राशी भविष्य २०२६-तूळ

मो: 9611663465
तूळ राशीचे लोक न्याय, सार्वजनिक स्वातंत्र्य, सार्वजनिक हक्क आणि सौंदर्याचे चाहते असतात. प्रेमाच्या बाबतीत गंभीर असतात आणि नेहमीच असाधारण लोकांमध्ये रस दाखवतात. वाहनप्रेमी व व्यावहारिक असतात. त्यांना नवीन ठिकाणी भेट देणे आवडते. व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असते. त्यांच्या डोळ्यात चमक व चेहऱ्यावर आनंद असतो. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे आवडते. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत, इतरांना प्रोत्साहन देणे आणि पाठिंबा देणे हा त्यांचा स्वभाव आहे. हुशारीने समस्यांवर योग्य आणि तार्किक उपाय शोधतात.
तूळ राशीच्या लोकांना खेळ आणि कला क्षेत्रात जास्त रस असतो. प्रेमळ आणि सहानुभूतीशील हृदय असलेले बुद्धिमान असतात. दयाळूपणा, सौम्यता, निष्पक्षता, तर्कशास्त्र, हट्टीपणा, तात्विक तर्क आणि निर्णयक्षमता वारशाने मिळाली आहे. बहिर्मुखी, आशावादी असून त्याना शांत, एकटे राहणे पसंत असते. त्रासदायक गोष्टींवर सहज आणि लवकर मात करतात. कोणालाही सहजपणे संतुष्ट करू शकतात. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी योग्य गोष्टी बोलतात. खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी सहसा सोडत नाहीत. तूळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात. आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात. बौद्धिक काम करण्याची त्यांना जास्त आवड असते. यांचा आवाज सर्वांना आवडतो. चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते. वादामध्ये वेळ व्यर्थ घालवत नाहीत. सामाजिक कार्य, उत्सवामध्ये आवडीने एकत्र येतात. मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास देणारे हे पालक असतात. अति भावनाशीलतेमुळे निराशेचा सामना करावा लागतो. इतरांसमोर आपल्या समस्यांना वाचा फोडत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याशी कठीण संभाषण होते किंवा हल्ला होतो तेव्हा या राशीच्या व्यक्ती शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी स्वत: माघार घेतात.
या राशीचा स्वामी शुक्र आहे. ही रास असलेल्यांची कफ प्रवृत्ती असते. या राशीचे पुरुष महिला /सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता विलसत असते. यांचा स्वभाव सम असतो. सामाजिक कार्य, उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात. आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि दिलखेचक असते. चेहरा हसरा असतो. या राशीच्या व्यक्ती माहितगार, हुशार आणि व्यवहारचतूर असतात. आपले वागणे कोणासाठीही बदलत नाही. सर्वांशी सारखे वागतात. कोणालाही त्रास देणे आपल्याला आवडत नाही. तसेच तुम्ही कोणाला त्रासात पाहू शकत नाही. जिवलगांसाठी प्राणही पणाला लावता. शत्रूला जिंकता. आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे एकावेळी अनेक गोष्टीत आपण निपुण असता. आळशीपणाला तुमच्या आयुष्यात काहीही महत्व नसते. आपण काही करायचे ठरवले की ते लगेच करता. कोणत्याही अपयशामुळे खचून जात नाही. वास्तवावर आणि जीवनातल्या सत्यावर विश्वास ठेवणे यामुळे तुम्हाला हवेत इमले बांधायला आवडत नाहीत. तुमचा स्वभाव खंबीर असतो आणि लालसेचे विषय तुम्हाला आकर्षित करू शकत नाहीत.
ग्रहमान
वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. मिथुनेचा गुरु आपल्यासाठी भाग्यकारक राहील. जो न होणारी कामेसुद्धा सहज घडवून देईल. कर्केचा गुरुसुद्धा कर्मस्थानात तुम्हाला शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व गाजवणार आहात आणि लाभातल्या गुरुचे भ्रमण तरी अतिशय शुभकारक राहणार आहे. ह्यावर्षी गुरुच्या कृपेमुळे सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होणार आहेत. लग्नासाठी वर्षभर गुरुबळ राहणार आहे. स्वप्ने पूर्ण होण्यासाठीचा राजमार्ग मिळणार आहे.
