महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:01 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

स्वत: पुरता मर्यादित विचार करू नका, थोडा इतरांचा फायदा कसा होईल. याचाही विचार करावा. मित्र संबंधांमध्ये एखाद्या मित्राची आवाजवी अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. आर्थिक बाबतीमध्ये घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याकडे कल असेल.

Advertisement

-केळीच्या झाडाखालची माती जवळ ठेवावी

 वृषभ

तुमच्या पाठीमागे बोलणारी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. हा आठवडा संमिश्र्र प्रकारचे फळ देईल. आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या आठवडा चांगला जाईल. पण नातेसंबंधांमध्ये तणाव येण्याची शक्मयता आहे.

-गरजू विद्यार्थ्यांना वस्त्र दान करावे

मिथुन

आर्थिक नियोजन विस्कटण्याची शक्मयता. कामाचा व्याप सांभाळताना आपल्या सहकार्यांबरोबरचा आपला व्यवहार योग्य असावा, याची काळजी घ्या. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण या आठवड्यात अनुभवायला येईल. प्रेमसंबंधात विश्वासाला महत्त्व द्या.

सात लवंगा जवळ ठेवाव्या.

 कर्क

इतरांवर अवलंबून राहू नका. होणारी कामे होणार नाहीत. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये थोडा बदल होण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात तब्येतीला सांभाळावे लागेल. तसेच भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणावरही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.

पिंपळाचे न फाटलेले पान जवळ ठेवावे

 सिंह

आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये समोरची व्यक्ती तुमचा फायदा उचलू शकते.  याचे कारण कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीशी आलेला दुरावा असू शकते. या आठवड्यात तुम्ही स्वमग्न असाल. आर्थिक बाबतीमध्ये येणे कमी आणि देणे जास्त अशी परिस्थिती होऊ शकते.

कष्टकऱ्यांना दूध दान करावे

 कन्या

आयत्या वेळी कोणावर तरी विश्वास करावा आणि त्याच व्यक्तीने दगा द्यावा, अशी साधारण परिस्थिती या आठवड्यामध्ये असेल. परिवारासोबत वेळ घालवल्यामुळे मन आनंदी असेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. जुनी एखादी चिंता तुम्हाला सतावू शकते. परिवारातील व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. जास्त दमछाक होऊ देऊ नका.

लहान मुलीला हिरवे वस्त्र दान करावे

 तूळ

या आठवड्यात तुमचा कल थोडासा अध्यात्माकडे झुकलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखवलेला उत्साह आणि केलेले नियोजन याचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायाच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेला तणाव कमी होऊ लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा मानस असेल.

लाजाळूची पाने जवळ ठेवावी

 वृश्चिक

तुम्ही विचार केलेल्या कामाचा किंवा कल्पनेचा फायदा तिसराच कोणीतरी उचलण्याची दाट शक्मयता आहे. त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवाव्या. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रेमींनी लांब फिरायला जाणे टाळावे.

मुंग्यांना साखर घालावी

 धनु

आजुबाजूची परिस्थिती आणि जवळच्या माणसांचा बदललेला स्वर हा तुमच्या चिंतेचा विषय असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा त्रास संभवतो. दुसऱ्यांना केलेल्या मदतीचा परतावा तुम्हाला मिळणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये अनावश्यक टोमणे मारणे टाळावे. महिलांनी आपल्या तब्येतीची खास काळजी घ्यावी.

गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट द्यावी

 मकर

मनाप्रमाणे कामे न झाल्यामुळे मन उदास होऊ शकते. धार्मिक समारंभात भाग घ्याल. ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. मित्र परिवारासोबत एखादी सहल प्लॅन कराल. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. पारिवारिक नात्यांमध्ये गुंता होण्याची शक्मयता आहे.

लहान मुलांना खव्याची मिठाई वाटावी

 कुंभ

जवळच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्याल. अपेक्षित नसलेली कामे पूर्ण झाल्यामुळे आनंदाचा धक्का बसेल. जवळच्या मित्राच्या मदतीमुळे छोट्या-मोठ्या अवघड प्रसंगातून तऊन जाल. या आठवड्यात तुम्हाला कृतज्ञता दाखवण्याच्या संधी मिळतील.

महत्त्वाच्या कामाला जाताना तुळशीचे पान जवळ ठेवावे

 मीन

गेल्या काही दिवसांपासून घरात आणि कामाच्या ठिकाणी असलेला संवाद निवळू लागेल. या आठवड्यात काही वेळ तुम्हाला तणावमुक्त रहावे असे वाटेल. एखाद्या सुट्टीची किंवा एखाद्या ब्र्रेकची गरज आहे. हेही तुम्हाला जाणवेल. आर्थिक आवक थोडी कमी असली तरी समाधानाचे क्षण मिळतील.

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावीत

 

टॅरो उपाय :  शेताच्या रक्षणाकरता  पौर्णिमेला नदीकाठची वाळू  आपल्या दोन्ही हातात  मावेल इतकी घेऊन यावी.  रात्री एका पात्रात  ही वाळू पसरून  आपण ज्या धर्माच्या ज्या देवतेला मानतो त्या देवतेचे नाव अनामिकेने त्या वाळूत लिहावे.     वरून काच ठेवावी  म्हणजे वाळू  वाऱ्याने उडणार नाही. दुसरे दिवशी  सूर्यास्तानंतर  ती वाळू  आपल्या शेताच्या चारी बाजूला टाकावी. सूर्य चंद्र  शेताचे रक्षण करतात  असा संकेत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astrology#social media
Next Article