महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:01 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

नोकरदार वर्गाला कामाचे वेळापत्रक ठरवून काम करावे लागेल. इथेसुद्धा मागेपुढे कालावधी झाल्यामुळे कामाची धावपळ होईल. त्यामुळे मानसिक तणाव न घेता काम करा. व्यवसायात नवीन काही गोष्टी करू नका, जसे चालले आहे तसेच चालू द्या. महत्त्वाचे निर्णय टाळा. प्रत्येक वेळी फायद्याचेच नियोजन करणे योग्य ठरणार नाही. तोटा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल.

Advertisement

लाल टिळा लावावा

वृषभ

छोट्या-मोठ्या गोष्टीतून नवीन काही शिकावयास मिळेल. आर्थिक कामकाजातील अडथळे दूर होतील. पूर्वार्धात कामे उरकून घ्या. नियोजित गोष्टींचा क्रम बदलू नका. स्वतंत्र विचार करून सुऊवात करणे योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींना मागील कामाचा अनुभव उपयोगी पडेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चीज होईल. अधिकारप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. व्यवसायात चाललेली चालढकल कमी होईल.

चांदीचा तुकडा आपल्याजवळ सतत ठेवा

मिथुन

व्यावसायिक मोह वाढला तरी तो गडबडीने वाढवू नका. पूर्वीपेक्षा आताची कार्यपद्धती बदललेली असेल. वेळेचा सुरेख संगम कसा साधला जाईल याचा अंदाज घ्या. आर्थिक आवक चांगली असेल. सार्वजनिक क्षेत्रात मित्रांमार्फत नवीन योजना अमलात आणाल. घरगुती वातावरण उत्तम असेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. कौशल्य उत्तम राहील. संघर्षदायक परिस्थिती कमी होईल.

आई, आजी यांचे पाय धुवून प्रक्षालन करा

कर्क

व्यापारी क्षेत्रात गिऱ्हाईकांची मने वळवण्यासाठी केलेल्या जाहिरातीचा उपयोग होईल. भागीदारी व्यावसायिकांना समजुतीने वाटचाल ठेवावी लागेल. कामकाजात वाढ होईल. आर्थिक मंदी कमी झाल्याचा आनंद मिळेल. राजकीय क्षेत्रात दोन शब्द कमी बोललेले चांगले राहील. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडून न होणाऱ्या कामासाठी मित्रांना आधीच हवाला देऊ नका.

लोखंडाचा चौकोनी तुकडा जमिनीत पुरा.

सिंह

कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेणे योग्य नाही, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. सध्या या परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला दिसेल. नोकरीमधील महत्त्वाकांक्षा पूर्णत्वाला जातील. व्यवसायात वाढत असलेली आकांक्षा दुहेरी मार्गावर असेल. रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी हीच संधी आहे हे विसरू नका. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये वेळ घालवू नका.

रीतिरिवाज कटाक्षाने पाळा.

कन्या

नोकरीमध्ये दडपणाखाली राहण्याचा कालावधी संपेल. प्रस्ताव कोणताही असो, त्यावर विचार करून स्वत: निर्णय घ्या. व्यवसायात उत्पादनातील मागणी वाढलेली असेल. त्यामुळे अचानक उत्पादन वाढवावे लागेल. मोठ्या व्यवहारांनासुद्धा कलाटणी मिळेल. मागणी तसा पुरवठा करावा लागेल. खर्चाच्या नोंदी ठेवा. खर्चीक गोष्टींना लगाम घाला.

घरात गंगाजल कायम ठेवा.

तूळ

वरिष्ठ काही जबाबदारी तुमच्याकडेच सोपवतील. ती पूर्ण करण्यास तुमचा युक्तिवाद कमी पडेल. तुम्ही तुमच्या कामांमध्ये कार्यमग्न राहा. नवीन संशोधन फलद्रूप होईल. व्यावसायिक जबाबदारी वाढल्याने ठरवून ठेवलेल्या कामांमध्ये बदल होतील. नवीन व्यावसायिक करार करताना कागदपत्रांची योग्य हाताळणी करा. इतरांवर विश्वास ठेवून कोणतेही काम करू नका. उधारी वसूल होईल.

