For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:12 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

‘दीडकी’ म्हणजे राहू-केतू यांना एक राशी पूर्ण करायला लागणारा काळ. राहू आणि केतू 18 वर्षात त्यांचा प्रवास पूर्ण करतात आणि ते एकमेकांपासून नेहमीच 180 अंशांवर असतात. आता एक इंटरेस्टींग गोष्ट. ‘कालसर्प’ नावाच्या (अस्तित्वातच नसलेल्या) गल्लाभरू ज्योतिषांच्या कमाईचे मुख्य साधन असलेल्या योगाला कारणीभूतसुद्धा हेच राहू आणि केतू आहेत बरं का! सगळे ग्रह यांच्या एका बाजूला आले की, म्हणे पूर्ण कालसर्प, एखादा ग्रह वाचला तर म्हणे अर्धकाल सर्प! क्sब्!!!!! दिसली कुंडली की सांग कालसर्प आहे म्हणून आणि शांतीच्या नावावर उकळ पैसे हा कित्येक गल्लाभरू ज्योतिषांचा धंदा झाला आहे. या आधी दै. तऊण भारत, खजानामधील ‘कालसर्पाची पुंगी वाजवतो कोण आणि वाजते कुणाची’ या लेखात या सगळ्याचा मी भांडाफोड केला आहे, वाचकांनी तो लेख जरूर वाचावा. तांत्रिकदृष्ट्या राहू आणि केतू, सूर्य आणि चंद्राच्या मार्गाच्या छेदनबिंदूचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना उत्तर आणि दक्षिण नोड्स असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, सूर्य आणि चंद्र या नोड्सपैकी एकावर असताना ग्रहण होते. यावरून सूर्य आणि चंद्राला साप गिळंकृत करत असल्याचे चित्र दिसते. असे मानले जाते की, राहू सूर्यग्रहणास कारणीभूत आहे. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे एकच घटक मानले गेले असले तरी आपण त्यांना वेगवेगळे भाग म्हणून घेऊ.

Advertisement

प्रथम आपण राहूबद्दल बोलूया. राहू हा मानवाच्या तामसिक मोहाशी संबंधित आहे. तो भौतिक सुख आणि सांसारिक इच्छेशी संबंधित आहे. राहूला हाव आहे. अहंकार आहे. तो आपल्याला भौतिकतेला शरण जायला लावतो. याला अनेकदा प्रसिद्धी, लोभ, मोह, हेराफेरी, रोग, जडत्व यांचे कारक म्हटले जाते. राहू वात प्रकृतीचा आहे. राहूचा प्रभाव असलेली व्यक्ती बहिष्कृत असेल, कठोर बोलेल, शेळीची कातडी घातलेला लांडगा म्हणजे राहू! विश्वासघात करेल, छाती आणि पोटाच्या त्रासाने ग्रस्त करेल. तथापि, तो खूप शक्तिशाली मानला जातो आणि मित्रांना शत्रू, शत्रूंना मित्र बनवण्याची क्षमता आहे. बौद्ध संस्कृतीत, राहूला क्रोध देवतांपैकी एक मानले जाते जे मूळ व्यक्तीला घाबरवते. राहू हा एक अशुभ ग्रह आहे. तथापि, अनुकूल राहू राजकारणी आणि गुन्हेगारांना फायदा करतो. तो त्यांना अन्याय मार्गांनी पदांवर चढण्याची शक्ती आणि अधिकार देतो. राहू चोर, तुऊंग, साप, विष आणि पछाडलेल्या जागांवर राज्य करतो. तो इतका संमोहित करतो की, राहूच्या प्रभावाखाली लोक सहजपणे दुष्कृत्यांमध्ये अडकतात. तथापि, तो अचानक संपत्तीदेखील देऊ शकतो. जर राहूला सांसारिक इच्छांचा ग्रह मानले गेले तर केतू अध्यात्माशी संबंधित असू शकतो. तो उत्क्रांती आणि भौतिकीकरणाचे आत्म्याकडे वळण्याची आध्यात्मिक प्रक्रिया दर्शवितो. केतू सांसारिक अशुभ आहे. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर आहे. केतू हा अध्यात्मवाद, ज्ञान, कल्पनारम्यता, अजिंक्मयता आणि मानसिक क्षमतांचा कारक आहे. केतू पित्त घटकाचा आहे. राहू मिथुन, कन्या राशींशी मैत्री करू शकतो. याउलट, कर्क आणि सिंह हे शत्रू राशी मानले जातात. ग्रहांच्या संयोगाबद्दल बोलायचे झाले तर ते बुध, शनी आणि शुक्र राशींशी चांगले जुळतात. परंतु पौराणिक कथेनुसार, ते सूर्य, चंद्र आणि मंगळाचे कट्टर शत्रू आहेत. राहू वृषभ आणि तूळ राशीच्या राशीसाठीदेखील चांगले परिणाम देतो. जर राहू जन्मकुंडलीत बलवान असेल तर तो प्रसिद्धी, पैसा आणि यश देतोच. त्याच्या सारखा दाता नाही (तेंडल्याला तेंडुलकर बनवणारा हाच!) राहू, त्याच्या वागण्यात, शनीसारखाच आहे. राहू हा आनंदाचा आग्रही आहे आणि तो जातकाला सांसारिक सुखांकडे आकर्षित करतो. केतू जरी विरक्तीचा, अध्यात्माचा कारक असला तरी द्यायला बसला की, इन्किलाब श्रीवात्सवला अमिताभ बच्चन बनवतो!! पुढच्या भागात या राशी बदलाचे सगळ्या राशींवर परिणाम बघुया.

