राशिभविष्य अक्षरयात्रा
27.4.2025 ते 3.5.2025
मेष
आर्थिक आणि सामाजिक यशाबरोबर समाजातील तुमचे नाव वाढण्याची शक्मयता आहे. वयाने ज्येष्ठ व्यक्तीच्या असण्यामुळे घरातील वातावरणामध्ये फरक पडेल. दुसऱ्या गावी राहणाऱ्या एखाद्या मित्राच्या कामाकरता प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही सहकाऱ्यांचा रोष पत्करावा लागेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल.
काळ्या गाईची सेवा करावी.
वृषभ
मनासारख्या घटना घडतील. पाहुण्यांच्या गाठीभेटी होतील, निर्णय घेताना चार चौघांना विचारून मगच निर्णय घ्यावा. कामाच्या ठिकाणी संधीचे सोने कराल. पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. मित्राच्या परिवारातील सदस्याची मदत करावी लागेल. मनातील योजना गुप्त ठेवून कोणासमोरही उघड करू नका.
भीमसेनी कापूर जवळ ठेवावा व संध्याकाळी जाळावा.
मिथुन
कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. संततीच्या दृष्टीने चांगली बातमी कळेल. कामाच्या ठिकाणी चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतील. आर्थिक बाबतीमध्ये गाफिल राहून चालणार नाही. या आठवड्यामध्ये आपले कोण आणि परके कोण याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे ठरेल. तब्येत ठीक ठाक राहील. हसतमुख स्वभावामुळे मित्रांची साथ मिळेल.
पिवळ्या कागदावर 24 हा नंबर लिहून जवळ ठेवावा.
कर्क
तब्येतीच्या दृष्टीने येणारा आठवडा हा तितकासा अनुकूल असणार नाही. सर्दी, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन त्रास देऊ शकते. या आठवड्यामध्ये शक्मयतो बँकेचे व्यवहार टाळावे. गुंतवणूक करत असताना फसव्या आश्वासनांवर अति विश्वास ठेवू नये. मित्रांची साथ म्हणावी तशी न मिळाल्यामुळे कामे होण्याकरता विलंब होईल. प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा तितकासा अनुकूल नाही. दिलेले वचन पाळणे करता मेहनत घ्यावी लागेल.
कोरफडीचे पान घरात ठेवावे.
सिंह
तुमच्या स्वभावाला साजेसे प्रसंग या आठवड्यामध्ये घडू शकतात. पण त्याचबरोबर तुमच्यामुळे कुणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्या. कुटुंबीय किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. आर्थिकदृष्ट्या येणारा आठवडा हा चांगला असेल. तब्येतीच्या लहानसहान तक्रारी उद्भवू शकतात. इलेक्ट्रॉनिक सामान आयत्या वेळी बिघडू शकते. वैवाहिक जोडीदाराची मदत घ्यावी लागेल.
सूर्य प्रतिमा जवळ ठेवावी.
कन्या
थोडी अॅडजस्टमेंट केली तर बऱ्याच कामांना वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे मन कसे वळवावे, हे तुम्हाला चांगले माहीत असल्याने त्यांची मदत मिळेल. आर्थिक नुकसान जरी होणार नसले तरी म्हणावा तितका आर्थिक फायदा या आठवड्यात कठीण दिसतो. नोकरदार वर्गाने टीम वर्कचे महत्त्व समजून घ्यावे. घरच्यांकरता वेळ काढण्याकरता मागेपुढे पाहू नका. या आठवड्यामध्ये खर्चाचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्मयता आहे.
एक चमचा गाईचे दूध पाण्यात घालून आंघोळ करावी.
तूळ
प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली की, तो आनंद काहीतरी वेगळाच असतो याचा अनुभव येईल. हाती घेतलेल्या कामांना यशस्वी करून दाखवाल. ज्येष्ठ व्यक्तीबद्दल चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणी स्त्राr वर्गाकडून विशेष सावध राहावे. नोकरदार वर्गाला राजकारणाचा त्रास होऊ शकतो. तब्येतीची दुखणी कमी होतील.
