राशिभविष्य अक्षरयात्रा
मेष
तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आठवड्याची सुऊवात कराल आणि एकामागून एक लाभ घ्याल. आर्थिक स्थिती चांगली राहील. लव्ह लाईफ चांगली राहील. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. पैशाचा हुशारीने वापर करावा. अविवाहितांना लग्नाच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा सामान्यत: अनुकूल आहे.
हळदीचा टिळा लावावा.
वृषभ
तुमचे विचार, नातेसंबंध, सवयी, वागणूक आणि विचार बदलण्याचे संकेत आहेत. आयुष्यात कोणत्या गोष्टींना पुढे न्यायचे आहे आणि कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत याचा विचार करूनच एक पाऊल टाकावे लागेल. मानसिक ताणतणाव सहन करू नका. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घाईघाईने कोणतेही काम करू नका. इतरांवर थोडासा विश्वास ठेवायला शिका.
वाहत्या पाण्यात नाणे टाका.
मिथुन
हा आठवडा चांगले आरोग्य, प्रगती आणि नवीन आर्थिक संधी घेऊन आला आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी, आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करा. कामाचा ताण जास्त असेल. अधिक जलद गतीने लाभ मिळण्यासाठी बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा. काही कौटुंबिक बाबींबद्दल चिंता आणि मानसिक तणाव दिसून येईल.
हीना अत्तर जवळ ठेवावे.
कर्क
या आठवड्याच्या सुऊवातीला तुम्हाला थकवा जाणवेल तसेच मानसिक तणावही जाणवेल. जवळपास प्रत्येक स्तरावर जुळवून घेणे आवश्यक आहे, तुम्ही धीर धरावा आणि गोष्टींमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे. आरोग्याबाबत जागरूक रहा, शिक्षणामुळे स्पर्धेत यश मिळेल. आपल्या योजना गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
अन्नदान करावे.
सिंह
इगोला जास्त महत्त्व देऊ नका. अंथरूण पाहून पाय पसरा आणि कोणतीही जोखीम घेऊ नका. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. बदलाच्या शक्मयता आहेत. तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अशोकाचे पान जवळ ठेवा.
कन्या
काही बाबतीमध्ये संघर्ष जाणवेल. हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या आजारांनी त्रस्त होण्याची शक्यता आहे. कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. जितका शक्य आहे तितका स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा.
फळांचे दान द्यावे.
तूळ
चांगल्या कामांचे फळ चांगलेच मिळते, याचा अनुभव या आठवड्यात येण्याची शक्मयता आहे. तुम्ही दुसऱ्यांकरता जे करता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जो फायदा होतो त्याने तुमचेही भले होते हे दाखवणाऱ्या घटना घडतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. आठवड्याच्या शेवटी सूचक स्वप्ने पडतील.
गाईची सेवा करावी.
वृश्चिक
कामाच्या ठिकाणी कष्ट करण्याला पर्याय नसेल. पण त्या कष्टाचे चीजही होईल. आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उत्साहात कमी आणि आळस यामुळे कामे पूर्ण होण्याकरता अडथळे येऊ शकतात. या आठवड्यात तुमची भेट अशा एखाद्या व्यक्तीशी होऊ शकते जिच्यामुळे अडचणी काही प्रमाणात कमी होतील. आठवड्याच्या मध्यावरती कामांचा वेग वाढवावा लागेल.
पिवळ्या कागदावर स्वस्तिक काढून जवळ ठेवा.
धनु
सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील. जुने मित्र भेटतील. कामांमधील अडचणी दूर होतील. कामे पूर्ण होण्यास वेळ लागला तरी तुम्ही केलेल्या कष्टाचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होईल. मनातील प्लॅन किंवा गुप्त गोष्टी कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली तरी सांगू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पद्धतीविषयी काळजी वाटू शकते.
मुंग्यांना साखर घालावी.
मकर
मुलांच्या अभ्यासावरून आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण राहील. तब्येतीची योग्य ती काळजी घ्या. आठवड्याची सुऊवात मनपसंत व्यक्तीच्या भेटण्याने होईल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत तुम्ही काही प्रमाणात रिलॅक्स असाल. कोर्टकचेरीच्या संदर्भात लेखी कामांना पूर्ण करताना सावध राहण्याचा इशारा देत आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
बत्तासे दान द्यावे.
कुंभ
मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो. गरजा आणि आवड यातील फरक समजून पैसे खर्च करावेत. नाहीतर वायफळ खर्च होईल. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात. पैशांची येणी वसूल करण्याची गरज आहे. तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांनी थोडे सबुरीने काम घ्यावे.
पिवळा रूमाल जवळ ठेवावा.
मीन
आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. छोटे मोठे आजार नंतर मोठा त्रास देऊ शकतात. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा असेल. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्या बरोबर योग्य तो व्यवहार ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणवू शकतो.
हिरवे मूग दान द्यावे.
घरात किंवा कामाच्या ठिकाणी काही लोकांना काचेच्या ग्लासमध्ये लिंबू टाकलेला तुम्ही पाहिला असेल. या मागचे कारण म्हणजे लिंबात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्तींना आकर्षून घेण्याची शक्ती असते. जर लिंबू पूर्ण बुडाला तर त्या जागी निगेटिव्ह शक्ती जास्त आहे असे समजावे. अशा वेळी समुद्री मीठ (खडे मीठ) रात्रीच्या वेळी आतून बाहेर पर्यंत टाकावे व सकाळी ते गोळा करून नाल्यात फेकून द्यावे.