For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशि भविष्य

06:01 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशि भविष्य
Advertisement

दि. 28-7-2024 ते 3-8-2024

Advertisement

मेष

या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही वेळेला त्यामध्ये  स्वत:कडचे पैसे गुंतवून भविष्याच्या दृष्टीने फायद्याचा विचार करावा लागू शकतो.   काही लोक जाणून-बुजून तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संघर्ष करावा लागू शकतो. कुटुंबीयांच्या मदतीने पार व्हाल.

Advertisement

चांदीचे नाणे जवळ ठेवा.

वृषभ

तुम्ही सध्याला नात्यांमध्ये गोडवा कधी येईल किंवा नाती कधी सुधारतील याचा विचार करत आहात किंवा प्रतीक्षा करत आहात. एखाद्या ज्येष्ठ स्त्राrचा प्रभाव तुमच्यावर असल्याने एक प्रकारची आत्मीयता येईल. कामाच्या ठिकाणी योग्य तो बॅलन्स निर्माण करण्यावर तुमचा भर असेल.

तुरटी जवळ ठेवावी.

मिथुन

या काळामध्ये तुम्हाला अधिकार प्राप्तीचे योग आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वातली शक्तिशाली बाजू या आठवड्यामध्ये पुढे येईल. मित्र परिवाराच्या बाबतीत किंवा नातेवाईकांच्या बाबतीमध्ये काही नकारात्मक गोष्टी समजू शकतात किंवा एखादी वाईट बातमी कळेल. जवळच्या व्यक्तीचे बोलणे खटकेल. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे.

दूध दान द्यावे.

कर्क

तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या संकटांना किंवा येणाऱ्या अडचणींना साहसाने सामोरे जाता याची प्रचिती देणारा हा आठवडा असेल. तब्येतीच्या काही तक्रारी पूर्वी घडल्या असतील तर त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसेल. वैद्यकीय उपचारामध्ये बदल करू शकता. या काळात तुमच्या पॅशनकडे लक्ष द्या. स्वप्नपूर्तीचा काळ आहे.

गरजूंना अन्नदान करावे.

सिंह

कामांना जरी उशीर झाला तरी ती कामे पूर्ण होणार आणि त्यातून आर्थिक प्राप्ती चांगली असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही. त्याचबरोबर मानसिक समाधानसुद्धा प्राप्त होईल. पूर्वी जास्त संबंध नसलेली अशी एखादी व्यक्ती कामानिमित्त भेटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता वाटेल. मित्रांपासून सावध रहा.

गुळ दान द्या.

कन्या

काहीसा विचित्र असा योगायोग घडलेला दिसेल ज्यामध्ये अत्यंत जवळच्या माणसांच्या मुळेच कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. खर्चाच्या बाबतीमध्ये बेफिकीर राहणे, पुढच्या काळाच्या दृष्टीने थोडे त्रासदायक ठरू शकते. एखाद्या मित्रांनी दिलेला शब्द मोडल्यामुळे केलेला प्लॅन बदलून दुसरा करावा लागेल.

अंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध घाला.

तूळ

वैवाहिक जीवनामध्ये जर तणाव आणि काहीसा असमंजसपणा अनुभवाला येत असेल तर घरातील किंवा परिचयातील ज्येष्ठ स्त्राrच्या मध्यस्थीमुळे किंवा सल्ल्यामुळे नाते सुधारायला मदत होईल. विवाहोत्सुक लोकांना या काळात चांगली संधी मिळू शकते. या आठवड्यात मर्जी नसताना त्याग करावा लागू शकतो.

गोड खाऊन कामाला जावे.

वृश्चिक

गेले काही दिवस जी कन्फ्युजनची स्थिती होती, आर्थिक आणि सामाजिक प्रॉब्लेम्सना सामोरे जात होता, या आठवड्यामध्ये तुम्हाला यामध्ये फरक जाणवायला सुऊवात होईल. अपेक्षा नसताना एखाद्याकडून मदत प्राप्त होणे, नवीन काम मिळण्यासाठी हव्या त्या व्यक्तीची भेट होणे, अशा घटना घडू शकतात.

डाव्या मनगटावर 63 नंबर लिहा.

धनू

वातावरण बदलेल. या आठवड्यामध्ये तुमचे विचार आणि तुमचे आचरण शांत आणि समंजस असेल. नवे हेवेदावे किंवा भांडणापासून तुम्ही दूर रहाल. त्याचबरोबर येणाऱ्या काळाबद्दल एक प्रकारचा आशावाद निर्माण होईल. कुटुंबातील व्यक्तींकरता किंवा घराकरता थोडा खर्च करावा लागू शकतो. नवीन वाहन घेणे टाळा.

5 वेलदोडे जवळ ठेवावे.

मकर

या आठवड्यात काही प्रसंग असे येतील की जिथे तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जे येते किंवा तुम्हाला आतून जे वाटते, त्यानुसार निर्णय घ्यावे लागतील. अशावेळी बुद्धीपेक्षा आतल्या आवाजाकडे जास्त लक्ष द्या, फायदा होईल. नात्यांमध्ये गैरसमज किंवा कटूता निर्माण होऊ शकते. इन्व्हेस्टमेंटमधून चांगले रिटर्नस् मिळू शकतात.

पावसाचे पाणी स्वयंपाक घरात ठेवा.

कुंभ

प्रगतीकरता संघर्ष अत्यावश्यक असतो हे या आठवड्यामध्ये तुम्हाला कळून चुकेल. या संघर्षातून चांगल्या प्रतीचे यश प्राप्त होईल यात शंका नाही. कष्टाचे प्रमाण वाढवावे लागणार, मेहनत घ्यावी लागणार आणि ही फेज बऱ्याच दिवसांकरता टिकू शकते. आत्मविश्वासात वाढ होणार. या काळात तुमचे संवाद कौशल्य वाढेल.

पिंपळाच्या पानावर स्वस्तिक काढून जवळ ठेवा.

मीन

जे काम तुम्ही करत आहात त्यातून सकारात्मक परिणाम मिळेल याची खात्री बाळगा. तब्येतीच्या कारणामुळे किंवा भावनिक गुंतागुंतीमुळे कामाकडे दुर्लक्ष होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागेल. भविष्यात घडणाऱ्या जबरदस्त बदलावाकडे तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. दानधर्म आणि पुण्याकडे तुमचा कल असेल.

धार्मिक ठिकाणी बदाम दान द्या.

टॅरो उपाय : हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे. एका तमालपत्रावरती तुमची इच्छा हिरव्या शाईने लिहून खाली सही करावी. तमालपत्रावर थोडी दालचिनीची पावडर पेरावी. एका भांड्यात भीमसेनी कापराच्या पाच वड्या पेटवून ते तमालपत्र अग्नीत घालावे. घालत असताना इच्छापूर्तीचाच विचार करावा. चांगला अनुभव येईल.

Advertisement
Tags :

.