For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

क्र.   विशेष      तारीख

Advertisement

1       शुभ दिवस       1,3,4,5,6,9,12,13,15,16,18,22,23,

2       अशुभ दिवस  7,8,11,25,27,30.

Advertisement

3       सण/उत्सव/विशेष तिथी 9-गुढीपाडवा, 14-आंबेडकर जयंती, 17-रामनवमी, 21-महावीर जयंती, 23-हनुमान जयंती,

Advertisement

4      अमावास्या/पौर्णिमा     7-उ.रात्री 3.23 नंतर अमावास्या प्रा.8- रात्री 11.52 पर्यंत                                      22-रात्री 3.27 नंतर पौर्णिमा प्रा.23- उ.रात्री 5.20 पर्यंत

5       साखरपुड्याचे मुहूर्त      दि.3 व 4 सायं 4.15 नंतर, दि.5 सायं 6 पर्यंत, दि.9 दु.4 नंतर, दि.12 दु.1.30 नंतर, दि.13 दु.3 पर्यंत, दि.18 स. 8 नंतर दि.20 दु.2 नंतर, दि.21,22,23 सायं 4.30 नंतर, दि.26 सायं. 8 पर्यंत

6       बारसे (नाव ठेवण्याचे) मुहूर्त         ----

7      जावळाचे मुहूर्त      6,7,16,24,26,27,28.

8      भूमिपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त      --

9       गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक) 6,7,8,15,16,24,26,27.

10     वास्तूशांतीचे मुहूर्त (व्यावहारिक)       24,26,27.

11     व्यापार सुऊ करण्याचे मुहूर्त         9.

12     वाहन खरेदीचे मुहूर्त      5,6,7,10,16,24,26,27,28.

13     शेतजमीन/जागा/प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त          1,10,11,19,24,26,29,30.

14    शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 1,3,4,9,12,28,29.

15     डोहाळे मुहूर्त  1-स.9.30 नं,15-दु. 12 पर्यंत, 16-दु. 1.30 पर्यंत, 23-सायं 4.30 नं,28-स 8.30 नं,29.

16    पंचक       शुक्रवार दि.5 ा सकाळी 7.9 पासून मंगळवार दि.9 ासकाळी 7.33 पर्यंत

मेष

छोट्या तीर्थयात्रेचा विचार मनात येईल अथवा करण्याची शक्मयता आहे. तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ खुश होतील. तुमचे आवडीचे पदार्थ खायला मिळतील. शेजाऱ्यांचे, मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. सुरी, कात्री अशा धारदार वस्तूपासून सावध रहा. नकळत इजा होण्याचा संभव आहे. एकूण हा आठवडा समाधानकारक जाईल.

उपाय:रोज अंघोळ झाल्यावर 10 वेळा गायत्री मंत्र म्हणा.

वृषभ

स्थावर मालमत्तेबाबत काही चर्चा चालली असल्यास पूर्णत्वाकडे येण्याची शक्मयता आहे. नवीन वाहन अथवा वास्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर त्या नुसार हलचाली कऊ लागाल. बराच काळ मातेच्या सहवासात रहायला मिळण्याची शक्मयता आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. यश नक्की मिळेल.

उपाय: महालक्ष्मीची उपासना करावी.

मिथुन

संततीकडे लक्ष द्यावे. परीक्षेचे दिवस आहेत. पण प्रलोभनेही भरपूर आहेत. त्यांचे लक्ष अभ्यासापासून डळमळीत होत नाही ना, आपली मुले या प्रलोभनांना बळी पडत नाहीत ना, याकडे लक्ष द्या. अचानक कुठूनतरी धनलाभाची शक्मयता आहे. एखाद लॉटरीचे तिकीट घेऊन पडताळून पहायला हरकत नाही. एखादी विद्या शिकायची इच्छा असेल तर लगेच तयारीला लागा. यश मिळेल.

उपाय: आपल्या कुलदेवतेची उपासना करा.

कर्क

तब्येतीला सांभाळावे. काहीतरी शरीर पीडा होण्याचा संभव आहे. नोकरावर फार विश्वास नको. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. सध्या या आठवड्यात कुठले नवीन काम अंगावर घ्यायला जाऊ नका. अडथळे येण्याचा संभव आहे. मन अस्वस्थ राहील. काहीतरी अनाहूत चिंता सतावत राहील. घरात किंवा बाहेर स्वत:चा मान ठेवून रहा. नकळत अपमानास्पद घटनांचे शिकारी होण्याचा संभव आहे.

