For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM May 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

तुमच्या पानावर या काळात अधिक समस्या वाढून ठेवल्या आहेत. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने त्याच्यावर मात करता येईल. जमेल तितकीच मदत आणि झेपेल तेवढेच काम करा. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. व्यापार-व्यवसायात नवीन योजना पूर्ण करू शकाल. आत्मविश्वासाने वाटचाल करत रहा. प्रवास योग आहे.

हीना अत्तर लावा.

Advertisement

वृषभ

अति विचार मानसिक विकार हे ध्यानी ठेवा. मानसिक समाधान न मिळल्याने दु:खी रहाल. लहान लहान गोष्टी मनाला बोचतील. त्याकडे फारसे लक्ष न दिलेलेच बरे. आर्थिक योग साधारण राहील. कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. कोणावर विश्वास ठेवू नका, नुकसान संभवते. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. विनाकारण कॅबिनमध्ये बॉस समोर उभे रहावे लागेल.

गुलाबाचे अत्तर वापरा.

मिथुन

देव देतो आणि कर्म नेते असे होऊ देऊ नका. मित्र गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. मोहापासून दूर रहा. व्यवसायात प्रामाणिक रहावे लागेल. संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळत राहील, पण व्यवहार सांभाळून करा. कोणावरही विसंबून राहू नका. आर्थिक योग मध्यम राहील. खर्चाचे नियोजन करावे लागेल.

मजुरांना ताक वाटा.

कर्क

गर्व करू नका, ठेच लागेल. जवळच्या व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागेल. आशातीत सुधारणा जाणवतील. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात भरभराट येईल. कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्य होईल. चांगल्या संधी येतील. न्यायप्रविष्ठ कामात यश मिळेल. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्ये होतील.

चंद्राला अर्ध्य द्या.

सिंह

विश्वासघाताचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी अत्यंत जपून रहा, खोटा आरोप होईल. कामकाजाचा अतिरिक्त ताण राहील. जबाबदाऱ्या वाढतील. व्यापार- व्यवहारात लाभ मिळेल. संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षित यश मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल.

लाजाळूची पाने जवळ ठेवा.

कन्या

आपण बरोबर तर जग बरोबर हे खरे नाही असे जाणवेल. प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना क्रियान्वयन करू शकाल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत समाधान मिळेल. जुन्या समस्या हळूच डोके वर काढतील. परंतु गुऊचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर वेळीच तोडगा निघेल. आर्थिक योग उत्तम. कुटुंबातील मतभेद दूर होतील.

हिरवे वस्त्र दान करा.

तूळ

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये, हे अनुभवाल. तब्येत सांभाळा. मित्रमंडळीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. विशेष अनुकूल काळ. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.

पक्ष्यांना दाणे घाला.

वृश्चिक

कामात चुका होणे, काम हातचे जाणे असे काहीसे अनुभव येतील. पण सहकार्याने कामात निश्चिंतता राहील. आत्मविश्वास वाढवावा लागेल. कामात नियमितता ठेवावी लागेल (आळस सोडून). अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो.

दीप दान करा.

धनू

एखाद्या व्यक्तीचा गैरफायदा घेतल्यास पुढे जाऊन नुकसान होऊ शकते. नको तिथे मत देऊ नका. उत्साह देणारा काळ राहील. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहील. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.

फळे दान द्या.

मकर

मन चंगा तो कटोरी मे गंगा हे ध्यानात घ्या. माणसे जोडायला शिका आणि अनावश्यक वाद टाळा. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुंची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

काजळाचा टिळा लावा.

कुंभ

जवळच्या माणसांसोबत आनंदाने वेळ घालवाल. नवीन योजना सुचतील. कामकाज नियमित सुरू ठेवा. नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतवतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने नियोजन डगमगेल. देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घ्या.

उडीद दान करा.

मीन

यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरीत बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटुंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभवतो.

लाल वस्त्र वापरू नका.

नाग फणी या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. त्याच बरोबर तंत्र शास्त्रात देखील नाग फणीला अनन्य महत्त्व आहे. बऱ्याच वेळेला आपली काहीही चूक नसताना शत्रू त्रास देतात. अशा वेळी बेदाग लिंबावर नाग फणीचे काटे शत्रूचे नाव घेऊन टोचावे. कुंकवाची पेस्ट पूर्ण लिंबाला लावावी आणि ओसाड जमिनीत तो लिंबू पुरून त्यावर जड दगड ठेवून द्यावा.

Advertisement
Tags :

.