महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:05 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विवाह  गुण मिलन?   चुलीत घाला. .  .

Advertisement

नक्षत्राणि ग्रहाश्चैव शुभाशुभनिवेदका:।

Advertisement

मानवानां महाभागे न तु कर्मकरा: स्वयम्?

- महाभारत-अनुशासन पर्व (अर्थ: ग्रह आणि नक्षत्र केवळ अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितींची पूर्वसूचना देत असतात.)

आपण मंगळाबद्दल बोलत आहोत आणि त्यातल्या त्यात आजकालचे ज्योतिषी ज्या पद्धतीने मंगळाचा बागुलबुवा करतात आणि समाजात या विषयी ज्या भयानक गैरसमजुती आहेत त्या विषयीही चर्चा करत आहोत. जे लोक सौम्य मंगळ आणि कडक मंगळ वगैरे बोलतात, त्यांनी  कुठल्याही क्लासिकल टेक्स्ट वरून ही व्याख्या घेतलेलीच नाही तर ज्योतिषाची चार पुस्तके वाचून प्राप्त झालेल्या उथळ ज्ञानामुळे यांचे हे स्टेटमेंट असते.   जेव्हा या बाबतीमध्ये (मंगळाच्या) विवेचन झाले त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. युद्धे, रोगराई यांचे प्रमाण खूप जास्त होते. बालविवाह पद्धत  आणि पुऊष सत्ताक समाज यांचा काळ होता. वराचे वय 40 तर वधूचे वय  18, 12 असे असायचे. त्या काळात कदाचित या ‘सो कॉल्ड’  मंगळ दोषाचा विचार होत असावा. ज्योतिषांनी आणि जातकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या मनात हे फिक्स केले पाहिजे की जवळजवळ अशा 14 कंडिशन्स आहेत  जिथे  मंगळ दोष नाहीसा होतो. मुळात मंगळ हा दोष नाही  हा मंगळ योग आहे, मंगल करणारा योग आहे आणि मुख्य म्हणजे याचा संबंध  वधूच्या किंवा वराच्या सेक्सुअल टेंडन्सीशी आहे. शरीर संबंध ठेवताना असलेली आक्रमकता किंवा नाजूकपणा, उपभोग घेण्याची आणि देण्याची वृत्ती, संभोगाच्या दृष्टीने असलेली शारीरिक क्षमता. या गोष्टींचा विचारच मुळी मंगळ, शुक्रावरून केला जातो, आणि पूर्वी जसे म्हणालो, कुणी उघडपणे बोलो अथवा न बोलो, शरीर संबंध हा विवाहाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मंगळदोषाची शांती केल्यानंतर दोघांमध्ये विवाह होऊ शकतो,  किंवा मंगळ दोषाची शांती करायला लागेल आणि त्यामुळे विवाह होईल.  यासारखी बकवास गोष्ट नाही. कित्येक ठिकाणी वयाच्या 28 वर्षानंतर मंगळ दोष पाहू नये असा उल्लेख आढळतो. आजकाल वधू-वरांचा विवाह हा मुळात 28 व्या वर्षानंतरच होताना दिसतो. फक्त शेवटच्या ओळीकडे जरी पाहिले तरी सहज समजेल, 75 जोडप्यांपैकी (जिथे एकाला मंगळ आहे आणि दुसऱ्याला नाही) 57 जोडपी आनंदात संसार करतात. म्हणजे 76 टक्के लोकांच्या वाट्याला मंगळ महाराज गेलेच नाहीत, ना कुणाचा मृत्यू झाला, ना घटस्फोट! मग मला सांगा, कुठला मंगळ दोष आणि कसलं काय!

