For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:11 AM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

अतर्क्य... अद्भूत... अविश्वसनीय... चमत्कारिक... पण सत्य!!!

Advertisement

बुधवार दि. 4 डिसेंबर ते दि. 10 डिसेंबर 2024 पर्यंत...

आता एक गोष्ट सांगावीशी वाटते, मनुष्यप्राणी एका मिनिटाला 12 ते 20 वेळेला श्वास घेतो. म्हणजे तासाला 900, दिवसाला 21,600 म्हणजे वर्षाला 78,84,000. या हिशोबाने 70 ते 80 वर्षे इतके आयुष्य माणसाचे आपण मानतो. ज्योतिष शास्त्राrयदृष्ट्या माणसाचे आयुष्यमान हे 120 वर्ष आहे. आता थोडी तुलना कऊया. ससा मिनिटाला 60 श्वास घेतो, म्हणजे वर्षाला 31,53,600 आणि ससा आठ ते दहा वर्षे जगू शकतो. आता कासवाकडे वळुया. कासव मिनिटाला दोन ते तीन श्वास घेते. म्हणजे दिवसाला 2,880 आणि वर्षाला 10,51,200 याप्रमाणे कासव साधारणत: दीडशे वर्षे जगू शकते. म्हणजेच जितके दीर्घ श्वास आपण घेतो तितके जास्त आपण जगतो! आधुनिक विज्ञानानेसुद्धा हे मान्य केले आहे आणि त्याचा गणितीय फॉर्म्युला असा आहे. म्हणजे आपण किती जगणार याचाच अर्थ आपण किती श्वास घेणार असा होतो. म्हणून दीर्घ श्वसन हे एक वरदान आपण स्वत:ला देऊ शकतो. आपल्याकडे सनातन धर्मात 15 तिथी एका पक्षात आणि असे 2 पक्ष = 1 महिना.

Advertisement

स्वर चक्रात कृष्ण पक्षाच्या दशमांश प्रतिपदा, (1) द्वितीया, (2) तृतीया, (3) सप्तमी, (7) अष्टमी, (8) नवमी, (9) त्रयोदशी, (9) त्रयोदशीला उजवी नाकपुडी सक्रिय होते (13) चतुर्दशी, (14) अमावास्या, (15).

(स्वर चक्रात कृष्ण पक्षाच्या दशमांश प्रतिपदा (1), द्वितीया (2), तृतीया (3), सप्तमी (7), अष्टमी (8), नवमी (9), त्रयोदशी (13). त्रयोदशीला उजवी नाकपुडी सक्रिय होते. चतुर्दशी (14), अमावास्या (15).) तेथे इडा आणि पिंगला दिवसभरात 1-2 तासांच्या चक्रात आळीपाळीने कार्य केल्यानंतर, सूर्यास्तापर्यंत निर्दिष्ट दिवसात डाव्या नाकपुडीचे कार्य सुरू होईपर्यंत. कृष्ण पक्षात 4, 6, 10, 12 या दिवशी डाव्या नाकपुडीत सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी उजवी नाकपुडी वाहते. शुक्ल पक्षादरम्यान आपण उलटे पाहतो. पहिल्या 3 दिवसांच्या सूर्योदयाच्या वेळी डाव्या नाकपुडीतून वाहते आणि सूर्यास्ताच्या वेळी उजवीकडे आणि त्याच पर्यायी पद्धतीने ते पौर्णिमेपर्यंत जाते. शिव स्वरोदय/स्वर योग हे आश्चर्यकारक ज्ञान आहे जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जास्त वेळ न देता उपयोग करू शकता. (जे आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत खूप महत्त्वाचे आहे.) आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, जर आपण ते आपल्या दैनंदिन जीवनात लागू करू शकलो नाही तर त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण शेवटी प्रत्येक शहाणपणाचा भाग आपल्या दैनंदिन जीवनात प्रासंगिक आणि लागू असावा. सर्वप्रथम तिथी आणि स्वर यांची सांगड अतिशय महत्त्वाची आहे. ज्यामध्ये आपण आपल्या सूक्ष्म स्वराचे परीक्षण करू शकतो आणि मॅक्रोकॉस्मिक स्वराशी सुसंगतपणे सेट करू शकतो. त्यामुळे आपला श्वास किंवा स्वर थेट विश्वचक्राशी जुळतो, चांगले रिसल्ट मिळतात. म्हणून सकाळी जेव्हा आपण अंथऊण सोडतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आपला स्वर तपासावा. तो स्वर त्या तिथीशी सुसंगत ठेवायचा. म्हणजे आपण वैश्विक ऊर्जेशी जुळवून घ्यायचे आणि दिवसाची सर्वोत्तम सुऊवात करायची, आता रोजच्या जीवनात काय करायचे ते पहा.

