For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशीभविष्य

06:01 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशीभविष्य

चला बनवूया 2024 खरोखर हॅपी

Advertisement

 वेगवेगळ्या प्रचार माध्यमातून तुम्हालाही कळले असेल की, येणारे 2024 हे वर्ष शनीचे आहे. माझ्या गणिताप्रमाणे यावषी शुक्राचा अंमल जास्त असणार आहे.   ज्यांना अंक ज्योतिषाचे ज्ञान आहे त्यांना सहजपणे हे लक्षात येईल. यावषी जी माणसं प्रामाणिकपणे वागतात, कष्टकरी आहेत, चांगुलपणा आहे आणि त्यांचे कर्म चांगले आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्मयता आहे. मोठ-मोठ्या उपायांबद्दल सांगण्यापूर्वी फक्त तीन कामे करा, म्हणजे हे वर्ष तुम्हाला मोठा फायदा देऊ शकेल. पहिले काम म्हणजे घाम गाळणे. हा घाम तुम्ही व्यायाम करून घालवा किंवा कष्ट करून पण एक लक्षात घ्या, घाम गळाला पाहिजे. दुसरे काम म्हणजे आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस मंदिरात किंवा धर्मस्थळी जावा. तेथे थोडा वेळ घालवा आणि तिसरे काम म्हणजे कोणालाही कुठल्याही प्रकारे दुखवू नका. जे तुमच्या करता कामे करतात त्यांना जास्तीत जास्त खूश ठेवा. ज्यांच्या आयुष्यात आई-वडील आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की, जेवढे ते आपल्या आई-वडिलांची सेवा करतील तेवढा मेवा त्यांना मिळेल. या वर्षातील करायचे उपाय सुद्धा तुम्हाला बऱ्याच माध्यमातून पडले असतीलच पण उपाय हे काम कसे करतात हे समजणे आवश्यक आहे. सुरवात करण्यापूर्वी एक सिव्रेट तुम्हाला सांगतो. आपल्या मनामध्ये लाखो विचार रोज येत असतात. त्यामधील बरेचसे विचार आपले भले कसे होईल, किंवा आपल्याला हवी ती वस्तू कशी मिळेल, याबद्दलच असतात. आणि ते येतात आणि जातात सुद्धा. तुमच्या फायद्याचा कुठलाही विचार तुमच्या मनात आला की, मेंदूमध्ये atदस्atग्म्aत्ब् बरोबर त्या विरूद्ध विचार सुद्धा निर्माण होत असतात. आणि त्यामुळे होणारी कामे बिघडतात. आजचे विज्ञान सांगते की, कुठलाही विचार 17 सेकंदापर्यंत आपल्या मनामध्ये घोळत राहिला, म्हणजे दुसरा कोणताही विचार आला नाही तर त्या विचाराला मेंदूच्या शक्तीची जोड मिळते. त्यानंतरची 17 सेकंद आपल्या भावना त्या विचाराला जोडल्या जातात आणि त्यानंतरच्या 17 सेकंदामध्ये आपले subconcious mind  किंवा आपण ज्याला अंतर्मन म्हणतो, ते जोडले जात आणि तो विचार प्रत्यक्षात उतरतो. या प्रक्रियेला consructive interference किंवा सृजनात्मक हस्तक्षेप असे म्हणतात. म्हणजे विचारांची लहर, भावनांची लहर आणि अंतर्मनाची लहर या त्रिगुणात्मक शक्तीचा आविष्कार होऊन ती घटना प्रत्यक्षात घडते. तुम्हाला रेड कार थेअरीबद्दल माहीत आहे का? गंमत सांगतो. तुम्ही दिवसभरामध्ये किंवा गेल्या काही दिवसात कितीतरी कार पाहिल्या असतील. त्यातील लाल रंगाच्या कार किती होत्या असे जर मी तुम्हाला विचारले तर तुम्ही नक्की सांगू शकाल का? न्नाही ना. कारण तुम्ही नोटीस केलेले नाही, लक्ष दिलेले नाही. आता जर मी तुम्हाला सांगितले की, तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक रेड कारच्या बदल्यात मी तुम्हाला ऊ. 500/- देईन, तर तुमचे सगळे लक्ष लाल रंगाच्या गाड्यांकडे असेल. आपल्या आयुष्यामधील संधींच सुद्धा असच असते. त्या येत असतात, पण आपले लक्ष नसते. आपली एकाग्रता व आपले पूर्ण ध्यान जर संधीकडे ठेवले तर आयुष्याचे सोने व्हायला वेळ लागणार नाही. उपायांबद्दल  सांगायचे ते राहूनच गेले ना.

!!! बघूया पुढे कधीतरी. . . . !!!

Advertisement

मेष

Advertisement

संततीची प्रगती समाधानकारक होईल. काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर यश मिळण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाचीही शक्मयता दिसत आहे. पण संततीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. मन चंचल होण्याची शक्मयता दिसते. सध्या परीक्षेच्या तयारीचे दिवस आहेत. त्यांच्या अभ्यासात ते रमतात की, नाही याकडे लक्ष देणे हे पालक म्हणून तुमचे कर्तव्य आहे.

उपाय : मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.