काळ्या गाईला खाऊ घाला

कन्या

प्रामाणिकपणे कार्य केल्यास उत्तम न्याय मिळेल. भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करणे केव्हाही तुमच्यासाठी चांगले राहील. व्यापारी क्षेत्रात व्यवहाराला महत्त्व द्या. आर्थिक दृष्ट्या खर्चाचे ताळतंत्र नेमके ठरवा. सामाजिक गोष्टींचा योग्य समतोल साधता येईल. जुन्या मैत्रीशी संवाद होईल. मुलांसाठी वेळ द्या. कुटुंबाला एकत्रित सामावून घ्या. आरोग्य उत्तम राहील.

शेगडीवर एखादा भाकरीचा किंवा रोटीचा तुकडा जाळा

धनू

घसरलेला कल पुन्हा योग्य वळणावर येईल. सरकारी कर्मचारी वर्गाला शुभ बातमी समजेल. नोकरीचा पेच मार्गी लागेल. इतके दिवस वाट पाहत होता ती वेळ आता आलेली आहे. महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा होईल. ही चर्चा मनाला दिलासा देणारी ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या समोर येणारे प्रस्ताव स्वीकारा. ज्या गोष्टी तुमच्या आवाक्मयात आहेत, त्या करण्याचा प्रयत्न करा. जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन कराल.

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या

मकर

आजचे काम उद्यावर ढकलण्याची वेळ येणार नाही. नियोजन केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. शासकीय कामातील अडथळे कमी होतील. वेतनवाढीचा प्रŽ मिटेल. लघुलेखक, वृत्तपत्र संपादक, पत्रकार यांना अनुकूल परिस्थिती असेल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे आनंद द्विगुणित होईल. कामातील आत्मविश्वास वाढता राहील. बचतीत वाढ कराल.

रात्रीचे जेवण झाल्यावर घरातल्या गॅसवर दूध शिंपडा.

कुंभ

वेळेचा उपयोग करून ध्येय साध्य करा. ज्या गोष्टी कामाच्या बाबतीत अवघड होत्या, त्या व्यवस्थित मार्गी लागतील. त्यासाठी तुमचे परिश्र्रम उपयोगी पडतील. व्यवहारात काही निवडक गोष्टींना दुजोरा द्या. गुंतवणुकीतून फायद्याचे प्रमाण ठरवा. त्यानंतरच विचार करा. नेहमीपेक्षा आवक चांगली राहील. धावपळीचा कालावधी राहील. नियोजन बदलू नका. अडचणीच्या काळात अपेक्षित मदत मिळेल.

पांढऱ्या गाईची सेवा करा.

मीन

नकारार्थी विचारातून बाहेर पडा. नवख्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. उद्योगधंद्यात मोठ्या उलाढाली करण्याचे नियोजन थांबवा. कर्ज काढून भांडवलात वाढ करू नका. दुसऱ्यांच्या मतावर तुमचे मत ठरवू नका. वेळेवर निर्णय घेतल्यास फायदा होईल. प्रयत्नवादी राहून कुठेही कमी न पडता कष्ट करा, यश मिळेल. खर्चाची योग्य अशी तरतूद केल्यास पैशांची अडचण जाणवणार नाही.

गहू आणि गूळ सलग आठ दिवस मंदिरात दान द्या

टॅरो उपाय: व्यवसायात यश मिळवण्यासाठी शनिवारी तुमच्या दुकानाच्या किंवा कामाच्या ठिकाणी भिंतीवर लिंबू स्पर्श करावा. नंतर त्याचे चार तुकडे करावे आणि प्रत्येकी एक तुकडा चार दिशांना फेकून द्यावे. झोपलेले नशीब जागृत करण्यासाठी, एक लिंबू तुमच्या डोक्मयावर चिरून त्याचे दोन तुकडे करावे. डाव्या हाताचा तुकडा उजवीकडे आणि उजव्या हाताचा तुकडा डावीकडे फेकून द्यावे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article