For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य २०२६-मिथुन

10:52 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य २०२६ मिथुन
Advertisement
प्रशांत अर्जुनवाडकर
मो: 9611663465

मिथुन राशीचे व्यक्तिमत्व प्रभावी असते, जे त्यांच्या बुद्धिमत्ता, विवेकी आणि मानवतावादी स्वभावाचे प्रतिबिंब असते. यांचा स्वभाव बहुमुखी, कल्पनाशील, आनंददायी, विचारशील आणि जुळवून घेणारा असतो. सामान्यत: मृदूभाषी असून वत्तृत्व कौशल्य असते. दूरदर्शी असतात. स्वभावाने विनोदी कलाकार असतात.  लोकांना सहजपणे समजून घेऊन परिस्थितीनुसार सहजपणे हाताळतात. प्रवास करायला आवडते. फायदे आणि तोटे विचारात घेऊन त्यानुसार निर्णय घेतात. म्हणूनच आपण थोडक्यात असे म्हणू शकतो की ते निर्णय घेण्यापूर्वी वेळ घेतात.

Advertisement

मिथुन राशीच्या व्यक्तींकडे तार्किक, स्पष्ट आणि जलद मानसिक कृती असल्याने एकाच वेळी अनेक कामे हाताळू शकतात. कोणत्याही नवीन आव्हानाला आणि कल्पनेला तोंड देण्यासाठी सतर्क असतात. अनेक भाषा जाणून घेण्याची प्रतिभा असते. बुद्धिमान राशी असल्याने त्यांना गोष्टी लक्षात ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही. त्यांचे विचार खूप विस्तृत असतात. मिथुन राशीचे लोक इतरांचे मन वाचू शकतात. ते दूरदृष्टी असलेले आणि बहुमुखी प्रतिभावान असतात. अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता असते. या राशीचे लोक रहस्यमय गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांना नवीन गोष्टी शोधायला आवडतात. या लोकांना धर्माचा मार्ग अवलंबायला आवडतो. सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. पैसे दान करण्याची अद्भुत क्षमता असते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती योग्यरीत्या हाताळून मार्ग काढण्यात या व्यक्ती वाकबगार असतात.

एका वेळी एकापेक्षा जास्त व्यवसाय अथवा कामे हाताळण्याची क्षमता असते. तणावपूर्ण दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. समस्यांना सामोरे जाण्यासाठी अनेक योजना असतात. सतत अभ्यास करणे ही त्यांची सवय बनते. आवडीच्या विषयाबद्दल जास्त बोलतात, तर इतर विषयांबद्दल ते उदासीन आणि निष्काळजी राहतात. हे लोक खूप ज्ञानी असतात, परंतु त्यांचे ज्ञान सर्जनशील कामांसाठी असते. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. काम करण्याचा निर्णय घेतल्यावर ते पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाहीत. स्वभावाने चंचल असल्याने कोणत्याही एका विचारावर स्थिर नसतात. कधीकधी कोणत्याही विषयावर त्यांच्या मनात एकाच वेळी दोन विचार येतात आणि ते दोन्ही विचार एकमेकांच्या विरुद्ध असतात. अथक परिश्रम घेण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. कोणत्याही प्रकल्पावर काम करत असताना, ते मध्येच सोडून दुसरे काम सुरू करतात. जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा या राशीचे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अस्थिर होतात.या राशीच्या व्यक्तींना वाहनांची चांगली माहिती असते. नवनवीन वाहने आणि भौतिक साधनांचे आकर्षण असते. घरगुती सजावटीवर अधिक भर असतो. या राशीच्या व्यक्तीच्या मनात प्रेमभावना अधिक असते. घरगुती कारणावरून अनेकदा तणाव असतो.

Advertisement

ग्रहमान

वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. राशीवरील मिथुनेचा गुरु सर्व बाबतीत शुभ राहणार आहे. कर्पेत जाणारा गुरु जो आपल्या धनस्थानामधून भ्रमण करणार आहे, आर्थिक बाजू भरभक्कम करणार. पैशाच्या बाबतीत चिंता कमी होणार. कर्जफेड होईल. आर्थिक विषयांमध्ये जवळजवळ सर्व कामे मार्गी लागणार. खूप दिवसांपासून नवीन शुभ कार्य करण्यासाठी आपण वाट पाहत होता त्याला आता शुभ मुहूर्त मिळणार आहे. सिंहेचा गुरु वृत्ती धार्मिक बनवणार. धार्मिक वृत्ती वाढेल देव दर्शनासाठी छोटी मोठी यात्रा घडणार आहे. एकंदरीत हे तिन्ही गुरुचे भ्रमण आपल्यासाठी शुभकारक राहणार आहे. विवाहासाठी वर्षभर आपल्यासाठी उत्तम गुरुबळ आहे. शनि वर्षभर दशमात आहे. हा शनी मिश्र फळ देईल. आर्थिक नियोजन करून कामधंदे केल्यास विनाकारण संकटे येणार नाहीत. इतर ग्रहांच्या शुभ योगामुळे शनी आपल्यासाठी भरभराटीत राहणार. पतप्रतिष्ठा लाभणार.

