राशिभविष्य अक्षरयात्रा
मेष
व्यक्ती तितक्मया प्रकृती याचा अनुभव येण्याची शक्मयता आहे. महत्त्वाचे काम होईल. कोणतेही काम करताना दूरदृष्टी ठेवा. जबाबदारीचे भान ठेवा. इतरांनी काय करावे त्यापेक्षा स्वत:ला काय करायचे आहे, याचा पहिला विचार करा. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका, म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायातील सध्याची परिस्थिती चांगली असेल.
लाल टिळा लावा.
वृषभ
भागीदारी व्यवसायातील करार करावयास हरकत नाही. दुसऱ्यांनी केलेल्या चुकीसाठी आपण राम राम करून आपल्याला त्रास देण्यामध्ये काही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालेल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या कामाला प्रत्यक्षात गती येईल. कौटुंबिक गरजा पूर्ण कराल. जोडीदाराला विश्वासात घ्या.
सफेद रुमाल जवळ ठेवा.
मिथुन
आपण बरे की आपले काम बरे, असा जर दृष्टिकोन ठेवला तर बऱ्याच अंशी मानसिक समाधान अबाधित राहील. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या अन्यथा प्रकरण आणखी बिघडू शकते. कठोर परिश्र्रम करण्यापासून मागे हटू नका. व्यवसायाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होईल. हाती पैसा असेल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. खोटे बोलणे टाळा.
बुंदी वाटा.
कर्क
प्रोफेशनल लाइफमध्ये समस्या येऊ शकतात. जवळच्या नातेवाईकांपैकी एखाद्याला मदत करण्याकरता सरकारी कार्यालयात जावे लागू शकते. कामाचा ताण तुम्हाला थकवा देईल. स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ काढा. काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. उत्पन्न वाढेल. त्यामुळे चांगला पैसा हाती राहील.
दूध दान द्या.
सिंह
शत्रूंपासून दूर राहणे चांगले. विनाकारण कोणाकडे बोट दाखवू नका, भांडणासाठी प्रवृत्त करू नका. मात्र, प्रकरण गुंतागुंतीचे झाले तर विजय तुमचाच असेल. भावनिक ताण-तणाव येऊ शकतो. मित्राच्या मदतीने झालेल्या ओळखीतून नवीन काम मिळण्याची शक्मयता आहे किंवा वाढलेले एखादे काम पूर्ण होईल. आरोग्याच्या समस्या दीर्घकाळ टिकण्याची शक्मयता आहे.
पिंपळाची मुळी जवळ ठेवा.
कन्या
आत्मविश्वास ही चांगली गोष्ट आहे पण अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. नुकताच झालेला वाद उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून राहिलेले बरे. तुम्ही स्वत:ला जास्त वेळ देऊ शकता. करिअर चांगले असेल आणि तुमचे जास्त लक्ष कामावर राहील. नवीन करार किंवा करारावर स्वाक्षरी करू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
केळीची पूजा करा.
तूळ
आपले ध्येय पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. कामावर लक्ष केंद्रित कराल. वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे घरच्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. डाव्या पायाला दुखापत होण्याची शक्मयता आहे. सावध राहा. शुक्रवारी महत्त्वाची बातमी कळेल. काही गोड आणि काही कटू अनुभवामुळे जगाकडे बघण्याची दृष्टी थोडीफार का होईना पण बदलेल.
ताक दान द्या.
वृश्चिक
काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही तुमच्या सासरच्यांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये. डोकेदुखी, चक्कर येणे, मायग्रेनसारख्या विकारांपासून सावध राहणे गरजेचे आहे. आठवड्यातील काही दिवस टेन्शनचे असतील पण पुढील काळासाठी उपयुक्त बदल घडतील.
हकीक जवळ ठेवा.
धनु
या आठवड्यात मिश्र्र स्वरूपातील अनुभव येतील. छद्मी लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. लोक तुमचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. स्वत:चे नुकसान होत नसेल तर दुसऱ्याची मदत करणे यात काही गैर नाही. पण आर्थिक बाबतीत सावध राहा. फसवी स्कीम किंवा तत्सम बाबतीतून फसवणूक होण्याची दाट शक्मयता आहे.
मुंग्यांना साखर घाला.
मकर
या आठवड्यात कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. मंगळवार-बुधवार आर्थिक नियोजन अवघड जाईल. डोळ्यांमध्ये विकार असलेल्या व्यक्तींपासून सावध राहा. धार्मिक आयोजनामध्ये भाग घ्याल, पण तिथे आपल्या नावाला जपा, हितशत्रू बदनाम करण्याचे कारस्थान रचू शकतात. कार्यालयातील गटबाजीमुळे मानसिक त्रास होण्याची शक्मयता आहे.
तिळेल दान द्या.
कुंभ
तुम्ही एखाद्याला काम सांगावे आणि त्याने ते काम टाळावे आणि त्यामुळे तुमच्या मनाला त्रास व्हावा, असे काहीसे होईल असे दिसते. जुना आजार उद्भवू शकतो, त्यासाठी तुम्हाला चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कौटुंबिक समस्या पुन्हा डोके वर काढतील. ज्यामुळे तुमचे टेन्शन वाढेल. अशावेळी शांत राहून वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले.
मोहरी खाणे टाळा.
मीन
स्वत:ला बदला जग बदलेल, हे या आठवड्यामध्ये अनुभवायला येईल. आर्थिक बाजू सम-विषम अशा मिश्र्र स्वरूपाची असेल. हा आठवडा एकंदर चांगला अनुभव देईल. आठवड्यातील काही दिवस टेन्शनचे असतील पण तुम्ही सांभाळून घ्याल. नात्यांबद्दल गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. चुकीचे पाऊल बऱ्याच कालावधीकरता त्रास देऊ शकते.
पक्ष्यांना दाणे घाला.
जर अपघात, रोग किंवा वारंवार पैशाचे नुकसान होत असेल तर घरात एक्वैरियम ठेवा. या मत्स्यालयात 7 गोल्डन फिश आणि 1 किंवा 2 ब्लॅक फिश ठेवा. असे मानले जाते की, असे केल्याने दुर्भाग्य देखील पाठलाग सोडते. जर एखाद्या माशाचा मृत्यू झाला तर तो आपले संकट घेतल्याचे संकेत आहे. अशा परिस्थितीत, मृत मासे त्वरित काढा आणि त्याच रंगाच्या नवीन माशासह पुनर्स्थित करा.