वृषभ

सांभाळून राहण्याचे दिवस आहेत. तब्येतीची काळजी घ्या. मन अस्वस्थ राहील. मौल्यवान वस्तू हरवण्याची अगर चोरीला जाण्याची शक्यता आहे, सांभाळा. तब्येतीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्यात पथ्य पाळा. क्षणिक मोहाला बळी पडून तब्येतीची हेळसांड करू नका. मानाने रहा.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

मिथुन

जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपण जर एखाद्या स्वतंत्र उद्योगात असाल तर प्राप्ती चांगली होण्याची शक्यता आहे. उद्योगात प्रगती होईल. मात्र, शक्यतो वादविवाद टाळा. कुठेतरी ठेऊन विसरलेल्या अगर हरवलेल्या वस्तू सापडण्याची शक्मयता आहे. शोधा म्हणजे सापडेल. जोडीदाराबरोबर समजुतीने घ्या.

उपाय: नामस्मरण करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क

लॉटरी किंवा तत्सम मार्गाने अथवा स्त्रीकडून द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे. लॉटरीचे तिकीट काढून नशीब अजमावयाला काहीच हरकत नाही. पण नोकरीमध्ये सावध रहा. पैसा मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब चुकूनही कऊ नका. अडचणीत येण्याची शक्मयता आहे. कोणतीतरी मानसिक व्यथा सतावेल.

उपाय : मारूंतीची उपासना करा.

सिंह

हा आठवडा आपल्याला उत्तम जाणार असे दिसते. सत्संग घडेल. आपल्या हातून परोपकार घडेल किंवा करावासा वाटेल. मागे पाय घेऊ नका. पीडितांना आवश्य मदत करा. एखाद्या तीर्थक्षेत्री प्रवास घडण्याची शक्यता आहे. पूर्वी काही चांगली कामे केली असतील तर त्याची चांगली फळे मिळण्याची शक्यता आहे. आनंदी रहा व आनंद वाटा.

उपाय : दत्तगुरूंची आराधना करा.

कन्या

स्वतंत्र उद्योग काही असेल तर त्यात प्रगती होईल. अथवा नोकरीत बढती होण्याची शक्मयता आहे. साहजिकच मानमरातब वाढेल, पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढेल. याचीही जाणीव असू द्या. कर्ज प्राप्तीच्या प्रयत्नात असाल तर ते मिळण्याची शक्यता आहे. पितृसुख मिळेल. आठवडा चांगला जाईल.

उपाय : महालक्ष्मी पूजन करा.

तूळ

वडील भावंडांची काही निमित्ताने भेट होईल. दिवस आनंदात घालवाल. धनलाभ होण्याची शक्मयता आहे. भावंडाकडून अथवा मित्राकडून लाभ होण्याची शक्यता आहे. उंची वस्तूंची खरेदी होईल. काही नवीन, चांगल्या मित्रांच्या गाठीभेठी होतील. समारंभात भाग घ्याल. एकंदरीत आठवडा चांगला जाईल.

उपाय : गणेश आराधना करा.

वृश्चिक

खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्यासाठी खर्च झाला तर काही हरकत नाही. पण चैनीकरता खर्च जपून व विचार करून करा. अपव्यय नको, धन संचय करण्याचा प्रयत्न करा. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सांभाळून रहा. अध्यात्मविद्या मिळविण्यासाठी कार्यरत रहाल. वाहन सांभाळून चालवा. काळजी घ्या. नसते धाडस करू नका.

उपाय : हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनु

या आठवड्यात आपला स्वभाव नरम गरम राहील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही घटनेवर डोके तापवून घेण्यापेक्षा शांतपणे त्या गोष्टीचा विचार करा. मार्ग नक्की निघतो. मनाला आवर घाला. जोडीदारावर विश्वास ठेवा. आणि त्याला सहकार्य करा. फटकळपणे बोलून कुणाचे मन दुखवू नका.

उपाय : नामस्मरण करा.

मकर

कुटुंबासमवेत काळ आनंदात घालवाल. पैतृक संपत्ती संदर्भात काही चर्चा चालू असल्यास काही निर्णय होण्याची शक्मयता दिसते. काही दानधर्म कराल. दानधर्म करायचा विचार जरी आला तरी मागे हटू नका. ते करा व पुण्य पदरात पाडून घ्या. कधीतरी त्याचा उपयोग होईल. आपल्या बोलण्याने समोरील माणसाचे मन जिंकून घ्याल.

उपाय : गाईला खाऊ घाला.

कुंभ

लहान बहिणीसोबत छान काळ घालवाल. मित्र चांगले भेटतील. आपण ज्या कामात कार्यरत आहात त्या कामाचे चांगले चीज होईल. यश मिळेल. सतत उद्योगात रहाल. नोकरांचे चांगले सहकार्य लाभेल. पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्याल. आपण आपले काम चांगलेच व्हावे याबद्दल आग्रही असाल.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

मीन

मातृसुख मिळेल. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. एखादी नवीन विद्या शिकण्याचा प्रयत्न कराल अथवा तसा विचार कराल. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात काही विचार विनिमय होतील. या आठवड्यात आपल्याला खूप काही करावेसे वाटेल आणि तसा तुम्ही प्रयत्नही कराल. पण जे काही कराल ते शांतपणे व चांगल्या मनाने करा.

उपाय: दिव्यांगांना सहाय्य करा.

Advertisement
Tags :
×

.