राशीभविष्य अक्षरयात्रा
28 डिसेंबर ते 3 जानेवारी
मेष
या आठवड्यात अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी हाताळाव्या लागतील. वर्षाचा शेवट आर्थिक व कौटुंबिक समतोल साधण्यात जाईल. नवीन वर्षात उत्पन्न-खर्चाचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. घाई न करता योग्य प्राधान्य दिल्यास कामे सुरळीत होतील. संयम ठेवल्यास मानसिक स्थैर्य लाभेल.
उपाय: गुरुवारी गूळ किंवा चणे दान करा.
वृषभ
उत्साह, हालचाल आणि बदल यांचा काळ आहे. वर्षाच्या शेवटी अचानक निर्णय किंवा प्रवास संभवतो. नवीन वर्षात नवीन संधी आणि धाडसी पावले उचलावी लागतील. मात्र उतावळेपणा टाळा. योग्य दिशेने ऊर्जा वापरल्यास यश आणि आत्मविश्वास वाढेल.
उपाय: मंगळवारी लाल फुल अर्पण करा.
मिथुन
तुमच्यातील कौशल्ये, बुद्धिमत्ता आणि संवादशक्ती चमकून दिसेल. वर्षाचा शेवट आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. नवीन वर्षात नवीन करार, योजना किंवा सर्जनशील कामाची सुऊवात होऊ शकते. विचार स्पष्ट ठेवल्यास संधी तुमच्या बाजूने वळतील.
उपाय: बुधवारी हिरवी वस्तू जवळ ठेवा.
कर्क
या आठवड्यात सावध राहणे आवश्यक आहे. वर्षाचा शेवट अनुभवातून शिकवण देईल. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्याआधी परिस्थिती नीट समजून घ्या. नवीन वर्षात स्पष्ट संवाद आणि प्रामाणिकपणा ठेवल्यास गैरसमज दूर होतील व मन हलके होईल.
उपाय: पांढरी मिठाई दान करा.
सिंह
स्थैर्य, समृद्धी आणि कौटुंबिक समाधान अनुभवायला मिळेल. वर्षाचा शेवट सुरक्षिततेच्या भावनेत जाईल. नवीन वर्षात आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्मयता आहे. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यावर भर द्या. मेहनतीचे निश्चित फळ मिळेल.
उपाय: शुक्रवारी तांदूळ दान करा.
कन्या
नवीन सुऊवात करण्याची ऊर्जा मिळेल. वर्षाचा शेवट जुन्या भीती सोडण्यास सांगतो. नवीन वर्षात अनपेक्षित संधी, नवीन शिकण्याचा अनुभव किंवा प्रवास संभवतो. मन मोकळे ठेवा आणि बदल स्वीकारा. विश्वास ठेवल्यास प्रगती निश्चित आहे.
उपाय: सकाळी सूर्यनमस्कार घाला.
तुळ
भावनिक समतोल, प्रेम आणि सर्जनशीलता वाढेल. वर्षाचा शेवट भावनांना समजून घेण्याचा आहे. नवीन वर्षात नात्यांमध्ये गोडवा, प्रस्ताव किंवा सकारात्मक संवाद संभवतो. मात्र वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका. संतुलन ठेवल्यास समाधान मिळेल.
उपाय: गुलाबी फुल अर्पण करा.
वृश्चिक
समृद्धी, वाढ आणि सर्जनशीलता यांचा प्रभाव राहील. वर्षाचा शेवट समाधानकारक ठरेल. नवीन वर्षात आर्थिक वाढ, कौटुंबिक आनंद किंवा नवीन कल्पना आकार घेतील. स्वत:वर विश्वास ठेवा आणि मिळणाऱ्या संधी स्वीकारा.
उपाय: सुगंधी अगरबत्ती लावा.
धनु
मतभेद किंवा अहंकारामुळे तणाव वाढू शकतो. वर्षाचा शेवट आत्मपरीक्षण करायला लावेल. नवीन वर्षात समजूतदार भूमिका घेतल्यास नुकसान टळेल. प्रत्येक वाद जिंकणे गरजेचे नसते, हे लक्षात ठेवल्यास नातेसंबंध सुधारतील.
उपाय: शनिवारी तीळ दान करा.
मकर
गोंधळ, भीती किंवा अनिश्चितता जाणवू शकते. वर्षाचा शेवट अंतर्मुखतेचा आहे. नवीन वर्षात हळूहळू स्पष्टता येईल. घाईने निर्णय न घेता अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. शांतपणे विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल.
उपाय: सोमवारी पांढरे फुल अर्पण करा.
कुंभ
नवीन ऊर्जा, उत्साह आणि कल्पनांचा उदय होईल. वर्षाचा शेवट प्रेरणादायी ठरेल. नवीन वर्षात नवीन काम, व्यवसाय किंवा सर्जनशील सुऊवात संभवते. आत्मविश्वास ठेवा आणि पहिले पाऊल उचला. यशाची दारे उघडतील.
उपाय: मंगळवारी लाल दिवा लावा.
मीन
जुने दु:ख किंवा अपूर्ण भावना समोर येऊ शकतात. वर्षाचा शेवट भावनिक शुद्धीकरणाचा आहे. नवीन वर्ष आशा आणि नव्या संधी घेऊन येईल. जे गेले ते सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास मानसिक शांतता मिळेल.
उपाय: पाण्यात थोडी साखर मिसळून अर्पण करा.
सर्व राशीसाठी कॉमन न्यू ईयर उपाय
1 जानेवारी रोजी सकाळी आणि संध्याकाळी:
घरात एक दिवा लावा.
दिव्यात थोडी दालचिनी पावडर घाला.
दिवा पेटवताना मनात सकारात्मक संकल्प करा.
हा उपाय सकारात्मक ऊर्जा, स्थैर्य आणि नवीन वर्षात शुभ सुरुवात घडवतो.