For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM Jan 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

काम करण्याचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल. धंद्यातील समस्या कमी होईल. नवे कंत्राट मिळवता येईल. घरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीतील तणाव कमी झाल्याने वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गैरसमज दूर करून नव्याने संबंध जोडता येतील. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. अडचणी वाढतील अशी कामे करू नका. तब्येत नरम गरम राहण्याची शक्मयता आहे.

दूध दान करा.

Advertisement

वृषभ

मन स्थिर राहिल्याने योग्य निर्णय घेता येईल. योग्य ठिकाणी कायद्याच्या भाषेतच बोला, समोरचा अति शहाणपणा दाखवेल. धंद्यात काम मिळेल. परंतु गोड बोलणाऱ्या व्यक्तींकडून फसगत होऊ शकते. प्रेमात वाद होईल. वाटाघाटीत मतभेद होईल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. कोर्टाच्या कामात साहाय्य मिळू शकेल. व्यवसायात तुमचा अंदाज बरोबर येऊ शकतो.

धार्मिक ठिकाणी बदाम ठेवा.

मिथुन

प्रतिष्ठा वाढेल. सप्ताहाच्या सुऊवातीला वाद होऊ शकतो. वाहन जपून चालवा. दुखापत होईल. संसारात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मुलांच्यासंबंधी चांगली बातमी ऐकावयास मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत बदल फायदेशीर ठरेल. घर, वाहन, जमीन, खरेदीचा विचार करता येईल. मित्र मंडळीमध्ये प्रभाव दिसेल. विद्यार्थी वर्गाची प्रगती होईल.

मुलांना बत्तासे वाटा.

कर्क 

लाभाचे योग होत आहेत. सप्ताहाच्या मध्यावर घरात वाद वाढण्याची शक्मयता आहे. वाटाघाटीसंबंधी प्रश्न उपस्थित होऊ शकतो. चुका सुधारता येतील. धंदा वाढेल. थकबाकी नीट करावी. नवीन ओळख  होईल. नवे काम मिळेल. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल. वेळ फुकट घालवू नका.

गूळ दान द्या.

सिंह

धंद्यातील समस्या सोडवता येईल. नोकरीत सहकर्मींबरोबर वाद होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात चांगले मोठे काम मिळवता येईल. वरिष्ठांचा दबाव कमी होईल. नवीन योजना मार्गी लावता येतील. संसारात शुभ घटना घडेल. सुखद समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. सप्ताहाच्या शेवटी गुप्तगोष्टींचा भास होऊ शकतो. प्रवासात सावध राहा.

पिंपळाचे पान जवळ ठेवा.

कन्या

अडचणींचा सामना करून काम करावे लागेल. प्रतिष्ठेवर टीका होण्याची शक्यता आहे. मैत्रीच्या भाषेतच बोलावे लागेल. धंद्यात लक्षपूर्वक हिशोब ठेवा. कामगार लोक टाळाटाळ करून काम करतील. अडचणी येतील. कुटुंबातील व्यक्तींच्या अपेक्षा वाढतील. तणाव संभवतो. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. न पटणारे काम, कायदा मोडणारे काम करण्याचा प्रयत्न करू नका.

मुंग्यांना साखर घाला.

तूळ

नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या सुऊवातीला धावपळ होईल. वाहन जपून चालवा. चुकीचा आळ येण्याची शक्मयता आहे. स्त्रियांना कामे करताना सावधगिरी घ्यावी. घरातील व्यक्तीचा आधार उपयोगी येईल. नवीन ओळख होईल. नोकरीसाठी प्रयत्न करा. विवाहासाठी चांगले स्थळ मिळेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल. स्वप्न पहा, परंतु पूर्ण करण्याची जिद्द ठेवा.

मधाची बाटली जवळ ठेवा.

वृश्चिक

कामाच्या बाबतीत सुधारणा कशी करता येईल, याचा विचार कराल पण लोकांची नाराजी तुमच्याबद्दल दिसून येईल. धंद्यात वाढ होण्यासाठी खर्च करावा लागेल. अनाठायी खर्च टाळा. घरातील व्यक्तींची नाराजी होऊ शकते. सप्ताहाच्या मध्यावर गैरसमज होईल. मैत्रीत दुरावा वाटेल. खाण्याची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यासात लक्ष द्यावे.

लाल गाईची सेवा करा.

धनु

जास्त भावूक झाल्यास मन अस्थिर होईल. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. प्रकृतिची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी विचित्र अनुभव येण्याची शक्मयता आहे. स्वभाव चिडका होईल. धंदा मिळेल. खर्चही वाढेल. डोळ्यांची आणि घशाची काळजी घ्या. कर्जाचे काम करण्यास थोडा विलंब लागू शकतो. महत्त्वाची कागदपत्रे वेळीच जागेवर ठेवा.

व्यसनांपासून दूर रहा.

मकर

कामाच्या ठिकाणी उर्मटपणा दिसता कामा नये, याची काळजी घ्या. सोबत काम करणारे जाणूनबुजून त्रास देऊ शकतात. मैत्रीने सर्व कामे करून घ्या. मंगळवार, बुधवार वाद वाढेल. तणाव होईल. टीका होईल. धंदा नीट सांभाळा. विश्वास टाकून गप्प बसू नका. फसगत होईल. नोकरीत कायदेशीर पद्धतीने काम करा. वरिष्ठांची नाराजी होईल. रागावर ताबा ठेवा.

तुळशी खालील मातीचा टिळा लावा.

कुंभ 

तुमच्या बुद्धीची चमक पाहून गुप्त हितशत्रू काड्या घालण्याचा प्रयत्न सर्वच ठिकाणी करू शकतात. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जबाबदारी वाढेल. तुमच्यावर निष्कारण आरोप करण्याचा प्रयत्न होईल. संसारात किरकोळ वाद होईल. खर्च वाढेल. पोटाच्या विकारांपासून त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. वाहन जपून चालवा. विद्यार्थी वर्गाला उत्साह देणारी बातमी मिळेल.

औदुंबराला प्रदक्षिणा घाला.

मीन 

व्यवसायात वाढ झालेली पाहून शत्रूंच्या पोटात दुखेल. तुम्हाला त्रास करण्याचा प्रयत्न होईल. कार्यात विरोध होईल. तुमचे नाव दूषित करण्याचा प्रयत्न होईल. नम्रता ठेवा. संयमाचे प्रसंग हाताळा. अरेरावी महागात पडेल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. किरकोळ वाद टोकाला जाऊ शकतो. विऊद्धलिंगी व्यक्तीकडून मन:स्ताप होईल. आर्थिक व्यवहार जपून करा.

दही खाऊन कामाला जावे.

तुम्हाला जर अशी शंका असेल की तुमच्यावर कोणीतरी वाईट प्रयोग केला आहे, घरात शांतता नाही, दवाखाना सुटत नाही, अशा परिस्थितीमध्ये पिंपळाची मुळी आणि कूश नावाच्या गवताची मुळी लाल दोऱ्यात एकत्र बांधावी. देशी गाईचे तूप लावावे. घरातून, सगळ्यांवरून उतरवून  कापरावर जाळावी. त्रास कमी होतो.

Advertisement
Tags :

.