राशिभविष्य
अंक म्हणे ज्योतिषाला. . . (उत्तरार्ध -1)
कुआ नंबरचा सगळ्यात मोठा फायदा हा कुठल्या दिशेला काम केले की, यश मिळते हा आहे.
मित्रहो, आपल्या आयुष्यातला 99 टक्के संघर्ष हा नशिबाकरता, पैशाकरता, नातेसंबंधाकरता, आरोग्याकरता आणि स्थैर्याकरता असतो, बरोबर ना? फेंग शुईमधला कुआ नंबर आपल्याला आयुष्यातल्या याच वेगवेगळ्या आयामांना चांगले कसे करता येईल आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा कसा उचलता येईल याची दिशा दाखवतो आणि या नंबरमुळे आपल्याला कुठल्या दिशेला कुठले कार्य केले की त्यामध्ये सफलता मिळते आणि कुठल्या दिशेला तेच कार्य केले की असफलता प्राप्त होते हे कळते. म्हणूनच न्यूमरोलोजी किंवा अंकशास्त्रामध्ये कुआ नंबरला महत्त्व आहे. आपण एकेक आयामाचा विचार करूया.
पहिले आयाम म्हणजे नशीब- या आयामामध्ये केव्हा या आयामाच्या दिशेमध्ये एखाद्या व्यक्तीने त्याच्या अनुकूल दिशेला बसून पैशाचे व्यवहार केले, प्रॉपर्टीचे व्यवहार केले, नवीन व्यापार सुरू केला, नवीन नोकरीला त्या दिशेला प्रयत्न केला तर सफलता मिळते हे निश्चित. दुसरा आयाम आरोग्य-आरोग्यम् धनसंपदा! याच आरोग्याकरता आपण सर्वकाही डावाला लावू शकतो. म्हणून या दिशेला ’दैवी डॉक्टर’ अशी उपमा दिलेली आहे, म्हणजे काय तर कुआ नंबरने दाखवलेल्या या दिशेचा जर योग्य उपयोग केला तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ प्राप्त करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागत नाही. उलट जर या दिशेचा नकारात्मक उपयोग केला गेला तर स्वास्थ्य बिघडण्याची बिघडण्याचे व टेन्शन येण्याचे कारण होते. तिसरा आयाम आहे पैसा किंवा आर्थिक स्थिती. बाप बडा ना भैया, सबसे बडा ऊपय्या!!! तिसरा आयाम आहे.
नातेसंबंध- प्रेम, एकमेकाबद्दल असलेले आकर्षण, कुटुंबातील सदस्यांचा एकमेकाशी असलेला जिव्हाळा हे सगळे दर्शवणारा हा आयाम. या दिशेचा योग्य वापर केला तर नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो, प्रेमसंबंध सुधारतात आणि याउलट जर काम केले तर संबंधांमध्ये दुरावा येतो.
शेवटचा आयाम आहे स्थैर्य- ज्योतिष शास्त्र प्रमाणे स्थैर्य म्हणजे एकदा व्यापार सेट झाला किंवा एखादी सरकारी नोकरी मिळाली आणि चिकटलो त्या ठिकाणी असा होत नाही तर स्थैर्य याचाच अर्थ दैनंदिन प्रगती असा होतो. या आयामाला जर आपण योग्य रीतीने हाताळले तर रोजची प्रगती होते आणि त्यामुळे संपन्नता सहज शक्मय होते आणि या उलट जर याचा नकारात्मक उपयोग केला तर अधोगती निश्चितच. याचप्रमाणे कुआ नंबर तुमच्यासाठी असलेल्या अशुभ दिशांना देखील दर्शवतो. या अशुभ दिशांना वेगवेगळे आयाम दिलेले आहे.
जसे- 1. सत्यानाश-नावाप्रमाणे जर या दिशेला जास्त अॅक्टिव्हेट केले तर होणारी कामे न होणे, मानसिक अस्वस्थता, टेन्शन, आर्थिक नुकसान, नातेसंबंधांमध्ये तेढ इत्यादी घटना घडतात.
- पंच प्रेत- या दिशेला जर जास्तीत जास्त अॅक्टिव्हेट केले तर समाजामध्ये बदनामी होण्याचे चान्सेस असतात, अॅक्सीडेंट होणे, अचानक नुकसान होणे, नाते संबंधांमध्ये अचानक शत्रुत्व येणे हे सगळे घडते.
