For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

02/02/2025

Advertisement

मेष

कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. प्रकृतीस्वास्थ्य जपा. या सप्ताहात शेजारी व कामावरील व्यक्तींकडून प्रेम व स्नेह मिळण्याची शक्मयता राहील. परंतु आपल्या आरोग्यासंबंधात आपण फार जागरुक राहणे आवश्यक आहे. विशेषत: पोटदुखी, पचनाचे विकार याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक प्रगती मंद असली तरी उत्तरार्ध चांगला जाईल. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.

Advertisement

जोड केळी दान द्या

वृषभ

या आठवड्यात मानसिकता चांगली राहील पण मित्राकडून फसवणूक होण्याची शक्मयता आहे. सकारात्मक बाबींमध्ये आपणास अनुकूलता मिळू लागेल. आपल्या आततायीपणावर योग्य नियंत्रण ठेवा. धैर्याने व साहसाने आपण पुढे जाऊ शकाल. आपणास अनपेक्षित लाभ मिळू शकेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जोडीदाराची मदत व सहकार्य मिळू शकेल.

चप्पल दान द्या

मिथुन

आर्थिक नियोजन करा, फायदा होईल. नको ते खर्च टाळून बचतीचा मार्ग अवलंबिणेच योग्य ठरेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. शेअर बाजारात गुंतवणूक टाळा. जोडीदारासमवेत पर्यटनाची संधी मिळेल. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. बोलण्यात स्पष्टपणा ठेवणे अधिक हितकारक ठरेल. प्रवास कराल. पथ्य-पाणी सांभाळावीत.

पिंपळ पान जवळ ठेवा

कर्क

आपला राग व आवेग यांची स्थिती आपल्या सार्वजनिक व व्यावसायिक क्षेत्रात चांगली नाही याकडे लक्ष देणे हितकारक ठरेल. शिक्षण, व्यापार अशा क्षेत्रांत प्रगतीची संधी मिळू शकेल. आपली उत्पन्नाची साधने वाढण्याची शक्मयता आहे. आपल्या भावंडांशी आपले संबंध चांगले राहतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवू शकता.

बत्तासे वाटा

सिंह

आपले श्र्रम, अनुभव यांचा योग्य वापर करून आपण पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. गैरमार्गाने उत्पन्न वाढविणे टाळावे. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी. राजकीय व क्रीडा क्षेत्रात आपण प्रगती करु शकाल. जोडीदाराशी सामंजस्याने वागणे इष्ट राहील. वादाचे प्रसंग टाळा.

दूध दान द्या

कन्या

या सप्ताहात व्यावसायिक व आर्थिक प्रगती करण्याचा आपला मानस राहील. आपल्या कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. आपल्या श्र्रमानुसार आपले उत्पन्न वाढवू शकता. आर्थिक बाजू सावरता येईल. जुने येणे वसूल होण्याची शक्यता राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासात सावधानता बाळगावी.

शुभ्र रंग टळावा

तूळ

प्रवासात काहींना अनपेक्षित फायदा होण्याची शक्मयता संभवते. कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवता येईल. कामाचा व्याप वाढू शकतो. धावपळ करावी लागेल. उत्पन्न क्षेत्रात काही चढ-उताराची शक्मयता दर्शवितो. शारीरिक क्षमतेसाठी योगाचा अवलंब करावा. जोडीदाराची उत्तम साथ व मार्गदर्शन मिळेल.

वडाला प्रदक्षिणा घाला

वृश्चिक

नोकरदारांना हा आठवडा प्रगतीचा राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. पैशाची आवक मनाप्रमाणे होऊ शकेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सहवास लाभेल. पुढे जाण्याची संधी प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात पती-पत्नी संबंधात दृढता राहील.

काळा रंग वापरू नका

धनू

गोड बोलून कार्यभाग साधा, यश मिळेल. नको त्या व्यक्तीशी चांगले बोलावे लागेल. या सप्ताहात नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारणे योग्य राहील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. कामकाजात घाईगडबड कटाक्षाने टाळावी. आपल्या हितचिंतकांपेक्षा हितशत्रू जास्त राहतील, तेव्हा त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी.

सुकलेला नारळ पाण्यात सोडा

मकर

व्यवसायिकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नव्या क्षेत्राचा परिचय संभवतो. आपल्या रागावर व बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणेच हितकारक राहील. इतरांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. सार्वजनिक क्षेत्रात वावरण्याची संधी मिळेल. प्रवास कराल. विचारपूर्वक योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ मिळू शकेल. भागीदारीतही लाभ संभवतो.

तेल दान द्या

कुंभ

या सप्ताहात आपण आपल्या श्र्रमानेच विशेषत: विक्री, शिक्षण, कन्सल्टन्सी अशा क्षेत्रांत यश मिळवू शकता. आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आनंददायी दिवस घालवू शकाल. आपल्या आवडत्या व्यक्तीशी गाठीभेटी होतील. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. वैवाहिक जीवनात नातेसंबंध टिकवणे हितकारक ठरेल.

कोहाळा घरी लावा

मीन

व्यवसायात प्रगती कराल. या सप्ताहात आपणास नशिबाची साथ मिळणार असल्याने व्यवसाय क्षेत्रात प्रगती करता येईल. विशेषत: प्रिंटिंग, रसायन व औषधासंबंधीच्या क्षेत्रात लाभ संभवतो. शेअरमधील गुंतवणूक योग्य राहीलच असे नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रवासात सावधानता बाळगा.

सफेद पेढे दान द्या

काही जणांच्या  घरामध्ये  वादावाद, आजारपण  ठाण मांडून बसते. अशा वेळी  घरी  येणे   सुद्धा  नकोसे वाटते.   कलह इतका वाढतो  की एकमेकांचे तोंड पाहणे  लोक टाळतात. अशावेळी घरातील झाडूच्या दोन काड्या एकमेकांवर ठेवून  निळ्या दोऱ्याने बांधाव्या  व  वायव्य दिशेला ठेवाव्या.

Advertisement
Tags :

.