For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

गुणमीलन घाला चुलीत, आज एकनाड हा विषय

Advertisement

तर मित्रहो, मंगळ दोषाच्या बाबतीत इतकी चर्चा केल्यानंतर खालील मुद्दे मला पुन: पुन्हा सांगावेसे वाटतात.  1 : मंगळ दोष हा मंगळ दोष नसून ‘मंगळ योग’ आहे  आणि कित्येक वेळेला  हा मंगलच करतो.  2 :  मंगळ योग हा सेक्सुअल रिलेशन/शारीरिक संबंध  कसे असतील याचे निर्देशन करतो. 3 : मंगळ योगामुळे पार्टनरचा किंवा पार्टनरच्या घरच्यांच्या कुणाचा तरी  मृत्यू होतो हे धादांत असत्य आहे. 4 : मंगळ योग  हा लग्न  म्हणजे प्रथम स्थानावरून, चंद्र जिथे बसला आहे तिथून, आणि शुक्र जिथे बसला आहे तिथून पाहिला जातो, जर हे पॅरामीटर लावले  तर आपल्यापैकी 70 टक्के लोक हे सो कॉल्ड मांगलिक आहेत. 5 :आपण सगळेच मांगलिक आहोत!!! आयुष्यातून कमीत कमी 60 वेळा गोचरीच्या मंडळाने मांगलिक होतोच. 6: मंगळ असल्यामुळे लग्नाला उशीर होतो हे केवळ तुमच्या मनातील किंवा समाजाच्या मानसिकतेमुळे होते. मंगळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. केवळ मंगळ दिसला म्हणून  ती पत्रिका नको असे सांगणारे  कुडबुडे ज्योतिषी याला जबाबदार आहेत. इतके सगळे मुद्दे तुम्हाला सांगून झाल्यानंतर आता तरी मंगळाचा  (मुद्दाम फुगवला गेलेला) फुगा फुटायला हरकत नाही अशी आशा आहे. मंगळदोषानंतर आणखीन एक प्रचंड मोठा  गैरसमज  समाजमनामध्ये आहे तो म्हणजे एक नाड दोष. मुळात 27 नक्षत्रांना तीन भागांमध्ये विभागून म्हणजे एका भागात नऊ नक्षत्रे याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य अशा तीन नाड्या ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णिलेल्या आहेत. अशीही एक समजूत समाजमनामध्ये आहे की एकनाड असली पण ब्लड ग्रुप वेगळा असला तर लग्न करायला हरकत नाही. ज्या कुठल्या महान आत्म्याने हा शोध लावला,  त्याला साष्टांग दंडवत! त्याच्या ज्ञानाला कोटी कोटी प्रणाम!!!! ब्लड ग्रुप म्हणजे काय नाडी म्हणजे काय त्याचा थांगपत्ता नसताना पायात साप सोडणाऱ्या अशा लोकांना पोकळ बांबूचे फटके द्यायला हवेत असे वाटते. (एकनाड आहे आणि ब्लड ग्रुप वेगळा आहे तर करा लग्न  असे सांगणारे ज्योतिषी. . .  काय म्हणावे. . .  जाऊ द्या, लेखामध्ये शिवी असल्याचा डाग नको). एक नाड असेल तर मुले होत नाहीत या समजुतीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, अजिबात नाही. एक नाड असेल तर होणाऱ्या संततीमध्ये उपजत व्यंग असते यालाही कुठलाही शास्त्रीय आधार नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. खोटे आहे. कृपा करून वरील दोन वाक्मये पुन: पुन्हा वाचा आणि आपल्या मनात पक्के करा. एक नाड आहे पण चरणाच्या आधारे नाडी पाद वेध कोष्टकाप्रमाणे लग्न करू शकतो याबद्दलही विस्तृत चर्चा करेनच, पण नाडीमुळे मूलबाळ होत नाही असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर त्याच्या कानफटात मारायला कमी करू नका!!!  पूर्वीच्या काळामध्ये बहु संतती हा एक मुख्य पॅरामीटर होता. पुष्कळ प्राण्यांमध्येही एका प्रजननामध्ये  दोन किंवा जास्त संततींचा जन्म होतो. जैव विज्ञान शास्त्राप्रमाणे सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा नियम नाडी या संकल्पनेशी जोडला गेलेला आहे. पूर्वी विज्ञान प्रगत नव्हते, अंधश्र्रद्धेचा बाजार मांडला गेला होता. दहा-बारा संतती असणे हे कॉमन होते, त्यातील तीन चार पाच जगणे आणि बाकीची न जगणे हेही कॉमन होते, कारण तसे आजार अस्तित्वात होते. नाडीचा संबंध बहू संततीशी आहे. आजकाल ‘एक  किंवा दोन बस’  हेच धोरण असताना, मला सांगा की, ही संकल्पना कशी लागू होते? आणि मुख्य म्हणजे अष्टकूट मिलानामध्ये नाडीला सर्वाधिक, म्हणजे आठ गुण आहेत. म्हणजे त्यावेळेला ती गरज होती, पण आज आहे का? आज दहा-बारा मुलं कोणाला हवी आहेत का? परवडणार आहे का?  झेपणार आहे का? मग अष्टकूट मिलनामध्ये आठ गुण काय कामाचे? ब्लड ग्रुप-नाडी आणि नाडी आणि आयुर्वेद यातील संबंध काय हे काय असते हे वाचकांना कळणे गरजेचे आहे म्हणून विस्तारपूर्वक सांगतो.

