For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:05 AM Dec 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

22-12-2024 ते 28.12.2024 पर्यंत

Advertisement

मेष

तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षाने जाणीव होईल. व्यापारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे येतील.

Advertisement

काळा रंग वापरू नका.

वृषभ

एक चांगले आणि एक वाईट वाट्याला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त रहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही, असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल.

चकचकीत सफेद रंग वापरा.

मिथुन

हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसाय उद्योगातील आकर्षक योजनातून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना असेल. कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पहा.

शैक्षणिक साहित्य दान द्या.

कर्क

कामाच्या वेळी काम आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा राहील. व्यापारात एखादी कल्पना महागडी असली तरी भविष्यात उपयोगी पडणारी असेल तर त्याविषयी माहिती घ्याल. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठ चांगली साथ देतील. अवघड कामातही प्रगती होईल. बेकार व्यक्तींनी तडजोड करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल.

अंध दिव्यांगाला जेवण द्या.

सिंह

व्यक्तिगत इच्छा आकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल. पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळच मिळणार नाही. व्यवसाय उद्योगात काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल. खर्च भागवण्याइतकी आर्थिक स्थिती बरी असेल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल. त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल.

पिंपळाला पाणी घाला.

कन्या

एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करण्याची तुम्हाला सवय आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यापारधंद्यात जे काम कराल त्यात बुद्धिकौशल्य आणि कलात्मकता दिसून येईल. जाहिरातीचे नवीन तंत्र आत्मसात करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरात मित्रांची वर्दळ असेल.

घरी गोमुत्र ठेवा,

तूळ

व्यापार उद्योगात विविध मार्गांनी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल. त्याचा फायदा उठवावा. चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील. पण कामाचे प्रमाणही वाढेल. मित्रमंडळींकडून समारंभाचे निमंत्रण येईल.

गंगाजलाने आंघोळ करा.

वृश्चिक

व्यापार उद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील. व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील. प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर कराविशी वाटेल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खूश होऊन वरिष्ठ विशेष सवलत देतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल.

भटक्या जनावरांना चारा द्या.

धनू

कारखानदारांना उत्पादनक्षमता वाढविण्याकरता नवीन मशीनरी खरेदी कराविशी वाटेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची प्रचिती येईल. एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील. तऊणांनी हात राखून खर्च करावा.

आवळे दान द्या.

मकर

पैसे हातात असतात त्यावेळी तुमची कळी खुलते. व्यापारधंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल. रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची अवस्था राहील. नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल. त्याकरता तुमची विशेष बडदास्त ठेवली जाईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना संधी लाभेल.

अशोकाचे पान जवळ ठेवा.

कुंभ

एकाच वेळी कर्तव्य पार पाडायचे आणि मौजमजाही कराविशी वाटेल. व्यवसाय उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. मात्र तेथील वातावरण आणि कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा.

दिव्यांगांना फळे दान द्या.

मीन

अडथळ्यांची वाट संपून प्रगतीचा मार्ग आता खुला होण्याची लक्षणे दिसू लागतील. तुमचा उत्साह वाढू लागेल. व्यापारात तांत्रिक कारणांमुळे अडून राहिलेली कामे आता गती घेतील. तुमचे प्रयत्न आणि हितचिंतकाची मदत यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन वर्षातील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळा. नोकरीत वेगळ्या कामाकरता निवड होण्याची शक्मयता आहे.

मुंग्यांना साखर घाला.

जर एखाद्याला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल तर शनिवारी किंवा मंगळवारी रात्री 38 दाणे काळी उडीद डाळ आणि 40 दाणे तांदूळ एकत्र करून एका खड्ड्यात  मिसळावे. त्यावर लिंबू पिळून घ्या. लिंबू पिळताना सतत आपल्या शत्रूचे नामस्मरण करत रहा. या उपायाच्या प्रभावाने तुमचा शत्रू शांत होईल आणि तुमचे नुकसान करू शकणार नाही.

Advertisement
Tags :

.