- मृत्यू -कळत नकळत या दिशेला जर जास्त अॅक्टिव्हेट केले तर व्यसनाधीनता येणे, घटस्फोट होणे, मानसिक ताण तणाव, रक्ताची कमी-अॅनिमिया एकटेपणा इत्यादी गोष्टी घडतात.
- अडथळ्यांची शर्यत-समजा तुमच्या कमरेला पाचशे किलोचा दगड बांधला आणि उड्या मारत पळ म्हणून सांगितलं तर कसं वाटेल? या दिशेला अॅक्टिव्हेट केला तर हेच होण्याची शक्मयता आहे. प्रत्येक कामात अडचण, काम न करण्याची वृत्ती, सकारात्मकतेची कमी, काही करू नये असे वाटणे, जबाबदारी न घेण्याची वृत्ती हे सगळे या दिशेला अॅक्टिव्हेट केल्याने होते. आता तुमचा कुआ नंबर काय आहे हात तुम्ही काढला असेलच. नसेल काढला तर तुम्ही आंतरजालाचा (इंटरनेट) उपयोग करून घेऊ शकता. (नेटवर ‘कुआ नंबर पॅल्क्मयुलेटर’ असा शोध घेतला आणि आपली जन्मतारीख टाकली की तुम्हाला तुमचा कुवा नंबर कळेल) पुढच्या लेखात प्रत्येक कुवा नंबरला चांगल्या आणि वाईट आयामांना दर्शवणाऱ्या दिशा कोणत्या आहेत त्या सांगतो.
मेष
‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी तुमच्या मनाची अवस्था होण्याची शक्मयता आहे. थोडेफार अध्यात्माकडे वळण्याची पण शक्मयता आहे. तसे झाल्यास आपल्याला एक मानसिक समाधान नक्कीच मिळेल. जोडीदाराला आनंद द्यायचा प्रयत्न कराल. पण क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. काही वेळा तोल सुटण्याची शक्मयता आहे. संयम असणे अत्यंत गरजेचे आहे.
उपाय: दत्तगुरूची उपासना करा.
वृषभ
आपल्या कुटुंबासमवेत आनंदात हा आठवडा जाण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याने सर्वाना खुश कराल. आपली सांपत्तिक स्थिती तशा संदर्भात प्रयत्न केल्यास नक्की सुधारण्याची शक्मयता आहे. पैतृक धनासाठी काही प्रयत्नात असाल तर थोड्या प्रयत्नाने मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला कौटुंबिक सुखाची प्राप्ती करून देणारा असणार आहे असे दिसते.
उपाय: कुलदेवतेची आराधना करा.
मिथुन
आपल्या भावंडासोबत छोट्या सहलींचे आयोजन कराल, आणि यशस्वी करूनही दाखवाल. कदाचित तो रेल्वेचा प्रवास असण्याची शक्मयता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपले काम, आपले प्रेझेंटेशन आपल्या वरिष्ठ मंडळींना आवडून आपले महत्व ऑफिसमध्ये वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आपल्या कामाकडे सुद्धा प्रामाणिकपणे लक्ष द्या आणि कौतुकाची थाप मिळवा.
उपाय: दर सोमवारी महादेवाला बेल वाहा.
कर्क
मातेच्या सहवासाचा आनंद मिळेल. जमीन जुमल्याच्या बाबतीतली काही कामे अडलेली असतील तर ती सुटण्याची शक्मयता आहे. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर त्या दिशेने प्रयत्न करण्यास हरकत नाही. अथवा नवीन घर घेण्याचा अगर घर विकण्याचा विचार करत असाल, त्या दृष्टीने सुद्धा पाऊले उचलण्यास हरकत नाही. एकंदरीत हा आठवडा आपल्याला चांगला जाईल असे वाटते.
उपाय: तहानलेल्या जीवांना पाणी द्या.
