राशिभविष्य
दि. 9.3.2025 ते 15.3.2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात थोडे काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात. विशेषत: श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरते. ऑफिसमध्ये कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीमुळे आनंद वाटेल. आर्थिकदृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. वैवाहिक जोडीदाराकडे लक्ष द्या.
केळीच्या पानावर जेवण करावे.
वृषभ
तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होता ती गोष्ट घडण्याच्या मार्गावर आहे. पण थोडा धीर धरणे आवश्यक असेल. पोटाच्या तक्रारीमुळे त्रस्त होऊ शकता. प्रवासाला जाण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील आणि त्या फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांकरता अनुकूल काळ आहे. पण मेहनतीला पर्याय नसतो, हे लक्षात ठेवा.
दही दान द्यावे.
मिथुन
करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी काहीशी तुमची स्थिती होऊ शकते. त्यामुळे कोणताही व्यवहार करत असताना एखाद्या शहाण्या माणसाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरातील वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करू नका. बोलताना सावधान राहणे फायद्याचे असेल.
पिंपळाचे पान जवळ ठेवा.
कर्क
तब्येतीच्या दृष्टीने हा आठवडा तितकासा अनुकूल नाही. लहान मोठे आजार त्रास देऊ शकतात. अशावेळी अंगावर काहीही न काढता वैद्यकीय मदत घेणे फायद्याचे असेल. या काळात कोणालाही कसलेही वचन देऊ नका, पुढे जाऊन महागात पडू शकते. आर्थिक बाबतीत सावध रहा. अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यताही आहे.
जवळच्या धार्मिक जागी दूध द्यावे.
सिंह
स्वभावामध्ये उग्रता वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नाती दुरावण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी आपण बरे की आपले काम बरे असाच एटीट्यूड ठेवा. दुसऱ्याच्या कुठल्याही भानगडीत लक्ष घालू नका. वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो.
नारळाच्या झाडाला पाणी घाला.
कन्या
होईल तितकी स्वत:ची काळजी घेणे योग्य ठरेल. आजूबाजूचे वातावरण तितकेसे पोषक नसले तरी अनपेक्षितपणे मदत मिळाल्यामुळे तुमची काळजी दूर होईल. गुंतवणूक करण्याकरता सध्या तितकेसे चांगले योग नाहीत. जमीन खरेदी-विक्री करण्याकरता होळी नंतरच्या काळाचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे.
पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे.
तूळ
आपल्या मनात असते एक आणि घडते वेगळेच याचा अनुभव येईल. हा अनुभव चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा असेल. जवळच्या मित्रांकरता आपल्या कामाला बाजूला ठेवून जावे लागेल. कामाच्या ठिकाणी नोकरदार वर्गाला कटू अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या मनातील हेतू गुप्त ठेवावा.
गरजूला अन्नदान करा.
वृश्चिक
जितकी मेहनत कराल तितक्या संधी प्राप्त होतील. कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका, आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे बोलून दाखवल्यास मन हलके होईलच, पण त्याबरोबरच तब्येतीवर परिणाम होणार नाही. जवळच्या मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा प्लॅन कराल. पण आयत्या वेळेला रद्द करण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल.
पाण्यात दूध सोडावे.
धनु
मागच्या काळामध्ये जितका त्रास सहन केला त्या मानाने हा आठवडा बऱ्याच दृष्टीने आनंददायी ठरू शकेल. काही महत्त्वाची कामे झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. घरातील वातावरण बिघडू नये याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. विशेषत: संततीच्या बाबतीमध्ये काही वादविवाद घडण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये चढ उतार राहील.
केळीच्या झाडाची पूजा करावी.
मकर
व्यावहारिकदृष्ट्या हा आठवडा चांगला जाणारा राहील. यशदायी सप्ताह राहील. नोकरी व्यवसायात कोणाला दुखवू नका. वास्तूविषयक गोष्टींना चालना मिळेल. घरातून उत्तम पाठिंबा मिळेल. आरोग्याच्याबाबतीत मात्र जागरूक रहा. घरात शुभकार्याचे वारे वाहू लागतील. आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवास कराल. कुटुंबातील एका व्यक्तीकरता विशेष कष्ट घ्यावे लागतील.
दही दान द्या.
कुंभ
अनावश्यक खर्च टाळल्यास व आपल्या गुप्त वार्ता मनात ठेवल्यास आपल्याला यश मिळणे सहज शक्य होईल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी सामोपचाराने त्याला सामोरे जाणेच योग्य ठरेल. बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सफलता मिळू शकते. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वैवाहिक, कौटुंबिक जीवनात चांगले निर्णय घेता येतील.
विहिरीत तांब्याचे नाणे टाका.
मीन
आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगल्यास यशाची वाटचाल करणे शक्य होईल. नोकरी व्यवसायात आपली छाप पाडू शकाल. केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. घरात मंगलकार्याचे वारे वाहू लागतील. वैवाहिक जीवनात मिळते-जुळते धोरण स्वीकारणे हितकारक राहील. दानधर्म व पुण्यकर्माचा आनंद घेता येईल. नको त्या प्रलोभनात मात्र अडकू नका.
व्यसन टाळा.
जर वारंवार आर्थिक नुकसान होत असेल. पैसा आला कधी आणि खर्च झाला कधी, हे कळत नसेल तर लाल कपड्यात दोन पिवळ्या कवड्या बांधून तिजोरीत ठेवा. चपाती बनवा आणि एका बाजूने भाजून घ्या. आता भाजलेल्या भागाला तेल लावून त्यात तिखट आणि मीठ लावा. आता दोष असलेल्या व्यक्तीवर सात वेळा फिरवा आणि गुप्तपणे चौरस्त्यावर ठेवा.