उपाय:बाहेर पडताना कपाळावर केशरी गंध लावण्याचा प्रघात ठेवा.

सिंह

जोडीदाराबरोबर हा आठवडा खूप छान जाईल. विवाहेच्छुकांचा विवाह जमण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र व्यवसायात असाल तर या आठवड्यात प्राप्ती चांगली होण्याची शक्मयता आहे. काही मौल्यवान वस्तू मिळत नसेल किंवा कुठेतरी हरवली गेली असेल तर या आठवड्यात मिळण्याची शक्मयता आहे. मात्र जर काही ठिकाणी, काही वेळेला वादावादीचा प्रसंग आला, तर तो शक्मयतो टाळायचा प्रयत्न करा.

उपाय:तहानलेल्याना पाणी पाजा.

कन्या

या आठवड्यात कुठून तरी गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. पण धन मिळेल म्हणून चुकीच्या मार्गाने धन मिळवण्याचा प्रयत्न कदापीही करू नका. त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान संभवते. सासुरवाडीकडून काहीतरी फायदा संभवतो. पण काही कारणाने मन अस्वस्थ राहण्याचीदेखील शक्मयता आहे. सांभाळून रहा. मनावर संयम ठेवा.

उपाय: नामस्मरणात वेळ घालवा.

तूळ

हा आठवडा अतिशय उत्तम जाईल असे दिसते. काहीतरी विशेष धर्माचरण कराल. त्यामुळे भाग्य उजळून निघेल. तीर्थयात्रा घडण्याची शक्मयता आहे. घरातील वडील मंडळींचा सहवास आणि त्यांचे आशीर्वाद मिळतील. सत्संग घडेल. गुऊ सापडावा अशी जर खरी तुमची तळमळ असेल तर कदाचित गुऊ सापडण्याची शक्मयता आहे.

उपाय:दत्ताची उपासना करा.

वृश्चिक

हा आठवडा आपल्याला अतिशय उत्तम जाणार असे दिसते. नोकरीत असाल तर वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपली पदोन्नतीदेखील होण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र उद्योग असेल तर भरभराट होईल. उद्योगात चांगला जम बसेल. त्यामुळे समाजातील आपला दर्जा उंचावेल. पित्याचे चांगले सहकार्य लाभेल. परदेशी जाण्याचा विचार मनात आणाल.

उपाय: दर मंगळवारी माऊतीचे दर्शन घ्या.

धनु

वडील भावडांच्या सहवासात आनंदात वेळ जाईल. आपल्या जुन्या चांगल्या मित्राची भेट होण्याची शक्मयता आहे. अथवा एखादा चांगला नवीन मित्र भेटण्याची शक्मयता आहे. ज्यामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा लाभ होण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला कोणता ना कोणता तरी लाभ देऊन जाणार असे वाटते. मग तो मित्राचा सहवास असो वा भावंडांचा वा इतर.

उपाय: मुक्या जीवांना खाऊ पिऊ घाला

मकर

खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या वेळी खर्च करा. अपव्यय नको. राजकारणात असाल तर खेळी जपून खेळा. आपली राजकारणी खेळी होईल, त्या खेळात निष्पाप व्यक्तीचे नुकसान होईल, असे होऊ देऊ नका. वाहन जपून चालवा. स्वत:ला सांभाळा आणि दुसऱ्यांना इजा होऊ देऊ नका.

उपाय: महादेवाची उपासना करा.

 कुंभ

मन चंचल होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. परीक्षेचे दिवस आहेत. मनाला भरकटू देऊ नका. आचरण सत्वशील ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी चिडचिड करू नका. शांतपणे विचार केल्यानेच अडचणीवर मात करता येते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते आणि ही जिद्दच माणसाला यशाच्या शिखरावर पोचवते.

उपाय: गणपतीच्या मूर्तीवरील निर्माल्यातील दुर्वा आपल्या जवळ ठेवा.

मीन

या आठवड्यात कुटुंबासाठी आपला वेळ द्याल. आणि त्यातून आपल्याला आनंदही मिळेल. पूर्वार्जित कौटुंबिक द्रव्यलाभाची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याने सर्वांवर छाप पाडाल. आपल्या अंगी लिखाणाची कला असेल, म्हणजे आपल्याला लिखाणाची आवड असेल तर त्यातून आपल्याला फायदा होईल. तुमच्या लेखनाचा इतरांच्या मनावर चांगला परिणाम होईल.

उपाय : महालक्ष्मीची पूजा करा.

Advertisement
Tags :
×

.