For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:10 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

मेष

Advertisement

साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. याचा अनुभव या आठवड्यात येईल. गरजेला कामी येणारे कोण याचीही तुम्हाला प्रकर्षाने जाणीव होईल. व्यापारात, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक तो खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे येतील.

तुरटीने दात घासा.

Advertisement

वृषभ

एक चांगले आणि एक वाईट वाट्याला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त रहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही, असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल.

मोती जवळ ठेवा.

मिथुन

हातात पैसे आले की, तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसाय उद्योगातील आकर्षक योजनातून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना असेल. कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पहा.

केळीच्या झाडाची पूजा करा.

कर्क

नोकरीमध्ये जे काम आवडत नाही त्यात विनाकारण वेळ जाईल. सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होतील. कामाच्या वेळी काम आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा राहील. व्यापारात एखादी कल्पना महागडी असली तरी भविष्यात उपयोगी पडणारी असेल तर त्याविषयी माहिती घ्याल. नोकरीत सहकारी चांगली साथ देतील.

वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

सिंह

अवघड कामातही प्रगती होईल. बेकार व्यक्तींनी तडजोड करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल. मुलांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. व्यक्तिगत इच्छा-आकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल. पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळच मिळणार नाही. व्यवसाय-उद्योगात, काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल.

लाल चंदनाचा टिळा लावा.

कन्या

खर्च भागवण्याइतकी आर्थिक स्थिती बरी असेल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल. त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये मित्रमंडळींची वर्दळ राहील. एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करण्याची तुम्हाला सवय आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यापार-धंद्यात जे काम कराल त्यात बुद्धिकौशल्य आणि कलात्मकता दिसून येईल.

धातूच्या हंसांचा जोडा घरी ठेवा.

तूळ

जाहिरातीचे नवीन तंत्र आत्मसात करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरामधील एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. घरगुती समारंभाच्या निमित्ताने वेगळ्या स्थळाला भेट देण्याचा योग येईल. मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील.

गहू दान करा.

वृश्चिक

हा आठवडा तुमच्या इच्छापूर्तीला पूरक आहे. व्यापार-उद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण, जागा बदल किंवा व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील. प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर कराविशी वाटेल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खूश होऊन वरिष्ठ विशेष सवलत देतील.

आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध घाला.

धनू

व्यापार-उद्योगात विविध मार्गांनी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल. त्याचा फायदा उठवावा. चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील. पण कामाचे प्रमाणही वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल.

पिवळा गुलाब जवळ ठेवा.

मकर

नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल. ज्यावेळी भरपूर पैसे हातात असतात त्यावेळी तुमची कळी खुलते. सध्याचे ग्रहमान त्यादृष्टीने प्रसन्न आहे. प्रत्येक सुख तुम्हाला हवेसे वाटेल. व्यापार-धंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल. रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची अवस्था राहील. नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील.

खव्याची मिठाई वाटावी.

कुंभ

एकाच वेळी कर्तव्य पार पाडायचे आणि मौजमजाही कराविशी वाटेल. दोन्ही डगरींवर व्यवस्थित नियोजन करून पाय ठेवू शकाल. व्यवसाय-उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. मात्र तेथील वातावरण आणि कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा.

कपराची अत्तर लावा.

मीन

अडथळ्यांची वाट संपून प्रगतीचा मार्ग आता खुला होण्याची लक्षणे दिसू लागतील. तुमचा उत्साह वाढू लागेल. व्यापारात तांत्रिक कारणांमुळे अडून राहिलेली कामे आता गती घेतील. तुमचे प्रयत्न आणि हितचिंतकाची मदत यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन वर्षांतील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळा. नोकरीत वेगळ्या कामाकरता निवड होण्याची शक्यता आहे.

घरात स्नेक प्लांट ठेवा.

जीवन जर अडथळ्यांची शर्यत झाली असेल, प्रत्येक कामात विघ्न येत असेल, पुढचा रस्ताच जर दिसत नसेल तर हा उपाय करून बघावा. आपल्या उंची इतके कच्चे सूत तिप्पटीने घ्यावे. त्याला हळदीच्या पाण्याने पिवळे करावे. लाल दोरा घ्यावा. त्याला कुंकू लावावे. लक्ष्मी-नारायणाचे स्मरण करून हे दोरे वडाच्या झाडाला बांधावे. बांधताना आपली मनोकामना बोलावी. हा उपाय सलग 7 पौर्णिमा करावा.

Advertisement
Tags :

.