(वाचकांच्या अतिआग्रहाखातर पुन्हा सुरू करतोय, महा-उपाय आणि सोपी वास्तू टिप)

Advertisement

महाउपाय : शनिवारी पिंपळाची मुळी आणि कूश-गवताची मुळी नागकेशरा सोबत लाल पिशवीत बांधून तिजोरीत ठेवावी. पैशाची कमी कधीच पडणार नाही.

सोपी वास्तू टिप : पायऱ्या या विषम संख्येत असाव्यात, पण 3 ने भाग जाऊ नये अशा असाव्या.

मेष

करिअरच्यादृष्टीने अनुकूल काळ असेल. आपले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागू शकते किंवा कामात अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्मयता आहे. इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका, अन्यथा तुम्हाला त्यांची जबाबदारी घेऊन काम पूर्ण करावे लागेल.

उपाय : दूध दान द्या.

वृषभ 

हा काळ तुम्हाला मिश्रित परिणाम देईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला राहील, कारण तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ दिसू शकते, पण त्याच वेळी, तुम्ही मनोरंजन किंवा मुलांच्या आरोग्यावर आणि कर्ज फेडण्यासाठी खूप पैसा खर्च करू शकता. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला नाही. आरोग्य समस्यांमधून बरे व्हाल आणि या काळात कोणतीही मोठी आरोग्य समस्या नसेल.

उपाय : जोड केळी मंदिरात ठेवा.

मिथुन

पोट आणि हृदयाशी संबंधित किरकोळ आरोग्यावर समस्या येऊ शकतात. शक्मय असल्यास जास्त आराम करून आणि भरपूर पाणी पिऊन या समस्या कमी होतील. कौटुंबिकदृष्ट्या तुमचा काळ चांगला राहील. मुलांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल. कुटुंबातील एखादा सदस्य आरोग्य समस्यांनी त्रस्त असू शकतो.

उपाय : हिरव्या कापडात हिरव्या बांगड्या सुवासिनीला दान द्या.

कर्क

जीवनसाथीला करिअरमध्ये प्रगती किंवा त्यांच्या कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात काही असंतोष होण्याची शक्मयता आहे. या काळात शक्मयतो कोणाशीही वाद न घालता शांत राहणे चांगले राहील. व्यापार संबंधित काही अनुकूलता राहील पण जास्त गुंतवणूक केली तरी तुम्हाला कमी परतावा मिळण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ राहील.

उपाय : विहिरीत दूध ओता.

