For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:05 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

दि. 20.10.2024 ते 26.10.2024 पर्यंत

Advertisement

मेष

प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांसोबत आनंद वाटेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विचारांमध्ये येणाऱ्या बदलामुळे तुम्ही मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. सकारात्मकतेमुळे तुमचा प्रभाव अनेक लोकांवर राहील. लोकांच्या मदतीमुळे तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या करिअरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तिंचा पाठिंबा मिळेल.

Advertisement

लोखंडाचा तुकडा जवळ ठेवा.

वृषभ

महत्त्वाचे निर्णय घेताना दूरदृष्टी ठेवावी लागेल. कामाशी संबंधित अनेक गोष्टी बदलू शकतात. तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्र्रम करावे लागतील. कामाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला योग्य माहिती मिळेल. जुन्या गोष्टींमुळे विवाद होऊ शकतात. आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तब्येतीकडे गांभीर्याने घ्या.

शिंगे नसलेल्या काळ्या गायीला चारा घाला.

मिथुन

जुनी कर्जे फेडण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. तुमच्या प्रत्येक स्रोताचा योग्य वापर करा. वैयक्तिक जीवनात तुमच्या विचारानुसार बदल करणे शक्मय होईल. तुम्हाला आळस आणि नकारात्मकतेपासून दूर रहावे लागेल. बँकिंग किंवा कॉमर्सशी संबंधित लोकांना नवीन प्रशिक्षण मिळेल, ज्याद्वारे त्यांना लाभ मिळू शकेल.

पिवळी मोहरी जवळ ठेवा.

कर्क  

कुटुंबातील काही लोक तुमच्या जोडीदाराशी नकारात्मक वागतील. तुमच्या जोडीदाराला साथ द्यावी लागेल. तब्येतीची काळजी घ्या. काही कारणामुळे वेदना होऊ शकतात. तुम्ही जे लक्ष्य साध्य करण्याचा विचार करत आहात ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडवून आणेल. अडचणींचा सामना केल्याने व्यक्तिमत्त्व सुधारेल आणि आयुष्याला योग्य दिशा मिळेल.

तुरटी जवळ ठेवा.

सिंह 

तुम्ही करत असलेल्या पैशासंबंधीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. कामातील महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कामात शिस्त वाढवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. तुमच्या जोडीदाराशी कठीण विषयांवर चर्चा होऊ शकते. काही अनामिक भीतीमुळे त्रास होऊ शकतो. पोटाशी संबंधित समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करा.

गुलाब जवळ ठेवावा.

कन्या

निराशेमुळे इतरांबद्दल नकारात्मक विचार करू नका. अन्यथा तुमची प्रतिमा ही नकारात्मक होईल. अस्वस्थतेमुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. जवळच्या लोकांच्या जीवनातून लक्ष हटवून स्वत:च्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जीवनावर वाढेल. तुम्हाला सकारात्मक रहावे लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

गोग्रास काढून ठेवा.

तूळ

जास्त विचार न करता वेळेवर निर्णय घ्या. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला योग्य वाटणाऱ्या गोष्टी निवडून तुमचे काम करा. अनेक कामांमध्ये भावनिकरित्या अडकल्याने प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे काम पूर्ण करणे कठीण होईल. नातेसंबंध सुधारण्यासाठी जोडीदाराच्या प्रयत्नांवर लक्ष देणे आवश्यक आहे. अपचन दूर करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

निळी फुले गटारात टाका.

वृश्चिक 

जुन्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे तुम्हाला योग्य गोष्टी करणे कठीण होऊ शकते. जुन्या आठवणींपासून स्वत:ला दूर ठेवा आणि वर्तमान गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. पैशाशी संबंधित नकारात्मकता लवकरच दूर होईल. यश टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. करिअर, नाते सुधारण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडा.

जुन्या विहिरीचे पाणी घरी ठेवा.

धनु

कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आनंदी दिसेल, यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकेल. कुटुंबातील सर्व सदस्य लवकरच एक मोठा निर्णय घेतील, ज्यामुळे कौटुंबिक जीवन सुधारेल. एखादी मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्मयता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन ग्राहक मिळतील, लाभ होईल. तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद वाटेल.

गुलाबाचे अत्तर लावा.

मकर

जुन्या प्रकरणांशी संबंधित चर्चेमुळे तुम्हाला निराश वाटू शकते. जे लोक तुमची बाजू समजून घेऊ शकत नाहीत त्यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवा. आपल्या भावनिक गरजांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. करिअरशी संबंधित नुकसान भरून काढणे शक्मय आहे. त्याकरता कामात बदल करण्याचा प्रयत्न करत रहा. अपेक्षित संधी अचानक येऊ शकते: नातेसंबंध चांगले राहतील.

पिंपळाला दूध मिश्रित पाणी घाला.

कुंभ 

जोडीदाराशी ताळमेळ योग्य राहील. तब्येतीच्या बाबतीत हयगय करू नका. शरीरावर सूज येऊ शकते. रक्तदाब नियंत्रणात ठेवावा लागेल. कामाशी संबंधित निराशा होऊ शकते. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या कामावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सध्याच्या परिस्थितीत काही तडजोड करून स्वत:ला सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करा.

नदीत जुने नाणे टाका.

मीन

सध्याच्या परिस्थितीत मिळत असलेल्या संधींचा स्वीकार करून आपले काम सुरू ठेवा. भविष्याशी संबंधित काळजी तुम्हाला त्रास देऊ शकते. परंतु आज भविष्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर काम करणे शक्मय नाही. म्हणून, असे विचार सोडून द्या आणि नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात कामाचा विस्तार करणे सोपे होईल.

मध जवळ ठेवा.

जर घटस्फोटाची वेळ येईपर्यंत प्रकरण गेले असेल आणि तुम्हाला तसे नको असेल तर  तीन गोमती चव्रे घ्या आणि ती तुमच्या निवासस्थानाच्या दक्षिणेकडे शनिवारी सायंकाळी फेकून द्या. यासोबतच पूजेच्या कुंकवाच्या डबीत पाच गोमती चक्र ठेवा, ज्याने कपाळी टिळा किंवा कुंकू लावता येईल. भगवदइच्छा असेल तर असे रोज केल्याने वाद संपतील आणि संबंध सामान्य होतील.

Advertisement
Tags :

.