हात लावाल ते सोने या उक्तीप्रमाणे कोणत्याही कामात हात घातल्यास ते यशस्वी होणार आहे. वर्षभर मीन राशीचा शनी षष्टमस्थानात राहणार आहे. षष्ठीत शनि मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. उद्योग धंद्यामध्ये बारीक-सारीक अडचणी निर्माण होऊ शकतील. नोकरीत अनिष्ट घटना घडणार नाहीत याकडे लक्ष द्या. बारीक-सारीक आजारसुद्धा संभावतात. मात्र गुरु अतिशय शुभ असल्यामुळे शनीचा फार त्रास होणार नाही. जवळजवळ वर्षभर राहू कुंभ राशीत असून पुढे मकर राशीत जात आहे. कुंभ राशीतला राहू तुम्हाला पंचमस्थानात राहील. कुसंगत टाळा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अतिशय सावधगिरी बाळगावी.
गर्भवतींनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सामान्य स्त्रियांना पाळीचे त्रास संभवतात, गर्भ पीडेपासून काळजी घ्यावी. केतू वर्षभर आपल्या लाभस्थानी असून आर्थिकदृष्ट्या फायद्याचा राहील. केतूचे भ्रमण कमी जास्त शुभ प्रमाणात राहणार आहे. मित्रमंडळींना कर्ज वगैरे देताना दहावेळा विचार करा. एकंदरीत राहूचे भ्रमण अशुभ तर केतूचे शुभ राहणार आहे. राहूमुळे पोटासंबंधित आजार होण्याची शक्यता आहे. कधी कधी मानसिक त्रासदेखील दर्शवितो. ज्यांना पोट किंवा डोक्याच्या संबंधित आजार आधीपासून आहेत, त्यांनी या काळात आपल्या आरोग्य सांभाळणे अतिशय गरजेचे आहे.
नोकरदार
वेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. कामाचे श्रेय नक्की मिळणार अशी ही वेळ आहे. इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. मुलांकडून आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. ध्यानधारणेसाठी थोडा वेळ द्याल. एखादी मौल्यवान संपत्ती विकत घ्याल. योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. अध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. कष्टांचे चीज होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. नवीन घराचे बांधकाम कराल. हा समृद्धीचा काळ असून अनेक अनपेक्षित गोष्टी आनंदायी असतील. न्यायालयीन खटले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे.
स्त्री वर्ग
आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष खूप अनुकूल राहील. वर्षाच्या सुरुवातीला व्यवसायात अनुकूलतेमुळे उत्पन्नात वाढ होईल. वर्षाच्या मध्यापर्यंत तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होत राहतील. ज्या पैशासाठी बराच काळ प्रयत्न करत होता ते या वर्षी मिळतील. वर्षाच्या मध्यानंतर, गुरुच्या प्रभावामुळे, बचत करण्यातदेखील यशस्वी व्हाल. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि कौटुंबिक संबंध सुधारतील. मानसिक शांती मिळेल. अविवाहित असाल तर नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्य होईल. संतुलित दृष्टिकोन ठेवल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. घरातील वडीलधाऱ्यांची मदत मिळेल. वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे अनेक निर्णय चांगले ठरतील. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. या वर्षी करिअरमधील नवीन संधी दार ठोठावतील. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन योजना यशस्वी होतील. सहकाऱ्यांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. प्रेमप्रकरणात भावनिक जवळीक वाढेल. तुम्ही भाग्यवान आहात, असे तुम्हाला वाटत राहणार. तुम्ही तुमच्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकाल. व्यवसाय आणि करिअरमध्ये नशिबाची साथ मिळेल. परिस्थिती सुधारेल. नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. बाजारात अडकलेले पैसे अचानक परत मिळतील आणि व्यवसाय वाढवण्याची संधीदेखील मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पैसे कमविण्याचे नवीन मार्गदेखील मिळतील. आयटी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषत: चांगला असेल. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे या वर्षी तुमचे आरोग्य अनुकूल राहील. तुमच्या मनात नेहमीच चांगले विचार असतील, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधानी ठेवतील. तुम्ही प्रत्येक काम सकारात्मक पद्धतीने कराल. परंतु चांगल्या आरोग्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
विद्यार्थी
शिक्षणाशी संबंधित सक्षम शिक्षकाकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहील, जे खूप महत्वाचे ठरेल. अभ्यासाव्यतिरिक्त, बौद्धिक कार्यात आवड वाढेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. बँकिंग किंवा व्यवस्थापनसारख्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी वेळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी किंवा खासगी क्षेत्रात भाग घेतलेल्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, असे म्हणता येईल. संशोधनात गुंतलेले विद्यार्थी असाल तर चांगले निकाल अपेक्षित करू शकता.
- राशीस्वामी - शुक्र
- शुभवार - शुक्रवार
- अशुभ वार - गुरुवार
- घात मास - माघ
- शुभ रंग - पांढरा व गुलाबी
- भाग्यरत्न - हिरा
- आराध्य देवता - श्री कुलदेवता