For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

उपायच उपाय. . .  तोडगेच तोडगे!!!! (भाग - 5)

Advertisement

माणूस आपल्या दु:खापेक्षा दुसऱ्याला मिळत असलेल्या सुखामुळे जास्त दु:खी होतो हे सत्य आणि मग असूया, ईर्षा निर्माण होते. दुसऱ्याला त्रास द्यायच्या वृत्तीला अनैसर्गिक म्हणता येईल का? पण त्याकरता जादूटोणा, करणे, भानामती, चेटुक यासारख्या घाणेरड्या निंदनीय मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच जनावरापेक्षा खालच्या पातळीवर उतरणे. मित्रहो, कित्येक वेळेला आपल्या प्रगतीवर किंवा आपण केलेल्या कार्यामुळे लोक आपल्यावर जळतात आणि लिंबू टाकणे, डुकराचे रक्त टाकणे, करणीची टोपली ठेवणे, दुकान बांधणे, गुलाल टाकणे, भस्म फुंकणे असलेही प्रकार करतात. मुळात माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांमध्ये ही विद्या खरोखर जाणणारे हातावर मोजण्याइतकेही उरलेले नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा किंवा 99 टक्के हे सगळे प्रकार खोटे आणि दुसऱ्याला घाबरवण्याकरता केलेले असतात. याला अजिबात न घाबरता जर समजा असे काही प्रकार घरासमोर घडले तर खराट्याच्या झाडणीने (अलक्ष्मी निस्सारण) सरळ ते गटारीत फेकून द्यावे. लक्षात घ्या, काहीही होत नाही.  भित्यापोटी ब्रह्मराक्षस ही म्हण जर लक्षात ठेवली तर समाजातून असले प्रकार कायमचे बंद होतील. आता काही गोष्टी वाचकांच्या माहिती करता सांगतो. काही लोक ज्योतिष विद्येबरोबरच इतर मार्गाने पैसा कमावण्याकरता या अशा जादूटोणा मार्गाचा वापर करतात. याकरता ते मग कर्ण पिशाच्च, स्मशान साधना यासारख्या हीन दर्जाच्या साधनांच्या मार्गाला लागतात. गीतेच्या तत्त्वाप्रमाणे ‘यथा साध्य तथा साधक’ (म्हणजे ज्या देवतेची तुम्ही पूजा करता, तुम्हीही तसेच होता) या न्यायाने जे या मार्गाला लागतात त्यांची गत शेवटी तशीच होते. म्हणून हात जोडून सांगतो की, कर्ण पिशाच्च, प्रेत साधना, स्मशान साधना यासारख्या अघोरी मार्गाला लागू नका. यातून अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होताना पाहिलेले आहे. बऱ्याच वेळेला देव घालणे हाही प्रकार करतात. म्हणजे काय की, एखाद्या देवतेला दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून साकडे घातले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत. पण मुळात तुम्ही हे लक्षात घ्या  की, दुसऱ्या करता खणलेल्या ख•dयामध्ये आपण स्वत:च पडतो. त्यामुळे कृपा करून असले प्रकार करू नका आणि अशा ठिकाणी जाऊही नका. असो. सनातन धर्मामध्ये तिलक लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. चांगले रिझल्ट मिळण्याकरता सोमवारी चंदनाचा, मंगळवारी लाल चंदनाचा, बुधवारी  कस्तुरी चंदनाचा, गुऊवारी पिवळ्या चंदनाचा, शुक्रवारी लाल चंदनाचा, शनिवारी कस्तुरी चंदनाचा आणि रविवारी लालचंदनाचा तिलक करावा.  काही घरांमध्ये सुतकी वातावरण असते. वंशवृद्धी होत नाही, वारंवार अॅक्सिडेंट होतात किंवा विवाहाला खूप वेळ लागतो किंवा विवाह होतच नाही. अशावेळी शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी, कच्चे दूध घालून सात प्रदक्षिणा घालाव्यात. काही वेळेला सार्वजनिक ठिकाणी जेवण करावे लागते. अशावेळी अन्नदोष लागण्याची शक्मयता असते. म्हणून तुरटीचा एक तुकडा आपल्याजवळ ठेवावा. जेवण वाढल्यानंतर ताटावरून ही तुरटी तीन वेळा फिरवून लांब फेकून द्यावी. दोष लागत नाही. मुला मुलींची प्रेम प्रकरणे आता कॉमन गोष्ट आहे. पण चुकीच्या मुलासोबत किंवा चुकीच्या मुलीसोबत जर आपल्या संततीचे प्रेमप्रकरण सुरू झाले तर सोमवारी किंवा शुक्रवारी अशा मुलाकडून किंवा मुलीकडून कच्च्या दुधात लिंबाचा रस घालून ते फोडावे.  अशा दुधाचा पनीर तयार करून घरातील देवाला नैवेद्य दाखवावा आणि घराच्या लोकांनी ग्रहण करावा. हा उपाय कमीत कमी नऊ वेळा करण्याची गरज आहे.

