For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष   

Advertisement

व्यवसायात नवीन करार होतील. नोकरीमध्ये अपेक्षित बातमी कळेल. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. प्रयत्न आणि सहकार्यामुळे अनुकूलता प्राप्त होईल. नवीन संबंध फायदेशीर ठरतील. आर्थिक योजना राबवल्या जातील. नवीन काम मिळण्याची शक्मयता आहे. वाहनामुळे इजा होऊ शकते. मुलांकडून मदत मिळू शकेल. जुने संबंध कामी येतील.

पिवळा हातरूमाल जवळ ठेवा

Advertisement

वृषभ 

तुमचे विचार, नातेसंबंध, सवयी, वागणूक आणि विचार बदलण्याचे संकेत आहेत. आयुष्यात कोणत्या गोष्टींना पुढे जायचे आहे आणि कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत याचा विचार करूनच एक पाऊल टाकावे लागेल. मानसिक ताणतणाव सहन करू नका. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घाईघाईने कोणतेही काम करू नका. इतरांवर थोडासा विश्वास ठेवायला शिका.

वाहत्या पाण्यात नाणे टाका

मिथुन 

आरोग्य उत्तम दर्शवत आहे. या काळात तुम्ही भूतकाळात जे काही केले असेल त्याचा तुमच्यावरही परिणाम होईल. व्यवसायात किंवा नोकरीत व्यस्त असाल. परंतु  प्रियजनांसाठी काही काळ राखीव ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा काही काळानंतर त्यांना एकटेपणा जाणवेल. व्यवसाय नियोजनासाठी हा आठवडा बरेच फायदे देईल. एखादी वस्तू हरवू शकते.

केसराचा टिळा लावा

कर्क

टॅरो कार्ड्सनुसार, कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपले मन आणि शरीर संतुलित ठेवा. “जान है तो जहाँन है” या मंत्राचा अवलंब करा. तुमच्या वागण्याकडेही लक्ष द्या. घर बदलाची चर्चा होऊ शकते, मालमत्तेतून लाभ होण्याची शक्मयता आहे. आधीच तुटलेल्या नात्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.

गायीची सेवा करा

सिंह 

या आठवड्यात अज्ञात स्त्राsताकडून अपेक्षित बातमी मिळेल जी आनंददायी असेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा आठवडा अतिशय शुभ काळ आहे. वैवाहिक आणि प्रेमसंबंधांसाठी काळ संमिश्र्र जाणार आहे. वेळेचा सदुपयोग करण्यात विद्यार्थी यशस्वी होतील. मागील प्रयत्नांचे फायदे मिळतील. कामासाठी वेळ समाधानकारक आहे, परंतु मैत्रीमध्ये काही अडचणी येऊ शकतात.

तुळशीजवळ दिवा लावा

कन्या

टॅरो कार्ड्सची गणना दर्शवित आहे की, वृषभ राशीच्या लोकांसाठी, या आठवड्याच्या सुऊवातीला तुम्हाला थकवा जाणवेल तसेच मानसिक तणावही जाणवेल. जवळपास प्रत्येक स्तरावर जुळवून घेणे आवश्यक आहे, तुम्ही धीर धरावा आणि गोष्टींमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे, आरोग्याबाबत जागरूक रहा, शिक्षणामुळे स्पर्धेत यश मिळेल.

अन्नदान करावे

तूळ 

हा आठवडा फारसा अनुकूल दिसत नाही आहे. म्हणून, स्वत:ला मर्यादेत ठेवा, अंथरून पाहून पाय पसरा आणि कोणतीही जोखीम घेऊ नका. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अशोकाचे पान जवळ ठेवा

वृश्चिक 

टॅरो कार्डची गणना सुचवते की या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या पैशाचा हुशारीने वापर करावा. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता तुमच्यात आहे, यावेळी तुमच्या करिअरमध्ये प्रगती शक्मय आहे. अविवाहितांना लग्नाच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा सामान्यत: अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, त्यांची कामगिरीही चांगली होईल.

पिंपळाला प्रदक्षिणा घाला

धनु 

मैत्रीच्या नात्यात आपणास अपयश मिळण्याची शक्मयता दर्शविते. आपण मिळविलेल्या संपत्तीत नुकसान होण्याचीही शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी कारण नसताना वाद विवाद संभवतो. इच्छित परिणाम मिळण्यासाठी आपणास सतत प्रयत्नशील रहावे लागेल. योग्य वेळी योग्य सल्ला घेणे हितकारक ठरेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभकारक ठरेल.

वाहत्या पाण्यात 5 हळकुंड सोडावे

मकर  

विऊद्ध दिशेने आपली ऊर्जा वाया घालवू नये. काळाबरोबर जा. मन विचलित होईल आणि मानसिक तणाव असू शकतो, परंतु तुम्ही खूप धाडसी आहात. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा आणि अनावश्यक वादात पडू नका. बॉसशी चांगले संबंध ठेवावे, अन्यथा त्यांची नोकरी गमवावी लागू शकते. संयम बाळगण्याचा प्रयत्न करा.

जुने वस्त्र दान द्या

कुंभ

हा आठवडा चांगले आरोग्य, प्रगती आणि नवीन आर्थिक संधी घेऊन आला आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी, आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करा. कामाचा ताण जास्त असेल. अधिक जलद गतीने लाभ मिळण्यासाठी बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा. काही कौटुंबिक बाबींबद्दल चिंता आणि मानसिक तणाव दिसून येईल.

हीना अत्तर जवळ ठेवावे

मीन

तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आठवड्याची सुऊवात कराल आणि एकामागून एक लाभ घ्याल. आर्थिक स्थिती चांगली राहील. लव्ह लाईफ चांगली राहील. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. पैशाचा हुशारीने वापर करावा. अविवाहितांना लग्नाच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा सामान्यत: अनुकूल आहे.

हळदीचा टिळा लावावा

 टॅरो उपाय : नोकरीत 100 टक्के यश मिळविण्यासाठी, कोणत्याही मुलाखतीला जाण्यापूर्वी, पिठाचा गोळा बनवा आणि त्यात थोडा गूळ भरा. आता घराबाहेर पडताना गाय किंवा वासराला खाऊ घाला. असे केल्याने नोकरी मिळण्याची शक्मयता वाढते.

Advertisement
Tags :

.