पांढऱ्या कागदावर 6 हा आकडा लिहून जवळ ठेवावा.
वृश्चिक
कामाची गती थोडी मंदावते आहे. नवीन कामे मिळवण्याकरताही प्रयत्न करावे लागतील. सोबत काम करणाऱ्यांची वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. कुटुंब आणि तुमच्या कामाच्या संदर्भात हस्तक्षेप केलेला आवडणार नाही. घरी आनंदाच्या प्रसंगी छोटा वाद होण्याची शक्मयता आहे. पैशांच्या बाबतीत तितकासा अनुकूल असा हा आठवडा नाही. काही ठिकाणी पैसे अडकू शकतात.
निळ्या रंगाच्या काचेच्या बाटलीतून पाणी प्यावे.
धनु
कामाच्या संदर्भात सतत दुसऱ्यांची मदत घ्यावी लागल्याने थोडे फ्रस्ट्रेट वाटू शकते. घरची कामे आणि बाहेरची कामे पूर्ण करण्यामध्ये दमछाक होण्याची शक्मयता जास्त आहे. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल पण तुमच्या अपेक्षा मर्यादित ठेवा. एखाद्या बालमित्राची आठवण येऊन त्याच्याशी बोलावे असे वाटेल. व्यापारी वर्गाला अनुकूल काळ आहे. तब्येत उत्तम राहील. पितृतुल्य व्यक्तीबद्दल काळजी वाटू शकते.
पाच थेंब मोहरीचे तेल कच्च्या जमिनीवर सोडावे.
मकर
हा सप्ताह तुम्हाला आनंदाचा जाईल. जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. कुटुंबीयांसोबत एक लहानशी सहल आयोजित कराल. काहीवेळा आर्थिक तंगी जाणवू शकते. पाण्याच्या ठिकाणी गेलात तर सावध रहा. कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. नोकरदार वर्गाला सर्वसाधारण असा आठवडा असेल. व्यावसायिकांनी संधीचा चांगला फायदा उचलावा. तब्येतीची मोठी तक्रार दूर होईल. मानसिक आरोग्य सांभाळा.
कुत्र्याला बिस्किटे घालावीत.
कुंभ
छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेण्याची सवय सोडावी. खर्च करत असताना आर्थिक नियोजन बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. एखादे येणे वसूल न झाल्याने चिडचिड होऊ शकते. या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या उधारीच्या देण्या-घेण्यामध्ये अडकू नका. संततीची काळजी मिटेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत योग्य रीतीने काम केल्याने कामे पूर्ण होतील. शुक्रवार आणि शनिवारी तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मोगऱ्याचे अत्तर वापरावे.
मीन
योजलेल्या कामांमध्ये यश मिळेल. सरकार दरबारची कामे वेळेवर पूर्ण होतील. गुऊतुल्य व्यक्तीची साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास कराल. तुमच्यामुळे एखाद्याचे भले होण्याची शक्मयता आहे. नको त्या व्यक्तीशी बोलावे लागल्याने थोडा मानसिक त्रास संभवतो. हा आठवडा कष्टाचे प्रमाण वाढवणारा आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकरित्या तयार रहावे लागेल. कुटुंबातील व्यक्तीकडून भेटवस्तू प्राप्त होईल.
पिवळ्या रंगाचा हात रुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपाय : बऱ्याच ठिकाणी तुम्ही एका काचेच्या पेल्यात पाण्यात लिंबू टाकलेला पाहिला असेल. लिंबामध्ये आकर्षून घेण्याची शक्ती असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या तांत्रिक क्रियेत याचा उपयोग करतात. पाणी भरलेल्या काचेच्या पेल्यात बेदाग लिंबू टाकावा. तो जर तरंगला तर नकारात्मक शक्ती नाही, असे समजावे. बुडाला तर जोपर्यंत तो तरंगत नाही, तोपर्यंत ही क्रिया चालू ठेवावी.