For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

पुष्कळ राबूनसुद्धा योग्य तो मोबदला न मिळाल्याने थोडी निराशा होऊ शकते. पण संयमाने घेतले तर विलंबाने का होईना, पण यश नक्की मिळेल. हाताखालील लोकांची मर्जी सांभाळावी लागेल. ज्यांच्या हाताखाली काम करता, त्यांच्या रोषाला आमंत्रण देऊ नका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. प्रेमींनी योग्य-अयोग्य याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घ्यावा.

पिंपळाच्या फांदीला लाल दोरा बांधावा

Advertisement

वृषभ

आर्थिक दृष्टीने आणि सामाजिक मान प्रतिष्ठेच्या दृष्टीनेदेखील येणारा आठवडा महत्त्वपूर्ण असेल. पूर्वी ज्यांच्यावर उपकार केले होते. अशा माणसांची योग्य वेळी साथ मिळण्याची शक्मयता आहे. कुटुंबामध्ये एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमुळे वाद होण्याची शक्मयता आहे. भांडण विकोपाला जाऊ नये, याची काळजी घ्यावी. गुऊवारी एखाद्या मित्राची मदत मागावी लागू शकते. अशावेळी संकोच न करता मदत घ्यावी.

तुळशी खालील माती कपाळी लावा

मिथुन

‘देता किती घेशील दो कराने देता किती घेशील दो कराने’ असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. मनातील इच्छा पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीची गाठभेट होईल. कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. पण त्याचवेळी अंतर्गत राजकारणामुळे त्रास होऊ शकतो. आनंदाच्या भरात कोणालाही कसलेही वचन देऊ नका. काही वेळा ‘मी हे काम पूर्ण करू शकेन, की नाही’ असे वाटण्याची शक्मयता आहे. कुटुंबात आनंद असेल.

वाहत्या पाण्यात पाच कवड्या प्रवाहित करा

कर्क

कामाचा ताण कमी झाल्यामुळे किंवा कामाच्या ठिकाणी कामांचे नियोजन तुमच्या मनाप्रमाणे झाल्यामुळे थोडे रिलॅक्स वाटू शकते. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्राने आठवण काढल्याने खूश व्हाल. तुमचे हित चिंतणारे लोक जवळपास असल्याने धीर मिळेल. आर्थिक परिस्थिती लवकरच चांगली होणार असे संकेत आहेत. जवळची व्यक्ती प्रवासाला निघत असल्याने थोडी चिंता वाटू शकते. ऑफिसमध्ये पॉलिटिक्सला बळी पडू नका.

-तीन पिवळ्या कवड्या पाकिटात ठेवा

सिंह

या आठवड्यामध्ये काय चांगले आणि काय वाईट याचा निर्णय घेताना गोंधळ उडण्याची शक्मयता आहे. दिसते तसे नसते याची प्रचिती या काळात येऊ शकते. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत असताना डोळे आणि कान उघडे ठेवा. मित्रांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडूनच दगा मिळण्याची शक्मयता नाकारता येत येणार नाही. आर्थिक बाबतीत तितकीशी काळजी करण्याची गरज नाही.

हाताने कातलेले सूत मनगटाला बांधावे

कन्या

आजूबाजूच्या लोकांवर जितका विश्वास ठेवायला हवा, तितकाच ठेवला तर फायद्यात असाल. येणाऱ्या आठवड्यामध्ये काही लोक तुमचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे त्रास होऊ शकतो. एका महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज भासली तर ती अगम्य रीतीने पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी आपले काम आणि आपण असे धोरण ठेवले तर बरे होईल.

पिंपळाला काळा दोरा बांधावा

तूळ

अपेक्षापूर्तीचा आणि संधींचे सोने करण्याचा काळ आहे. या काळात आळस दूर सारून योग्य ते निर्णय तत्परतेने घेऊन कामे करावीत. छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला तरी पुढे जाऊन यश नक्की मिळेल. विद्यार्थी वर्गाला कष्ट करण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक मदत मिळण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाजू कमकुवत होऊ नये, म्हणून खर्चावर आवर घालणे आवश्यक ठरेल.

शमीची 7 पाने पैशाच्या  पाकिटात ठेवावीत

वृश्चिक

कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. शाब्दिक वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. एखाद्या आमंत्रणाला मान देऊन प्रवास करावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खर्च करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कामाची दगदग वाढल्याने शारीरिक थकवा येऊ शकतो. आर्थिक बाबतीमध्ये पूर्वी घेतलेल निर्णय योग्य ठरतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

वडाचे पान जवळ ठेवावे

धनू

स्वभावाला औषध नाही हे लक्षात घेऊन लोकांना माफ करायला शिकावे लागेल. काही लोक विनाकारण डिवचतील. पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून आपली कामे पूर्ण करायचा प्रयत्न करा. कुटूंबातील लहान-सहान भांडणाकडे दुर्लक्ष करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले एप्लीकेशन मंजूर होण्याची शक्मयता आहे. प्रेमींनी एकमेकांसाठी वेळ काढणे गरजेचे असेल.

ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवा

मकर

एखाद्या खोट्या समारंभामध्ये सामील व्हाल. या आठवड्यात तुमचा नावलौकिक वाढण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या दृष्टीने थोडा कठीण काळ असला तरी निराश न होता योग्य तो उपचार घ्यावा. बरेच दिवस आणलेले एखादे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. एखाद्या धार्मिक प्रवृत्तीच्या माणसाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी कामांच्या बाबतीत संभ्रम होऊन गोंधळ होऊ शकतो. मदत मागायला मागेपुढे पाहू नका.

तांब्याचे नाणे जवळ ठेवा

कुंभ

आजूबाजूच्या लोकांवर जितका विश्वास ठेवायला हवा. तितकाच ठेवला तर फायद्यात असाल. येणाऱ्या आठवड्यामध्ये काही लोक तुमचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे त्रास होऊ शकतो. एका महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज भासली तर ती अगम्य रीतीने पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी आपले काम आणि आपण असे धोरण ठेवले तर बरे होईल.

पिंपळाला काळा दोरा बांधावा

मीन

कामे पूर्ण होतील. तब्येतीला जपावे लागेल. आर्थिक विवंचना कमी होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्यांच्या गैरवर्तणूकीचा त्रास होऊ शकतो. पैसे साठवण्याकडे कल राहील. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल आणि त्याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. प्रेमींना उपहार मिळू शकतो.

चंदनाचा धूप लावावा

टॅरो  उपाय : काही वेळेला आपल्याला अचानक पैशांची गरज लागते आणि कोणीही मदत करायला येत नाही  किंवा एखादे संकट उभे राहते आणि काय करावे कळत नाही.  अशा वेळेला  दोन्ही हाताच्या  अंगठा आणि मधल्या बोटात  चिमूटभर हळद घ्यावी,  आपल्या घराच्या पश्चिमेकडे  बसून आपली इच्छा  51 वेळा  मनातल्या मनात   म्हणावी,  ही हळद एका  कागदात   झोपताना उशीखाली ठेवावी. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात घालावी. हा प्रयोग करत रहावा.  अगम्य रीतीने मार्ग सापडेल.

..

Advertisement
Tags :

.