल.
उपाय : पिंपळाला पाणी घाला.