सिंह
मुलांच्या प्रगतीची चिन्हे दिसू लागली आहेत असे दिसते. अचानक धनलाभाची शक्मयता दिसते. पण धनलाभाच्या आशेने चुकीचा मार्ग अवलंबू नका. मंत्र सिद्धी वगैरे प्राप्त होण्याची शक्मयता आहे. तुम्ही शिकत असलेल्या विद्येचे पूर्णत्व झालेले दिसेल. स्वत:च्या कामाशी प्रमाणिक रहा. बहुतेक या आठवड्यात तुमच्या बुद्धी चातुर्याचा कस लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सांभाळून रहा.
उपाय: रोज सकाळी सूर्योदयाला सूर्याला अर्ध्य द्या.
कन्या
या आठवड्यात आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. छोट्यातले छोटे दुखणे देखील अंगावर काढू नका. वेळेवर डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या. नोकरीत तुमच्या बुद्धीला चालना देण्याऱ्या घटना अगर परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. पण त्याचे दडपण घेऊ नका. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. नाहीतर रागाच्या भरात गोष्टी बिघडून जातील.
उपाय: मुक्या जीवांना खाऊ घाला.
तूळ
जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. ज्यांचे विवाह जमत नसतील अगर जमवण्याच्या प्रयत्नात असतील त्यांचे विवाह जमण्याची शक्मयता आहे आणि जोडीदार चांगला मिळेल. स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर व्यवसायात चांगली प्रगती होऊन प्राप्ती पण चांगली होण्याची शक्मयता आहे. एखादी हरवलेली अथवा चोरीस गेलेली वस्तू सापडण्याची शक्मयता आहे.
उपाय: दररोज तुळशीला पाणी घाला.
वृश्चिक
वाहन चालवताना जपून चालवा. गुप्त द्रव्य वगैरे मिळण्याची शक्मयता आहे. पण त्यासाठी गैरमार्गाचा वापर अजिबात करायला जाऊ नका. नाहीतर नसती आफत येईल. या आठवड्यात काहीतरी मानसिक चिंता आपल्याला सतावत राहील. मनाला जपजाप्य अशामध्ये गुंतवा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा आपल्याला सावध रहायला सांगतो आहे. काळजी घ्या.
उपाय: हनुमान चालीसा पठण करा.
धनु
भाग्य चमकण्याचे दिवस आहेत. पित्याचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळेल. आपल्या हातून काहीतरी धार्मिक कार्य घडण्याची शक्मयता आहे. संतसमागम घडण्याची देखील शक्मयता आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. एक निराळीच अनुभूती मिळेल. आनंदी रहाल. घरातील सर्व मोठ्या लोकांचा आशीर्वाद लाभेल. एकंदरीत हा आठवडा समाधानात जाईल.
उपाय: घरात धार्मिक पाठ करून घ्या.
मकर
स्वतंत्र व्यवसाय असेल तर उत्कर्ष होण्याची शक्मयता आहे. आपण करत असलेल्या कष्टाचे चीज होईल असे दिसते. नोकरीत असाल तर पदोन्नतीची शक्मयता आहे. आपल्या कामावर आपले वरिष्ठ खुश होतील. समाजात प्रतिष्ठा प्राप्त होण्याची शक्मयता आहे. मानमरातब मिळेल. वडिलांचा काही व्यवसाय असेल तर त्यातही फायदा होईल. कर्ज प्राप्तीसाठी प्रयत्नात असाल तर मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा.
कुंभ
या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ होण्याची शक्मयता आहे. द्रव्यलाभ होईल. उंची वस्तूची प्राप्ती होण्याची शक्मयता आहे. भावंडांच्या भेटीचा लाभ होईल. समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यातून मित्रांच्या भेटीगाठीचा लाभ होईल. आपण आयुष्यात काहीतरी महत्वाकांक्षा बाळगून असाल तर ती पूर्ण करण्यासाठी जो मार्ग निवडाल त्यातूनही फायदाच होईल.
उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
मीन
खर्चाचा ताळमेळ घालणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य त्या ठिकाणी खर्च केलात तर तो वाया जाणार नाही. वाहन जपून आणि वाहतुकीचे नियम न मोडता चालवा. नाहीतर गोत्यात येण्याचा संभव आहे. उन्हाळा वाढत चालला आहे. घरातून बाहेर पडताना डोळ्यांची काळजी घेत जा. मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. उगाचच कुणाबरोबर वादावादीत पडू नका.
उपाय: मारूतीची उपासना करा.