सकाळी उठणे आणि अंथरूण सोडणे : जेव्हा आपण सकाळी उठतो आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येसाठी अंथरूण सोडत असतो, तेव्हा फक्त आपला स्वर किंवा नाकपुडी श्वासोच्छ्वासाचा प्रवाह तपासा, तो उजवीकडे आहे की डावीकडे (सूर्य स्वर की चंद्र स्वर)? मग तिथीनुसार तो स्वर जुळवायचा.

बघा आणि तुम्ही सकाळी उठल्यावर खालील स्टेप्स फॉलो करा :

1) सकाळी उठा, 2) तुमचा स्वर तपासा, 3) तिथीनुसार स्वर तपासा, 4) जर ते स्वर चक्राशी सुसंगत नसेल तर बदला. (कसे ते सांगतो नंतर) 5) स्वर चक्रानुसार उजवा किंवा डावा पाय जमिनीवर ठेवा. 6) स्वराचे भान ठेवून दैनंदिन कामांसाठी जा. वॉशरूमला जाणे : सामान्यत: शौच प्रक्रिया सूर्यनाडी (उजवी नाकपुडी) सक्रिय असते त्या वेळीच करावी. पोटाचे आरोग्य चांगले राहते. कामासाठी जात असताना : जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर जाता तेव्हा फक्त तुमचा स्वर तपासा आणि मग तो पाय आधी घराबाहेर ठेवा आणि नंतर कामावर जा, यामुळे तुमची जागरूकता श्वासासोबत जागरूक राहण्यासाठी प्रशिक्षित होईल, ज्यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढते. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण : सूर्य स्वर हा पचनासाठी योग्य स्वर आहे. कारण या स्वरादरम्यान प्राणिक ऊर्जा शिवस्वरोदय/स्वर योगानुसार पचन प्रक्रियेस मदत करते, म्हणून नेहमी जेवण करण्यापूर्वी तुमचा स्वर तपासा आणि सूर्य स्वरादरम्यान जेवण घ्या.

मेष

घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्मयता आहे. धीराने घ्या. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.

उपाय : धार्मिक कार्य सतत करीत रहा.

वृषभ

चांगला काळ आहे. नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. व्यवसायात चाललेल्या प्रयत्नांना यश येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने तोंड द्याल. व्यवसाय, उद्योगात आपणास विरोध करणाऱ्या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्मय होईल.

उपाय : मासे पकडू नका. खाऊ नका.

मिथुन

कर्तव्य भावना ठेवून वागावे. पत्नीचा सल्ला उपयोगी पडेल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. आपल्या वक्तृत्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. वरिष्ठांशी मर्जी संपादन कराल. वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्त्वाकांक्षा वाढवावी लागेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

उपाय : मांसाहार व नशापाणी यापासून सक्त दूर रहा.

कर्क

जास्त इमोशनल झाल्यास नुकसान संभवते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उत्तरार्धात वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. भावंडातील ऊसवे-फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.

सिंह

कामाचा व्याप सांभाळता येणे अवघड दिसते. आलेल्या संधीचा फायदा घ्या. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तऊणांना मनाजोगे काम मिळेल. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणाऱ्या घटना घडतील.

उपाय : गूळ दान द्या.

कन्या

आपण केलेल्या कामाबद्दल दुसऱ्यांकडून ऐकून घेऊ नका. व्यवसायात आर्थिक उलाढाल केली जाईल. भागीदारी व्यवसायातून नवीन उपक्रम राबविणे शक्मय होईल. परदेशातील लोकांशी सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तऊणांना मनाजोगे काम मिळेल.

उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.

तूळ

आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. सध्याचे ग्रहयोग आपली आवक वाढविणारे आहेत. अचानक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पत्नीची मर्जी सांभाळा.

उपाय : तुरटीने दात घासा.

वृश्चिक

चादर पाहून पाय पसरावेत. आपल्या मताचा समाजात आदर होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तुंची खरेदी होईल.

उपाय : काळे वस्त्र दान द्या.

धनु

कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. अनुकूल घडामोडी घडतील. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाल. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. स्थितप्रज्ञ राहून महत्त्वाचे निर्णय घ्या.

उपाय : केळीच्या झाडाची पूजा करा.

मकर

आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. दुसऱ्यांकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्यादृष्टीने लाख मोलाचा ठरेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

उपाय : गायीची सेवा करा.

कुंभ

प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. तुमचा सरळ स्वभाव आणि मजबूत व्यक्तिमत्त्व या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडाल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. दुसऱ्यांकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम लाभाचे ठरेल.

उपाय : पांढरे कपडे वापरू नका.

मीन

परक्मया माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. नवीन जबाबदारी स्वीकाराल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. गुप्तशत्रूंपासून सावध रहा. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसाय उद्योगात प्रगती होईल.

उपाय : अन्नदान करा.

Advertisement
Tags :

.