For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:05 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, यश, समाधान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. प्रत्येक दिवस नव्या आशा, आत्मविश्वास आणि चांगल्या संधींनी परिपूर्ण असो.

Advertisement

मेष

या आठवड्यात तुमच्या आयुष्यात शिस्त, नियंत्रण आणि जबाबदारी वाढलेली दिसते. कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका निभावावी लागेल. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा, पण हट्ट टाळा. वरिष्ठ किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक नियोजनावर लक्ष दिल्यास स्थ?र्य येईल. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा.

Advertisement

उपाय: रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा.

 वृषभ

या आठवड्यात विचार स्पष्ट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भावनांपेक्षा तर्क आणि अनुभवाच्या आधारे निर्णय घ्याल. महत्त्वाच्या चर्चा, करार किंवा कायदेशीर बाबी यासाठी काळ अनुकूल आहे. मात्र शब्द थोडे कडक होऊ शकतात, त्यामुळे संवादात सौम्यता ठेवा. योग्य निर्णय तुम्हाला दीर्घकालीन फायदा देईल.

उपाय: बुधवारी हिरव्या वस्तू दान करा.

मिथुन

या आठवड्यात अनेक संधी एकाच वेळी समोर येतील, पण त्यामुळे गोंधळही वाढू शकतो. प्रत्येक गोष्ट आकर्षक वाटेल, मात्र वास्तव तपासणे गरजेचे आहे. चुकीच्या अपेक्षा किंवा भ्रमामुळे वेळ वाया जाऊ शकतो. शांतपणे विचार करून एकच योग्य मार्ग निवडा. अंतर्मनाचा आवाज ऐका.

उपाय: रोज 5 मिनिटे ध्यान करा.

कर्क

या आठवड्यात मोठा बदल घडून येण्याची शक्मयता आहे. जुनी परिस्थिती, सवय किंवा नातं संपून नवीन सुऊवात होईल. सुऊवातीला अस्वस्थता वाटू शकते, पण हा बदल तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. भूतकाळाला सोडून पुढे जाण्याची हिंमत ठेवा. नवीन दृष्टीकोन मिळेल.

उपाय: जुनी व न वापरलेली वस्तू दान करा.

सिंह

या आठवड्यात आत्मविश्वास, आर्थिक स्थैर्य आणि स्वत:वरचा विश्वास वाढलेला दिसतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. स्वत:साठी वेळ काढाल आणि आराम किंवा सुखसोयींवर खर्च होऊ शकतो. स्वतंत्र निर्णय घेण्याची ताकद वाढेल. स्वत:च्या यशाचा आनंद घ्या.

उपाय: शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा.

कन्या

या आठवड्यात तुम्ही थोडे थकलेले वाटू शकता, पण प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. पूर्वीचे अनुभव तुम्हाला अधिक सावध आणि शहाणे बनवतील. अजून थोडा संयम ठेवल्यास यश जवळ आहे. स्वत:च्या सीमारेषा ठरवा आणि गरजेपेक्षा जास्त ओझे उचलू नका.

उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा.

तुला

या आठवड्यात मेहनत, सातत्य आणि कौशल्यावर भर राहील. कामात सुधारणा करण्याची संधी मिळेल. शिकणे, प्रशिक्षण किंवा नवीन तंत्र आत्मसात करण्यासाठी योग्य वेळ आहे. सुऊवातीला परिणाम कमी वाटू शकतात, पण पुढे याच मेहनतीचा मोठा फायदा होईल. संयम ठेवा.

उपाय: काम सुरू करण्याआधी “ॐ नम: शिवाय” जप करा.

 वृश्चिक

या आठवड्यात स्पष्ट विचार आणि थेट निर्णय घ्यावे लागतील. भावनांवर नियंत्रण ठेवून सत्याचा स्वीकार कराल. काही कटू वास्तव समोर येऊ शकते, पण त्यामुळे दिशाभूल थांबेल. स्वत:चा आदर राखून बोलणे महत्त्वाचे आहे. योग्य शब्द योग्य वेळी वापरा.

उपाय: शनिवारी काळ्या तीळाचे दान करा.

धनु

या आठवड्यात भावना, प्रेम आणि सर्जनशीलता वाढलेली दिसते. एखादा प्रस्ताव, संदेश किंवा भेट मनाला आनंद देऊ शकते. कल्पनाशक्ती चांगली असेल, पण अती भावनात्मक निर्णय टाळा. वास्तव आणि भावना यांचा समतोल ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील.

उपाय: शुक्रवारी गुलाबाचे फूल अर्पण करा.

 मकर

या आठवड्यात तुमची समजूतदारपणा आणि कऊणा इतरांना आधार देईल. नातेसंबंधात भावनिक जवळीक वाढेल. कोणीतरी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ शकते. मात्र स्वत:च्या भावना दडपून ठेवू नका. स्वत:ची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

उपाय: सोमवारी शिवलिंगावर दूध किंवा पाणी अर्पण करा.

कुंभ

या आठवड्यात काही सवयी, भीती किंवा आसक्ती तुमच्या प्रगतीला अडथळा ठरू शकतात. स्वत:ला कशामुळे बांधून ठेवलं आहे याचा विचार करा. जागरूकता आणि इच्छाशक्तीने या मर्यादा दूर करता येतील. स्वत:वर नियंत्रण ठेवल्यास मोठा बदल शक्मय आहे.

उपाय: साखर किंवा गूळ मुंग्यांना खाऊ घाला.

मीन

या आठवड्यात अंतर्मनात संभ्रम किंवा भावनिक संघर्ष जाणवू शकतो. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे गरजेचे आहे. आत्मपरीक्षण आणि अध्यात्मिक विचार तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. स्वत:वर विश्वास ठेवा आणि हळूहळू निर्णय घ्या. शांतता लाभेल.

उपाय: दररोज काही क्षण ध्यान किंवा प्रार्थना करा.

 नववर्षासाठी सामायिक उपाय

कोणत्याही दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर तुमची एक चिंता किंवा भीती लिहा आणि तो कागद घडी करून बाजूला ठेवा.

मनात ठाम संकल्प करा की “मी हे ओझे सोडत आहे.” सकाळी तो कागद कचऱ्यात टाका. हा उपाय मानसिक हलकेपणा, स्पष्टता आणि नवीन सुऊवातीस मदत करतो.

Advertisement
Tags :

.