विवाहित जोडप्यांमध्ये समान रक्तगट असण्यात अजिबात गैर नाही. जेनेटिक/ गुणसुत्रीय तत्त्वांनुसार, जन्मलेल्या बाळाचा रक्तगट समान असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या जोडप्याचा रक्तगट a+ असेल, तर जन्मलेल्या बाळाचाही रक्तगट + असेल आणि त्यात कोणतीही गुंतागुंत होणार नाही. प्रत्येक मनुष्य आरएच-पॉझिटिव्ह किंवा आरएच-निगेटिव्ह रक्तगट घेऊन जन्माला येतो. (तथापि, आरएच पॉझिटिव्ह अधिक सामान्य आहे). आरएच पॅक्टरमुळे दोन्ही पालक जैविक पालक असल्यास गर्भधारणेदरम्यान रक्तगटाची सुसंगतता ही केवळ जोडप्यांसाठी चिंतेची बाब आहे. आरएच पॅक्टर हे अनुवांशिक प्रथिने आहे जे ठरवते की कोणीतरी आरएच पॉझिटिव्ह (+) किंवा आरएच नकारात्मक (-). आरएच पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक स्थितीचा सहसा आरोग्यावर परिणाम होत नसला तरी त्याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर आई आरएच निगेटिव्ह असेल आणि बाळ आरएच पॉझिटिव्ह असेल, तर आरएच असंगतता नावाची स्थिती उद्भवू शकते, असे होऊ शकते. कारण आरएच निगेटिव्ह आईचे अॅन्टीबॉडीज बाळाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि त्यांच्या लाल रक्तपेशींचे नुकसान करू शकतात. गर्भधारणेदरम्यान आरएचच्या केसवरील उपचार आज मेडिकल सायन्समध्ये सहजच उपलब्ध आहेत.

Advertisement

मेष

खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अर्थात खर्च जर चांगल्या कामासाठी होत असेल तर हरकत नाही. पण अपव्यय नको. परदेश वारी होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी खर्च होणारच. पण विनाकारण नको. वाहन सांभाळून चालवा. आणि रहदारीचे नियम पाळा. राजकारणात असाल तर वाणीवर संयम असू द्या. अवास्तव बोलू नका. बोलणे अंगलट येण्याची शक्मयता आहे.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

वृषभ

या आठवड्यात रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. बाकी जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. आपल्या बुद्धी चातुर्याची सर्वांवर चांगली छाप पडण्याची शक्मयता आहे. विवाहेच्छुकांना जोडीदार हुशार व सुंदर मिळण्याची शक्मयता आहे. आपली मुले पुढील शिक्षणासाठी परदेशगमनाचा विचार करण्याची शक्मयता आहे. एकूण हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय: महादेवाची उपासना करा.

मिथुन

आपल्या कुटुंबाबरोबर आपला वेळ घालवा. आनंद मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीविषयी काही चर्चा चालू असेल तर ती यशस्वी होण्याची शक्मयता आहे. या दिवसात आपले बोलणे व वागणे याची सर्वावर छाप पडेल. कदाचित लेखनात आवड ही निर्माण होण्याची शक्मयता आहे. प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. एखादी जागा अगर एखादी वस्तू खरेदी अथवा विक्रीचा व्यवहार होण्याची शक्मयता आहे.

उपाय: मुक्मया प्राण्यांना खायला घाला.

कर्क

आपण ऑफिसमध्ये काम करत असाल तर आपले प्रेझेन्टेशन चांगले होण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील. शांत डोकं ठेवून, विचारपूर्वक काम करा. यश नक्की मिळेल. आपल्या भावंडांची, जिवलग मित्रांची गाठभेट होण्याचा संभव आहे. कदाचित यांच्याबरोबर छोटे मोठे प्रवासही होण्याची शक्मयता आहे. शेजाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल. फक्त गोड बोला.

उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.

सिंह

नवीन घर बांधण्याचा अगर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढे पाऊल टाकण्यास हरकत नाही. आईकडून लाड करून घ्याल. आईची काळजी पण घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात प्रगती झालेली दिसेल. आणि त्यामुळे त्यांना प्रोत्साहनही मिळेल. एकूण हा आठवडा सुखासमाधानात जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला मधल्या काही काळात न मिळालेली शांत झोपही मिळेल.

उपाय:हनुमान चालीसा रोज न चुकता वाचा.

कन्या

विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जितका जास्त अभ्यास तितके यश जास्त. मन चंचल होण्याचा संभव आहे. पण काळजी करू नका. आपल्यावर गुरुची दृष्टी आहे. त्याचे स्मरण करून आपले मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. भरकटू देऊ नका. आपण काही उपासना करत असाल तर तो मार्ग सोडू नका. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.

उपाय: आपल्या इष्टदेवतेची आराधना करा.

तूळ

आपल्या अमूल्य वस्तूंचे जतन करा. त्या अमूल्य वस्तूमध्ये तब्येतही आलीच. सांभाळा. बाहेरचे खाणे शक्मयतो टाळा. नोकरावर अति विश्वास ठेवू नका. सतर्क रहा. पण म्हणून त्यांच्याशी उद्धटपणे बोलूपण नका. नोकरीत आपल्या हाताखालील लोकांना समजुतीने घ्या. अन्यथा अपमानित होण्याची शक्मयता आहे. कोणतीतरी चिंता सतत सतावत राहील.

उपाय: गुरुची उपासना करा.

वृश्चिक

वाणीवर संयम ठेवा. विवाहेच्छुकांना सुरेख व बुद्धिमान जोडीदार मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही वेळा मतभेद होण्याची शक्मयता आहे. पण समजुतीने घ्या. वाद विकोपाला नेऊ नका. दैनंदिन व्यवहारात देखील शांततेने घेण्याची गरज आहे. स्वतंत्र व्यवसायात असाल तर प्राप्ती चांगली होण्याची शक्मयता आहे. पण सर्वच दृष्टीकोनातून सांभाळून घेण्याची गरज आहे.

उपाय: दत्तगुरुंची आराधना करा.

धनु

सासरकडून द्रव्यलाभ होण्याची शक्मयता आहे. अथवा लॉटरीसारख्या प्रकारातून लाभ होण्याची शक्मयता आहे. या व्यतिरिक्त मात्र कुठल्या गैरमार्गाने पैसा मिळविण्याच्या भानगडीत पडू नका. नाहीतर अंगलट येण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. अति लोभ वाईटच. त्यामुळे अति लोभापायी कदाचित नुकसानच होण्याची शक्मयता आहे.

उपाय: महालक्ष्मीची पूजा करा.

मकर

घरातील वृद्धांची सेवा केल्याने त्यांचा सहवास व त्यांचा आशीर्वाद मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचा संभव आहे. काही परोपकार करावासा वाटला तर विचार करत बसू नका. लगेच ते कृतीत आणा. आशीर्वाद मिळतील. सत्संग प्राप्ती होईल. कोणत्या तरी संतांची भेट होण्याचा संभव आहे. त्यांचा कृपाशीर्वाद मिळून आपले जीवन आनंदमय होईल. धार्मिक कार्यात मन गुंतण्याचा संभव आहे.

उपाय: घराबाहेर पडताना गंधाचा टिळा लावून बाहेर पडा.

कुंभ

स्वतंत्र उद्योगात असाल तर उद्योग प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रामाणिकपणे थोडे जास्त कष्ट घेतले तर यश मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तिथेदेखील कष्टानेच यश मिळेल. उच्च पद प्राप्ती होईल. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल या आठवड्यात मिळण्याची शक्मयता कमी आहे. एकूण हा आठवडा तुम्हाला खूप कष्ट करायला लावणार असे दिसते.

उपाय: दर शनिवारी शनीला तेल वाहा.

मीन

सणा समारंभात सहभागी होण्याची शक्मयता आहे. साहजिकच नातेवाईकांच्या, भावंडांच्या, मित्र-मैत्रिणींच्या गाठी भेटी होतील. आठवडा आनंदात जाईल. उंची, मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. अथवा तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्मयता आहे. तुम्हाला तुमच्या कार्यामुळे समाजात चांगला दर्जा प्राप्त होण्याचा संभव आहे. या आठवड्यात आपल्याला फायदाच होईल.

उपाय: दर शनिवारी अपंगाना खायला द्या.

Advertisement
Tags :

.