राशिभविष्य अक्षरयात्रा
15/12/2024 ते 21.12.2024
मेष
विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. तुमच्या पानावर या काळात अधिक समस्या वाढून ठेवल्या आहेत. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने त्याच्यावर मात करता येईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. व्यापार-व्यवसायात नवीन योजना पूर्ण करू शकाल. आत्मविश्वासाने वाटचाल करत रहा. प्रवास योग आहे.
काजळ जवळ ठेवा.
वृषभ
वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्त्वाकांक्षा वाढवावी लागेल. कर्तव्य भावना ठेवून वागावे. मानसिक समाधान न मिळल्याने दु:खी रहाल. लहान लहान गोष्टी मनाला बोचतील. त्याकडे फारसे लक्ष न दिलेलेच बरे. आर्थिक योग साधारण राहील. काम वेळवर पूर्ण करावे लागेल. कोणावर विश्वास ठेवू नका, नुकसान संभवते. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल.
मधाची बाटली घरात ठेवा.
मिथुन
नोकरी-व्यवसायात प्रामाणिक रहावे लागेल. विनाकारण पॅबिनमध्ये बॉस समोर उभे रहावे लागेल. संयमाने वागा. संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळत राहील. व्यवहार सांभाळून करा. कोणावरही विसंबून राहू नका. आर्थिक योग मध्यम राहील. खर्चाचे नियोजन करावे लागेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
मुलींना मिठाई वाटा.
कर्क
आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात भरभराटी येईल. कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्मय होईल. चांगल्या संधी येतील. न्याय प्रविष्ठ कामात यश मिळेल. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्ये होतील.
रात्री दूध पिणे टाळा.
सिंह
व्यवसाय उद्योगात आपले काम सहायकांवर सोपविताना त्या कामात जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. कामकाजाचा अतिरिक्त ताण राहील. जबाबदाऱ्या वाढतील. व्यापार-व्यवहारात लाभ मिळेल. संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्र्रमाचे चीज होईल. अपेक्षित यश मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल.
दुर्वा जवळ ठेवा.
कन्या
आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना क्रियान्वयन करू शकाल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत समाधान मिळेल. जुन्या समस्या हळूच डोके वर काढतील. परंतु गुरुचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर वेळीच तोडगा निघेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील.
पक्ष्यांना दाणे घाला.
तूळ
प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक योग उत्तम आहेत. विशेष अनुकूल काळ. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.
जमिनीवर बसून जेवण करा.
वृश्चिक
आपल्या कर्तृत्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. कामात निश्चिंतता राहील. आत्मविश्वास वाढवावा लागेल. कामात नियमितता ठेवावी लागेल. अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल.
कुत्र्यांना चपाती घाला.
धनू
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिळालेल्या संधीचा लाभ आपले भविष्य उज्ज्वल करणारा राहील. उत्साह देणारा काळ राहील. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहील. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.
हळदीचा टिळा लावा.
मकर
आपल्या अंगभूत कलागुणांना भरपूर वाव मिळेल. कलाकारांच्या हातून चांगल्या कलाकृती घडतील. मित्रमंडळीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मात्र विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी मतलब ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्र्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.
काजळाचा टिळा लावा.
कुंभ
आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कामकाज नियमित सुरू ठेवा. नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने नियोजन डगमगेल. देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासादरम्यान काळजी घ्या.
सरकारी जमिनीवरच्या झाडांना पाणी घाला.
मीन
यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरीत बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटुंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभवतो.
धार्मिक कार्यक्रमासाठी पैसे द्या.
जर तुमचा कोणी शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर त्याच्यापासून सुटका करण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव भूर्जपत्रावर (हे झाडाचे साल असते, काष्टौषधीच्या दुकानात मिळते) लाल चंदनाने लिहा. हे पत्र मधाच्या डब्यात भिजवून ठेवा. तुमचा शत्रू आपोआप शांत होईल.