For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

दि. 8-9-2024 ते 14-9-2024 पर्यंत

Advertisement

मेष

कामाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये ऊबाब वाढणार आहे. घरासंबंधी कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांचे मत विचारात घ्यावे. तब्येतीचा पाया सर्वसाधारण राहील. एखादी अशी संधी दृष्टिक्षेपात येईल त्याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. धनागम सहजतेने होईल. प्रेमींनी सुसंवादाचे महत्त्व लक्षात घ्यावे. आशादायक घटना घडेल.

Advertisement

उजव्या मनगटात लाल धागा बांधावा.

वृषभ

आर्थिक विवंचना कमी होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा त्रास होऊ शकतो. पैसे साठवण्याकडे कल राहील. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल आणि त्याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. प्रेमींना उपहार मिळू शकतो.

चंदनाचा धूप लावावा.

मिथुन

तुमचे दुसऱ्यांबरोबर असलेले संबंध सुधारतील. काही व्यावसायिक संधी हातातून निसटण्याची संभावना आहे. स्पर्धकांना तुमच्याविरु द्ध कट-कारस्थान करण्यासाठी वाव देऊ नका. या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. मन थोडे हळवे राहील. पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो.

हळद घातलेले पाणी पिंपळाला घालावे.

कर्क

तुमच्या दृष्टिकोनात जर बदल केला तर कित्येक गोष्टी सोप्या होतील. हट्टीपणामुळे मने दुखावण्याची शक्मयता आहे. तुमचे म्हणणे योग्य शब्दात मांडा. पुढे काय होईल याच्या चिंतेने तुमचा आब खराब करू नका असा संदेश आहे. अडकलेल्या कामांना गती मिळेल. नवीन ओळखी होतील. ज्या पुढे फायदेशीर ठरतील.

सफेद हात रुमाल जवळ ठेवावा.

सिंह

चारी बाजूने जबाबदाऱ्यांचा भडिमार होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दमछाक होऊ शकते. प्रियजनांबरोबर चर्चा करून मार्ग काढाल. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा असे वाटेल. जितके शक्मय आहे तितके कामांना प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवन उत्तम असेल. पैशांची आवक सर्वसाधारण असेल.

हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी.

कन्या

आपण बरे आणि आपले काम बरे असे धोरण कामाच्या ठिकाणी ठेवल्यास त्रास होणार नाही. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. विरोधक मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील पण आपण स्थिर राहावे. नात्यांमध्ये विश्वास संपादन कराल. प्रेम संबंधांमध्ये कोणताही निर्णय घेण्याआधी पुनर्विचार करणे योग्य ठरेल. अनपेक्षितरित्या पैशांची आवक वाढेल.

जांभळ्या रंगाचे वस्त्र दान करावे.

तूळ

आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही, ज्याचा अभाव आहे अशा गोष्टींच्या बद्दल तुम्ही जास्त विचार कराल. येणारा आठवडा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींसाठी धन्यवाद घेण्याकरता वापरावा असा संदेश आहे. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. नात्यांमध्ये एक अनामिक हुरहुर राहील. कौटुंबिक सुख उत्तम असेल.

वडाची मुळी जवळ ठेवावी.

वृश्चिक

कामकाजाचा तणाव जाणू शकतो. कामासंबंधी इतरांशी वाद संभवतात. नात्यांना बळकटी देण्याकरता वेळ द्यावा लागेल. काही काम उशिरा सुरू झाल्याने मन:स्ताप होऊ शकतो. या आठवड्यात उधार देणे वा घेणे टाळावे. लेखी व्यवहाराशिवाय आर्थिक व्यवहार करू नये. प्रेमींना निसर्गरम्य ठिकाणी जावेसे वाटेल.

लाल मिठाई सुरक्षाकर्मींना भेट द्या.

धनु

काबाडकष्ट करूनही योग्य परतावा आपल्याला का मिळत नाही असे तुम्हाला या आठवड्यात वाटण्याची शक्मयता आहे. नातेवाइकांकडून किंवा मित्रांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावनासुद्धा होऊ शकते. या सगळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे असा, संदेश आहे. आठवड्यातील एखादी घटना तुमचे चित्त विचलित करू शकते.

काळा धागा उजव्या पायात बांधावा.

मकर

मानसिक अशांतीपासून सुटका मिळेल. आल्हाददायक घटना घडेल. जवळ राहणाऱ्या नातेवाईकांकडे जाण्याचा योग येईल. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. एखाद्या समारंभात भाग घ्याल. उत्साहवर्धक घटना घडण्याची शक्मयता आहे. नोकरीकरता प्रयत्न करत असाल तर योग्य वेळ आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. आपले बेत उघड करू नका.

बेलाच्या झाडाला पाणी घालावे.

कुंभ

अति विचार आणि अति काळजी केल्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. ज्या न घडलेल्या घटनांबद्दल तुम्ही विचार करत आहात आणि काळजी करत आहात त्यांच्याबद्दल भीती बाळगण्याची काहीच गरज नाही, असा संदेश आहे. घरातील व्यक्तींकरता खर्च कराल. स्त्राrवर्गाचा विशेष सहयोग प्राप्त होईल. कामे यशस्वी होतील. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुंग्यांना साखर घालावी.

मीन

प्रत्येक वेळी तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील असे नाही हे या आठवड्यात अनुभवायला येईल. कामांना प्राधान्य न दिल्याने नियोजन चुकू शकते. कामाच्या ठिकाणी एखादी चूक महागात पडू शकते. कामांच्या व्यापामुळे हैराण व्हाल. पुढे घडलेल्या, घडणाऱ्या घटनांबद्दल अगोदरच विचार करून ठेवणे गरजेचे असेल. नात्यांना वेळ देणे गरजेचे आहे.

धार्मिक स्थळी केळी दान करावीत.

टॅरो उपाय : काही वेळा असे घडते की, घरातील व्यक्तींमध्ये सुसंवाद रहात नाही. कोणीही एकमेकांचे ऐकत नाही. ऊसवा राहतो. अशा वेळी थोडे मीठ घ्यावे, लोखंडाचा मोळा त्यामध्ये फिरवत सगळे एकमेकांसोबत आनंदी आहेत अशी कल्पना करावी आणि ते मीठ जेवणात वापरावे.

Advertisement
Tags :

.