सिंह

अनपेक्षित जबाबदारी अंगावर पडेल. राग राग न करता सोल्यूशन शोधा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्र्रम करण्याची आणि आपले प्रयत्न न सोडण्याचा सल्ला दिला जातो. जीवनसाथीशी मतभेद थोडे जास्त होतील. कामाचा थोडा बोजा असेल आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांशी सामान्य संबंध असतील.

उपाय : कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावा.

कन्या

अनेक वेळा तुमचे विचार बरोबर असले तरी, बोलण्याची पद्धत किंवा वेळ योग्य नसल्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्मयता आहे. करिअरच्या दृष्टीने, या महिन्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक समस्या काही प्रमाणात कमी होतील. उष्णता आणि पित्त संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. उधारीचे पैसे परत मिळू शकतात.

उपाय : लहान मुलीला फळ गिफ्ट द्या.

तूळ 

मानसिक त्रास दूर होतील. या महिन्यात तुम्हाला एक महत्त्वाची यात्रा पुढे ढकलावी लागेल. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रमोशन किंवा सुधारणेची वाट पहात असाल, तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. सहकारी किंवा वरिष्ठांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचे काही नुकसान किंवा समस्या निर्माण होऊ शकते. घरात गैरसमज होतील.

उपाय : अखंड दिवा लावा.

वृश्चिक

व्यवसाय करणाऱ्यांना मिश्र्र परिणाम मिळतील, कारण तुमचा व्यवसाय चांगला असेल, परंतु त्याच वेळी गुंतवणुकीतून मिळणारा नफा सामान्य असेल. विद्यार्थ्यांना काहीसा अनुकूल काळ असेल आणि त्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. डोळ्यांचे किंवा घशाचे संक्रमण होऊ शकते. विचार न करता पैसे खर्च करू शकता. विशेषत: चैनीच्या वस्तूंवर आणि घरासाठी.

उपाय : गाईला चारा घाला.

धनु

करिअरच्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या सहकर्मी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली प्रगती आणि समर्थन मिळेल. कर्ज किंवा आर्थिक मदतीसाठी अर्ज करणाऱ्यांना या महिन्यात ते मिळेल. वाहन दुऊस्ती किंवा घराशी संबंधित दुऊस्तीसाठी काही पैसे खर्च कराल. नवीन घेतलेल्या वस्तूमध्ये बिघाड होऊ शकतो. रक्त आणि हाडांशी संबंधित आरोग्य समस्यांबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

उपाय : पांढरे काजळ घाला.

मकर

कौटुंबिकदृष्ट्या काळ चांगला राहील. पिकनिकसाठी जाण्याची योजना कराल. तब्येतीची म्हणावी तशी साथ असणार नाही. घरात जबाबदारी वाढेल. पैसे कमी पडतील की काय असे वाटू शकते. मुलांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन करारांवर सही करण्यासाठी हा चांगला काळ नाही.

उपाय : भैरव मंदिरात वडे अर्पण करा.

कुंभ 

कामाचा भार कमी असेल आणि चांगला आधार मिळेल. कामे मध्येच सोडून आराम करण्याची इच्छा होऊ शकते आणि हाती घेतलेल्या कामांमध्ये अडथळे आल्यामुळे त्या कामांमध्ये ऊची कमी होऊ शकते. आय चांगली असेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. विलासिताच्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील पैसे खर्च होण्याची शक्मयता आहे.

उपाय : हिरवे पेन दान द्या.

मीन

कामासाठी धावपळ करावी लागू शकते. प्रवास घडेल, पण त्यातून म्हणावा तसा फायदा होणे कठीण आहे. व्यापाऱ्यांसाठी खूप चांगला काळ राहील. त्यांना त्यांच्या व्यवसायात वाढ दिसेल. कोणत्याही नवीन करारावर किंवा भागीदारीवर सही करण्यासाठी थोडी वाट पाहणे चांगले राहील. घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. आरोग्याच्यादृष्टीने हा काळ चांगला राहील.

उपाय : कानात सोने घाला.

Advertisement
Tags :

.