For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:10 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

मेष

Advertisement

या सप्ताहात तुमच्या कम्युनिकेशन स्किलला नशिबाची साथ मिळणार आहे. एखाद्या मंगलकार्याला आपली हजेरी लावाल. कौटुंबिक नात्यातून आपणास प्रसन्नता लाभेल. नोकरदारांना बढतीची संधी मिळू शकेल. व्यापारात प्रगती साधता येईल. तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा काळ विशेष करून अनुकूल राहील. कामाचा उत्साह राहील. आरोग्याबाबतचे प्रश्न सुटू शकतील.

केशराचा टिळा लावा.

Advertisement

वृषभ

एखाद्याविषयी आकर्षण वाटण्याची शक्यता राहील. आपली जवळीक वाढू शकेल. आपली दैनंदिन कामे आत्मविश्वासाने कराल. घरात सुखशांती राहील. तरुणांना इंटरह्यू व स्पर्धेसाठी हा काळ ठीक राहील. आवश्यक गोष्टी आपल्याबरोबर असणे ठीक राहील. भाग्य आपणास साथ देऊ शकेल. उसनवारी सध्या टाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

सफेद चंदनाचा टिळा लावा.

मिथुन

आर्थिक परिस्थितीत चांगली सुधारणा होईल. चिंतेचे कोणतेही कारण राहणार नाही. तुमची निर्णयक्षमता व हुशारी वाढीला लागेल. नोकरवर्गाला धन कमवण्याची उत्तम संधी मिळू शकेल. माफक खर्चामुळे आपली बचतही वाढू लागेल. विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीत बदलाची शक्यता आहे. आरोग्याविषयी विषेश काळजी घ्यावी.

लहान मुलांना पेढे द्यावे.

कर्क

कामाच्या ठिकाणी थोडा त्रास होईल पण सामंजस्याने घ्या. आपली कार्यकुशलता व कार्यक्षमता यात वाढ झालेली दिसेल. हितशत्रूंच्या कारवायांबद्दल सतर्क रहा, त्यांना संधी देऊ नका. आपली गुंतवणूक विचारपूर्वक केल्यास त्याद्वारे आपणास फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले यश मिळू शकते. अंधविश्वासाला मात्र थारा देऊ नका.

3 बदाम विहिरीत टाका.

सिंह

प्रियजनांना गाठीभेटीचे योग येतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आपल्या बऱ्याचशा समस्या सोडविता येणे शक्य होईल. हा आठवडा काहीसा संमिश्र स्वरूपाचा जाण्याची शक्यता राहील. कामकाजात योग्य नियोजन ठेवल्यास आपल्याला ताणतणाव जाणवणार नाही. आपले आरोग्य ठीक राहील. विरोधकांना संधी देऊ नका. गुंतवणूक विचारपूर्वक करा.

कपाळावर कुंकू लावा.

कन्या

जोडीदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. या सप्ताहात कामकाजात म्हणावी तशी अनुकूलता मिळणे कठीण दिसते. नव्या गोष्टी सध्या पुढे ढकलणेच योग्य ठरेल. आर्थिक बाजू ठीक राहील. जमिनीच्या व्यवहारात आपणास लाभ होण्याची शक्यता राहील. क्रीडा व तांत्रिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. नव्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता राहील.

अशोकाचे पान जवळ ठेवा.

तूळ

कामाच्या व्यस्ततेमुळे ज्या गोष्टींकडे लक्ष दिले जात नव्हते, अशा गोष्टींना या आठवड्यात प्राधान्य द्याल. धार्मिक स्थळांना भेटीचे योग संभवतात, पर्यायाने तुम्ही रिलॅक्स व्हाल. नोकरदारांना बढतीचे व पगारवाढीचे संकेत मिळतील. बेकारांना बराचसा दिलासा मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक मेहनत घेणेच हितकारक ठरेल. आपली प्रकृती ठीक राहील.

दही खाऊन कामाला जावे.

वृश्चिक

या सप्ताहात पैशाचा अपव्यय टाळून बचतीचा मार्ग स्वीकारणे अधिक योग्य ठरेल, संकटकाळी तोच आपला आधार असणार आहे. कामाच्या व्यापाने काहीसा थकवा जाणवेल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणेच ठीक राहील. अचानक प्रवासाचे योग संभवतात. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

लाल सरबत दान द्या.

धनू

भावी आयुष्याच्या योजना बनवण्यात अधिक व्यग्र राहाल. घर-कुटुंब व अन्य कारभाराविषयी काही भरीव योजना तयार करण्याचा आपला मानस राहील. काही महत्त्वाचे असे निर्णयही आपण घेऊ शकाल. काही आर्थिक लाभाचीही शक्यता राहील. मुलांकडून चांगली बातमी व प्रेम मिळू शकेल. मित्रमंडळींकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

5 कवड्या जवळ ठेवा.

मकर

आर्थिक स्थिती संतुलित राहण्याच्या दृष्टीने पावले टाकाल. संतती इच्छुकांच्या आशा-आकांक्षा पल्लवित होतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी प्रवास टाळावेत व अध्ययनात अधिक लक्ष देऊन योगा, व्यायाम यावर जास्त लक्ष केंद्रीत करावे. आपल्या प्रियजनांची साथ आपणास लाभेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.

काळ्या गुंजा जवळ ठेवा.

कुंभ

मिश्र परिणामांचा आठवडा आहे. आर्थिक बाजू ठीक असली तरी अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याची संधी आपणास मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. प्रवासाचे योग, विशेषत: कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. आपली मानसिकता बिघडू देऊ नका. आरोग्याबाबत अधिक जागरूक राहा.

हळदीची गाठ जवळ ठेवा.

मीन

प्रकृतीस्वास्थ्याबाबत जागरूक रहा, पथ्ये पाळा. या सप्ताहात तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये अधिक मिसळाल. पण तुमचे आपल्या कामाकडे अधिक लक्ष देणे फार महत्त्वाचे राहील. काही नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रियजनांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. त्यासाठी खर्चही करावा लागणार आहे.

वडाची मुळी जवळ ठेवा.

नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी : 5 ग्रॅम हिंग, 5 ग्रॅम कापूर आणि 5 ग्रॅम काळी मिरी मिक्स करून पावडर तयार करा.  या पावडरच्या मोहरीच्या दाण्यासारख्या गोळ्या  करा. या गोळ्या दोन सम भागात विभाजित करा. एक भाग सकाळी तर दुसरा संध्याकाळी घरात जाळा. असे सलग तीन दिवस केल्याने घराला लागलेली वाईट नजर उतरते. घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

Advertisement
Tags :

.