For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

इतरांशी अकारण वाद संभवतो. तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जवाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो.

पक्षांना दाणे द्या

Advertisement

वृषभ

स्वत:च्या तब्येतीला जपला तर इतरांच्या मदतीला धावून जाता येऊ शकते.  बदलत्या ऋतूमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली थोडीशी बेपर्वाई आपल्याला हानिकारक ठरू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील.

व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन

ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्र चित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध रहा. परिवारात नवा आनंद येणार आहे.

मंदिरात पेढे ठेवा.

कर्क

कुंटुबियांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारातील नफ्यात घट होईल. मित्रांचे वागणे सहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील.

गोमती चक्र जवळ ठेवा.

सिंह

शत्रूची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता सतावेल. कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा.

वडाचे मूळ जवळ ठेवा

कन्या

राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष राहा. आई-वडिलांकडून सहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.

हिना अत्तर लावा.

तूळ

एखाद्या पारिवारिक कार्यक्रमात जाणे होऊ शकतो. कोणीतरी आपल्यावर मोठी आस बाळगून आहे, कृपया त्या व्यक्तीला निराश करू नका. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. अपत्यांचे वागणे प्रसन्नता देईल. जीवनात उत्साह आणि आशा कायम राहील. 3 तारखेनंतर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

मंदिरात दूध दान करा

वृश्चिक

लाभदायक काळ आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून सहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. संगणक व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.

लिंबाच्या झाडाला पाणी घाला

धनु

तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात, त्या समस्येचा या महिन्यात तोडगा निघेल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण सहाय्य प्राप्त होईल. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील.

मोगऱ्याचे अत्तर लावा

मकर

काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.

आवळ्याच्या झाडाला पाणी घाला

कुंभ

चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल. सगळा विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे.  अधिकारीवर्गाच्या चांगल्या संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.

आपल्या वयाइतके  बदाम दान करा

मीन

हितशत्रू  तुम्हाला  चुकीचे मार्गदर्शन करू शकतात. लक्षात असू द्या. वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा आठवडा शुभ आहे. शत्रूच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. फार परिश्र्रम करावे लागतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.

गाईची सेवा करा

  टॅरो उपाय: शुक्रवारी एक 5 ऊ. चे नाणे घ्यावे (त्यावर कुठेही 8 आकडा नसावा).  त्यावर तुमच्या नावाचे पहिले अक्षर शेंदराने लिहावे. यानंतर हे 5 ऊपयांचे नाणे टेरेस किंवा पाण्याच्या टाकीजवळ ठेवावे. हे नाणे रात्रभर तिथेच आणि दुसऱ्या दिवशी पूजास्थळी ठेवावे. हे नाणे लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने कायम बरकत येते.

Advertisement
Tags :

.