25 नोव्हेंबरपर्यंत राहू कुंभ राशीला असून पुढे मकर राशीला जात आहे. म्हणजे राहू जवळ जवळ वर्षभर आपल्या नवम म्हणजे भाग्यस्थानी आहे. हा राहू दूरचा प्रवास घडवतो. सर्व कामांमध्ये गोष्टी सुरळीत घडत जाणार. क्वचितच अडचणी येतील. राहूचे भ्रमण आपल्यासाठी कमी जास्त शुभ प्रमाणात राहणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत केतू सिंह राशीला म्हणजे केतूचे भ्रमण मिथुन राशीला तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून जात आहे. आर्थिक लाभसुद्धा घडणार आहेत. मात्र शेजारीपाजारी लोकांशी थोडा वादविवाद होऊ शकतो. कुणालाही शब्द देताना किंवा बोलण्यामध्ये शब्द व्यवस्थित वापरला न गेल्यास विनाकारण वादविवाद होतील. आर्थिक जीवनासाठी वर्ष 2026 मागील वर्षीच्या तुलनेत बरेच चांगले राहील. प्रथम भावात गुरु महाराजांची उपस्थिती तुमच्या खर्चांना हळू हळू कमी करण्याचे काम करेल. विशेषकरून, विनाकारण खर्च कमी होतील.

नोकरदार

मिथुन राशीच्या नोकरदार वर्गाचा या काळात विकास होईल. सहकारी आणि वरिष्ठांशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या सक्रीय व्हाल. बढतीची अपेक्षा करत असाल तर ती फलद्रुप होईल. मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणारा प्रवास फलदायी ठरेल. प्रवासात आपल्या स्वभावाला अनुकूल व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. थोडा दानधर्म कराल. या काळात समृद्धी होईल. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल. खूप कष्टानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यातून समृद्धी, लोकप्रियता, चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. जमीन आणि यंत्रोपकरणांची खरेदी होईल. शत्रू नामोहरम होतील. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. लोकांना मदत कराल. हा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. आपल्या प्रत्येक समस्या आपोआप सोडविल्या जात आहेत, याची प्रचिती येईल. घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थी 

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. कष्टाचे फळही मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे काम संयम आणि बुद्धिमत्तेने हाताळावे लागेल. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उत्तरार्धापासून तुमच्या समस्या कमी होताना दिसत आहेत. तुमच्या कष्टाबद्दल प्रशंसा आणि आदर मिळू शकेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. वर्षाच्या मध्यापासूनचा काळ शिक्षणातील तुमचे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी विशेष अनुकूल असेल.

स्त्री वर्ग

या  वर्षाची सुरुवात शुभ आणि सौभाग्याने होईल. आयुष्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी विरोधक आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल कारण ते अडथळे निर्माण करू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्यादेखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल आणि तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची शक्यता आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात मोठ्या संधी मिळतील, परंतु कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची चिंता सतावेल. नशीब तुम्हाला साथ देईल. मालमत्तेच्या वादात, विरोधक वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. अविवाहितांसाठी सुवार्ता असू शकते. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहील. कोणतेही काम इतरांवर सोडण्याऐवजी, ते स्वत: करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. विशेषत: जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पैशाशी संबंधित बाबी स्पष्टपणे सोडवणे चांगले होईल. कोणत्याही योजनेत सामील होण्यापूर्वी, त्याच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सरकारी योजनांचा लाभ देखील मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी, जोडीदाराला वेळ देणे फायदेशीर ठरेल. बहुतेक वेळ सर्जनशील आणि सामाजिक कार्यात जाईल. तुम्ही व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. धैर्याने आणि आत्मविश्वासाने प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध चांगले होतील. घराचे वातावरण आनंददायी आणि शिस्तबद्ध असेल. छंद जोपासण्यासाठी थोडे जास्त खर्च करू शकता.

  • राशीस्वामी - बुध 
  • शुभवार - बुधवार 
  • अशुभ वार - सोमवार 
  • घात मास - आषाढ 
  • शुभ रंग - हिरवा  
  • भाग्यरत्न - पाचू 
  • आराध्य देवता - श्री विष्णू
Advertisement
Tags :

.