आजच्या काळामध्ये,   जिथे  विवाह होणे कठीण होऊन बसले आहे,   वधू-वरांच्या अपेक्षा,   पालकांच्या अपेक्षा यामध्ये प्रचंड तफावत आहे,  करियर  आणि स्थैर्य  या गोष्टी केवळ  मुलांच्या  बाबतीत  नसून  मुलीही  त्याच मार्गावर आहेत,   अशावेळी मंगळाचा इतका  मोठा  इश्यू करण्यामध्ये  काही पॉईंट  आहे का?  आधुनिक भविष्यशास्त्राचे  भीष्माचार्य  श्री. के. एन. राव सर  यांच्याच  शब्दात सांगायचे झाले  तर ‘अनुभव असा आहे  की  वधू आणि  वराच्या  कुंडलीतील  सप्तम,  अष्टम  आणि द्वादश  भाव  फार जास्त पीडित नसतील  किंवा दोघांच्याही कुंडलीमध्ये समान  पीडा असेल  आणि  विवाहानंतर  दोघांच्याही आयुष्यात येणाऱ्या दशा या कमीत कमी वीस वर्षापर्यंत ठीक असतील  तर येनकेन प्रकारेण  विवाह  सफल होतो.   पती-पत्नीमध्ये एकाची दशा चांगली नसेल  पण दुसऱ्याची दशा  चांगली असेल  तरीही संतुलन येते.  मात्र दोघांच्याही दशा  खराब असतील  तर  एकतर विवाह टिकत नाही  किंवा  विवाहात एखादा दु:खद प्रसंग  घडतो’.

ते पुढे असे म्हणतात  की ‘लग्नानंतर 15 ते 20 वर्षे अनुकूल दशा असतील  तर विवाहाला हरकत नसावी,  त्याच्यानंतर कुठल्याही दशा असतील  तरी मतभेद जरी झाले  तरीसुद्धा  घटस्फोटापर्यंत प्रकरण जात नाही.’

श्री. के. एन. राव सरांना  त्यांच्या एका विद्यार्थ्याने प्रŽ विचारला  की  ‘चंद्राची राशी आणि चंद्राचे नक्षत्र  यावरून  म्हणजे अष्टकूट  मिलान  करून  मी  काय सल्ला द्यावा?’  तेव्हा सर म्हणाले  की ‘माझा सल्ला असा असेल  की या आधारे  तू सल्ला देऊ नकोस!’

मित्रहो  मला वाटते यातच सगळे आले.

 

 

एकूण                                          आनंदी                        दु:खी

क्र.   मंगळ दोष असलेली जोडपी          115                                           78                 37

1       दोघांच्या ही कुंडलीत  मंगळ  आहे(त्याच घरात)       12                  6                          6

2       दोघांच्या ही कुंडलीत  मंगळ  आहे (वेगळ्या घरात)       28                15                  13    

3       एकाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे पण दुसऱ्याच्या कुंडलीत नाही 75    57         18

 

मेष 

संभ्रमाची अवस्था असेल. अचानक काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि काही वेळ निऊपयोगी कामातही खर्च होईल. लक्षात ठेवा की कधीकधी तुमचा अति आत्मविश्वास आणि अहंकार तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. कार्यक्षेत्रात कामाच्या दबावामुळे काहींना तणावासारखे वाटेल.  नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडेल.

उपाय : मारुतीला ऊईची माळ घाला

वृषभ

कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसंबंधित अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ग्लॅमर, कला, सौंदर्य प्रसाधने इत्यादींशी संबंधित व्यवसायात मनाप्रमाणे यश प्राप्त होईल. परंतु कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. यावेळी परदेशाशी संबंधित व्यवसायाची काही चांगली बातमीदेखील मिळू शकते.

उपाय : पांढरे सुवासिक फूल जवळ ठेवा

मिथुन

कोणत्याही मौल्यवान वस्तूंची खरेदी शक्मय आहे. कोणत्याही सामाजिक उत्सवात सन्मानित होण्याची संधीदेखील असेल.  राग आणि अहंकारामुळे तुम्ही स्वत:चे नुकसान कराल. जवळच्या मित्राशी किंवा भावाशी छोटीशी चर्चाही मोठी समस्या बनू शकते. नातेसंबंध खराब होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी आपली असेल. पैसे गुंतवू नका आणि काळजी घ्या.

