राशिभविष्य
मेष
कुणावरही अति विश्वास करणे टाळा. पैसे खर्च होताना त्यावर लक्ष द्या. संभ्रमित राहू नका. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. व्यावसायिकांच्या कामात वैविध्य येऊ शकेल. कार्यक्षेत्रात मान मिळतील. काही प्रसंग मानसिक ताण वाढवतील. एखाद्या ओळखीतून व्यवसाय विस्तारास मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.
मंदिरात नारळ अर्पण करा
वृषभ
आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचा सल्ला उपयोगी पडेल. आजचा दिवस व्यस्त राहू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांची मदत मोलाची ठरेल. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सकारात्मक वार्ता मिळू शकतील. व्यवसायात नवीन प्रकल्पाचा करार करताना सर्व बाबी तपासून घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या माहिती, ज्ञान, अनुभवात भर पडेल. एखादी घटना मन खिन्न करू शकेल.
तांदूळ दान करा.
मिथुन
समाज कार्यात खूप वेळ जाईल. नोकरीत नवीन कामे हाताळण्याची शक्मयता. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष देणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. जोडीदाराशी असलेले नाते आणखी दृढ होईल. मन प्रसन्न राहील.
घरात गंगाजल ठेवा
कर्क
छोटे प्रवास होतील. अनेक दिवसांपासून ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील. हितशत्रूदेखील प्रशंसा करतील. विरोधक परास्त होतील. व्यापारी वर्गासाठी लाभदायक दिवस. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल. कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होऊ शकेल.
झाडाखाली सप्त धान्य ठेवा. यामध्ये बाजरी, गहू यांचा समावेश आवश्यक.
सिंह
मानसिक खंबीरता ढळू देऊ नका. अडकलेल्या प्रŽाची उत्तरे मिळतील. भावंडांची मदत लाभदायक ठरू शकेल. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहाय्य लाभेल. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. नवीन विचार तत्काळ अमलात आणल्यास फायदा होईल. मित्रांची साथ उपयुक्त ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद संभवतात.
गंगाजल आणि चांदीचा तुकडा आपल्याजवळ सतत ठेवा.
कन्या
जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयात एकाग्रतेने केलेल्या कामाचा लाभ मिळेल. ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या सुटतील. मित्रांना मदत केल्यास आपल्यालाही उत्तम सहकार्य लाभेल. प्रामाणिकपणे केलेले काम फायदेशीर ठरेल. दैनंदिन व्यवहाराचे व्यापारी, व्यावसायिकांना लाभाचा आठवडा.
चिमण्यांना दाणे टाका.
तुळ
नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. घरामध्ये अतिवाद टाळा. दिवसाची सुऊवात उत्साहवर्धक असेल. शुभवार्ता मिळू शकतील. कार्यालयात टीमवर्कचा अनुभव घ्याल. मात्र, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. कुटुंबात आपली पत वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. लहान भावंडांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण कराव्यात.
मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी करा.
वृश्चिक
मुलांबरोबर उत्तम वेळ घालवाल. जुनी येणी वसूल होतील. आठवड्याच्या सुऊवातीला अधिक मेहनत घ्यावी लागेल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जोडीदारासोबत अमूल्य वेळ व्यतीत कराल. पालकांचे उत्तम सहकार्य लाभेल. ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने चिंता दूर होऊ शकतील.
पांढरी टोपी,पांढरा ऊमाल किंवा पांढरी पगडी डोक्मयावर ठेवत जा.
धनु
जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. खेळ-कलेत लोकांकडून वाहवा होईल. सामाजिक क्षेत्राचा विस्तार होऊ शकेल. मान, सन्मान, प्रसिद्धी लाभेल. रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. मनोकामना पूर्ण होतील. कार्यालयात कोणत्याही वादात पडू नये. फायनान्स क्षेत्रातील व्यक्तींना मदतीची गरज भासेल. आठवड्याच्या उत्तरार्धात सुखद वार्ता मिळू शकतील.
घरात ‘जाते’( पिठाची चक्की )असावे.
मकर
सामाजिक कार्यामुळे आपली प्रशंसा होईल. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल. आजचा दिवस मध्यम फलदायी. कौटुंबिक वाद टाळावेत. कामकाज उत्तम पद्धतीने होईल. व्यवसायातील नफ्याने आनंदाची अनुभूती घ्याल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. दिवसभरात अनेकविध संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाचे योग असले, तरी खर्चांवर नियंत्रण हिताचे ठरेल.
वटवृक्षाला पाणी टाका.
कुंभ
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अति तिखट पदार्थ टाळा. टीमवर्कचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस. संवादातून नवीन कल्पना सुचतील. परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस. भावंडांच्या मदतीने कुटुंबातील समस्या संपुष्टात येईल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. मात्र, नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस नाही.
धार्मिक अनुष्टान करा.
मीन
आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे लोकांकडून सन्मान होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यापारात नियोजन, व्यवस्थापनातून लाभ मिळतील. नवीन कामाची ऊपरेषा आखाल. विद्यार्थ्यांना मेहनत घेतली, तर सकारात्मक यश मिळू शकेल. सासरच्या व्यक्तींशी असलेले नातेसंबंध सुधारतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीच्या योजना अमलात येऊ शकतील.
रात्री दूध पिऊ नका.
टॅरो उपाय: आपण बऱ्याचदा एखाद्या रम्य ठिकाणी जेवायला जातो, जसे एखादे उद्यान, नैसर्गिक ठिकाण इत्यादी. अशा वेळेला जेवण करायच्या अगोदर एका पानावर तयार जेवणातला प्रत्येक पदार्थ थोडा थोडा घेऊन त्यावर थोडा गुलाल पेरावा आणि दूर ठिकाणी ठेवून यावे. अन्नाला नजर लागत नाही.