मेष 

Advertisement

तब्येत सांभाळा. धनलाभ संभवतो आहे. वडील, भावंडांचे सुख मिळेल. किंवा त्यांची गाठभेट होईल. नातेवाईक, मित्र-परिवार यांच्या संगतीत वेळ चांगला जाईल. या भेटीगाठीतून आपल्याला फायदा होईल. स्वतंत्र उद्योगातून अथवा नोकरीतून आपल्याला काहीतरी फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. एकूण हा आठवडा चांगला जाईल.

Advertisement

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

वृषभ

जुन्या मित्राकडून अपेक्षाभंग होईल. कुटुंबाबरोबर वेळ घालवाल. बऱ्याच काळानंतर एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्मयता आहे. पण वाणीवर थोडा संयम ठेवा. वाणी व लेखणी तलवारीसारखी धारदार असते. ती खूप सांभाळून वापरावी लागते. आपल्या वाणीने कुणाचे मन दुखवू नका. एवढे सांभाळलेत तर हा आठवडा उत्तम जाईल.

उपाय : दत्त उपासना करा.

मिथुन

पदव्युत्तर अभ्यासात यश मिळण्याची शक्मयता आहे. अभ्यासाला लागा. मुलांच्या अभ्यासात व त्यांच्या इतर छंदाकडे लक्ष द्या. आजकाल अनेक प्रलोभने वाढली आहेत. आपण सतर्क राहून मुलांना सावध करण्याची नितांत गरज आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण तो योग्य मार्गाने मिळायला हवा, याची काळजी घ्या.

उपाय : होईल तेवढा दानधर्म करा

कर्क

जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन सौख्य लाभेल. मन शांत ठेऊन कामाला लागा. स्थावर मालमत्तेमध्ये लाभ होण्याची शक्मयता आहे. पण थोडा विलंब लागेल. थोडे कष्ट सहन करावे लागतील. संयमाने काम कराल तर स्वत:ची प्रगती करून घ्याल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

उपाय : कुमारीका पूजन करावे.

सिंह

पैशांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. उधारी देण्या- घेण्यापासून दूर रहावे. कुटुंबात थोडी वादावादी संभवते. कागदोपत्री व्यवहार जपून करावेत. वाहन दुऊस्ती किंवा घरातील काही वस्तूंवर ती खर्च होण्याची शक्मयता आहे, प्रेमींना अनुकूल काळ आहे. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता नाकारता येत नाही. नोकरदार वर्गाला इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये ताण-तणावाचा अनुभव येईल.

उपाय: तुळशीखालील माती जवळ ठेवावी

कन्या

कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. काढलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आईबद्दल काळजी वाटू शकते. जमिनीचे व्यवहार होता होता राहू शकतात. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने आपले काम चोख करावे. वैवाहिक आयुष्यात आनंदी घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल.

उपाय: गाईला चारा घालावा

तूळ

कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांमध्ये सावध रहावे. जमिनीचे व्यवहार सध्या टाळा. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता येईल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशनसारखी घटना घडण्याची शक्मयता आहे. कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. जोडीदाराची साथ मिळेल. लहान मोठ्या अपघातापासून सावध रहावे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात.

उपाय : तीन लवंगा जवळ ठेवाव्या

वृश्चिक

तब्येतीची काळजी घ्यायला हवी. पैशाच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. प्रवास घडू शकतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत नशीबवान असाल. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेम संबंध दृढ होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये काही कटू घटना घडू शकतात. मान-सन्मानात वाढ होईल. सगळ्या प्रकारचे लाभ होतील.

उपाय : गणेश उपासना करावी.

धनु

आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवा. धन प्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कागदपत्र व्यवहारात यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ होण्याची शक्मयता आहे. मात्र, सोबत काम करणाऱ्यांचे मन राखावे लागेल. सगळ्या प्रकारच्या लाभाची शक्मयता आहे.

उपाय: चंदनाचा टिळा लावावा

मकर

प्रवासातून फायदा होईल. वाहन आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत अनुकूल घटना घडण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या बरोबर काम करणारेच तुमच्याबद्दल कागाळी करू शकतात. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. तीर्थक्षेत्री भेट द्याल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढावी म्हणून प्रयत्न करा.

उपाय : देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा

कुंभ

धनप्राप्तीच्या बाबतीमध्ये चिंता करण्याची काहीच गरज नाही. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्मयता आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणालाही जामीन राहण्यापासून दूर राहा. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. शेअर मार्केटपासून नुकसान संभवते. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. छोट्या-मोठ्या अपघातापासून सावध रहावे.

उपाय: हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी.

मीन

मूड चांगला राहील. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. प्रवास टाळावा. लिखाणात चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. फोनवर बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा. स्थावर मालमत्ता आणि वाहन खरेदी याच्या बाबतीत नशीब साथ देईल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

उपाय:  कुमारिका पूजन करावे

Advertisement
Tags :
×

.