उपाय : गायीला हिरवा चारा घाला

सिंह

निष्काळजीपणामुळे कोणतेही सरकारी काम अपूर्ण सोडू नका.  पैतृकबाबी आता अधिक क्लिष्ट होण्याची शक्मयता आहे. इतरांच्या वैयक्तिक कामात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नका. व्यवसायात तुम्ही केलेले नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या फाईल्स आणि पेपर्स  सुरक्षित ठेवा.

 उपाय : मंदार वृक्षाला प्रदक्षिणा घाला.

कन्या

कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम पूर्ण करू शकाल. अनावश्यक खर्च येतील. मित्रामुळे घरात काही नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या, त्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मालमत्ता खरेदी आणि विक्रीचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा. मुलांच्या कोणत्याही समस्येबद्दल चिंता राहील.

उपाय : तुरटीने दात घासा

तूळ

रविवार नंतर परिस्थिती काही प्रतिकूल वातावरण निर्माण कऊ शकते. अचानक तुमच्यासमोर काही अडचण निर्माण होईल आणि कामाच्या दबावामुळे तुम्हाला अडकल्यासारखे वाटेल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी विभागाला अधिक मेहनतीची आवश्यकता असते. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही वेळ अनुकूल आहे.

उपाय : चकचकीत कागद जवळ ठेवा.

वृश्चिक

मुलांच्या कोणत्याही समस्येबद्दल चिंता राहील. जवळच्या नातेवाईकांच्या आरोग्याबद्दल मन उदास राहू शकते. दिखाव्याच्या बहाण्याखाली कर्ज घेणे टाळा, कारण परतफेड करणे कठीण होईल. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  महत्त्वाची ऑर्डर मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : पक्ष्यांना दाणे घाला

धनू

पैशांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. फसवले जाऊ शकता आणि तुम्ही काही आर्थिक अडचणीतही अडकू शकता. जमीन खरेदी आणि विक्री करताना, कागदपत्रांची संपूर्ण तपासणी करा. आपल्या व्यस्त वेळेतून कुटुंबासाठी थोडा वेळ काढल्याने परस्पर संबंध गोड होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

उपाय : विहिरीत दूध घाला

मकर 

भावनांऐवजी युक्ती आणि विवेक वापरा. परिस्थिती तुमच्या बाजूने काम करेल. घरात पाहुण्याचे आगमन झाल्याच्या शुभ माहितीमुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल. तसेच, कोणतेही अडकलेले काम पूर्ण करण्यासाठीदेखील योग्य वेळ आहे.  पैशांच्याबाबतीत, कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व कामे स्वत: हाताळा. आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.

उपाय : काळ्या मिरीचे 5 दाणे जवळ ठेवा.

कुंभ

तुमच्या विचारांमधील अहंकार आणि संकुचितपणा कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ शकतो, तुमच्या वागण्यात आणि विचारांमध्ये बदल आणण्यासाठी काही आत्मचिंतन करा. या आठवड्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचण जाणवेल. नोकरी शोधणाऱ्यांना काही अधिकृत कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

उपाय : मंदिरात बत्तासे ठेवा

मीन

आपला स्वभाव आणि विचार सकारात्मक ठेवा. कधी कधी तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी अडचणीचे कारण बनतो. निऊपयोगी कामांमध्ये वेळ वाया न घालवता तऊणांनी त्यांच्या करिअर योजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यस्ततेमुळे पती-पत्नी दोघेही घरी वेळ देऊ शकणार नाहीत. पण घराचे वातावरण चांगले राहील, कशाचीही काळजी करू नका.

उपाय : हीना अत्तर वापरा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope
Next Article