For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:05 AM Dec 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

मेष

Advertisement

या आठवड्यात आत्मविश्वास, कृतीशीलता आणि नेतृत्वगुण ठळक राहतील. अडलेली कामे पुढे सरकतील, पण उतावळेपणा टाळणे आवश्यक आहे. शब्दांमधून प्रभाव पडेल. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल.

उपाय: बुधवारी हिरवे वस्त्र घाला व “ॐ नम: शिवाय” 11 वेळा जपा.

Advertisement

वृषभ

भावनिक स्थैर्य, घरगुती सुख आणि नात्यांमध्ये आपुलकी वाढेल. सर्जनशील कामातून समाधान मिळेल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे संतुलन ठेवा. संयम आणि प्रेम यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल.

उपाय: शुक्रवारी गोड पदार्थ अर्पण करा व कृतज्ञता व्यक्त करा.

मिथुन

या काळात निर्णयक्षमता तपासली जाईल. संभ्रम, द्विधा मन:स्थिती जाणवू शकते. शांत राहून विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल. बाह्य गोंधळापेक्षा अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा.

उपाय: सकाळी 5 मिनिटे ध्यान करा व पांढरा रंग वापरा.

कर्क

भावनिक चढ-उतार, स्वप्ने आणि आठवणी प्रभावी ठरतील. भीती किंवा गैरसमज दूर करण्याची वेळ आहे. वास्तव स्वीकारल्यास मानसिक शांती मिळेल. अंतर्मनाचे संकेत दुर्लक्षित करू नका.

उपाय: सोमवारी चंद्राला पाणी अर्पण करा व शांत संगीत ऐका.

सिंह

या आठवड्यात सामर्थ्य, संयम आणि सौम्य वागणूक महत्त्वाची ठरेल. आक्रमकतेऐवजी समजूतदारपणा वापरल्यास विजय मिळेल. नात्यांमध्ये आदर वाढेल आणि कामात विश्वास निर्माण होईल.

उपाय: रविवारी सूर्यनमस्कार करा व तांब्याच्या भांड्यात पाणी प्या.

कन्या

मेहनत, शिस्त आणि कौशल्य यांचा योग्य उपयोग होईल. कामात प्रगती दिसेल. सातत्य ठेवल्यास दीर्घकालीन फायदा मिळेल. आरोग्य व दिनचर्या सुधारण्याची ही उत्तम वेळ आहे.

उपाय: दररोज स्वच्छता करा व 108 वेळा “ॐ” जपा.

तुळ

न्याय, समतोल आणि स्पष्टता या आठवड्याची थीम असेल. नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद आवश्यक आहे. कायदेशीर किंवा महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतात. सत्याचा मार्ग निवडा.

उपाय: शुक्रवारी गुलाबी फूल अर्पण करा व क्षमाशीलता ठेवा.

वृश्चिक

मोठे अंतर्गत परिवर्तन घडेल. जुने विचार, नाती किंवा सवयी संपुष्टात येऊ शकतात. सुऊवातीला अस्वस्थता वाटेल, पण त्यानंतर नव्या ऊर्जेची सुरुवात होईल. बदल स्वीकारा.

उपाय: मंगळवारी लाल दिवा लावा व नकारात्मक गोष्टी दान करा.

धनु

संयम, संतुलन आणि उपचाराची ऊर्जा सक्रिय आहे. अती घाई किंवा टोकाची भूमिका टाळा. काम, आरोग्य आणि नात्यांमध्ये योग्य समतोल ठेवल्यास स्थिर प्रगती होईल.

उपाय: गुरुवारी हळद मिसळलेले दूध प्या व कृतज्ञता व्यक्त करा.

मकर

जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातूनच अधिकार आणि मान मिळेल. नेतृत्वगुण ठळक होतील. शिस्त आणि नियोजनामुळे कामे यशस्वी होतील. हट्टापेक्षा लवचिकता ठेवा.

उपाय: शनिवारी काळे तीळ दान करा व संयम पाळा.

कुंभ

आशा, प्रेरणा आणि नव्या शक्मयता दिसतील. निराशा दूर होईल. भविष्यासाठी नवे विचार आणि योजना आकार घेतील. स्वत:वर विश्वास ठेवल्यास मार्ग स्पष्ट होईल.

उपाय: निळा रंग वापरा व रात्री तारे पाहून मनोकामना करा.

मीन

मनोकामना पूर्ण होण्याची ऊर्जा आहे. भावनिक समाधान आणि आनंद मिळेल. अती अपेक्षा टाळा आणि जे मिळते आहे त्याचा आनंद घ्या. कृतज्ञता तुमचे भाग्य वाढवेल.

उपाय: गुरुवारी पाणी दान करा व हसत राहण्याचा संकल्प करा.

Remedy - - वर्ष संपताना जुन्या ऊर्जा, अडथळे आणि भावनिक ओझे दूर करण्यासाठी हा शक्तिशाली उपाय करा.

रविवार किंवा अमावस्येच्या रात्री, शांत ठिकाणी थोडी भिमसेन कपूर आणि थोडी हवन सामग्री एकत्र ठेवा. ती प्रज्वलित करताना मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा-

“या धुरासोबत माझ्या आयुष्यातील जुनी, अडकलेली आणि नकारात्मक ऊर्जा मुक्त होत आहे.” धूर घरात फिरवा, विशेषत: प्रवेशद्वाराजवळ.शेवटी कृतज्ञतेने डोळे बंद करा आणि नव्या वर्षासाठी सकारात्मक संकल्प घ्या.

Advertisement
Tags :

.