For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:05 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

मेष

Advertisement

अनावश्यक खर्च होण्याची शक्मयता आहे. तुमचे शत्रू नुकसान करण्यात यशस्वी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकलात तर यश तुमच्या हाती लवकरच येऊ शकते. जोडीदारासोबतही वाद होऊ शकतात. शत्रूंच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे, कठोर परिश्र्रम करावे लागतील.

कुंकवाचा टिळा लावा

Advertisement

वृषभ

Advertisement

तब्येतीला सांभाळून रहावे लागेल. मनोकामनापूर्तीचा काळ आहे. तुमच्या कष्टाचे फळ विलंबाने का होईना, पण नक्की मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. परदेशातून उत्पन्न मिळण्याची शक्मयता आहे. राजकीय वातावरणात तुमचा दर्जा वाढू शकतो. विरोधक तुमच्या समोर असतील. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळण्याचे योग आहेत. कुटुंबाकडून प्रेम मिळेल.

दररोज सकाळी पक्ष्यांना खायला घाला.

मिथुन

बरेच दिवस रेंगाळलेले काम पूर्ण होऊ शकेल. पोटाच्या तक्रारी येऊ शकतात. तुमचे कार्ड दर्शविते की, हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र्र असेल. या काळात परिस्थिती चांगली राहणार नाही, वेळापत्रकानुसार काम करा, कौटुंबिक त्रास असू शकतात, कार्यक्षेत्रातही वेळ प्रतिकूल आहे, आईच्या आरोग्यासाठीही वेळ हानिकारक आहे. न चुकता दान, धर्म करा.

लाल रंग वापरणे टाळा

कर्क

ओळखीतून कामे होतील. कौटुंबिक वादविवाद टोकाला जाऊ नये याची काळजी घ्या. व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकते. उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्यास, किरकोळ समस्या असतील ज्याचा परिणाम नाही होणार. हाताखालील माणसांवर जास्त विश्वास ठेवू नका.

गाईला चारा घाला

सिंह

कोणालाही कर्ज देणे टाळा. कदाचित ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. या आठवड्यात तुम्ही नवीन ज्ञान, कौशल्ये शिकू शकता किंवा सुरू करू शकता. मालमत्तेमध्ये खरेदी-विक्री होईल. प्रेमाच्या बाबतीत हा काळ तुमच्या आयुष्यात चांगला काळ ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठीही काळ चांगला जाणार आहे.

हिरव्या भाज्या दान करा

कन्या

या राशीची स्थिती फारशी अनुकूल नाही, त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. म्हणून, पती-पत्नी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील, या काळात विनाकारण वादात पडू नका. ज्यांना तुमचा हेवा वाटतो, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कार्यक्षेत्रात काही अडथळे येतील, पण तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही ते सोडवू शकाल.

आंबट -गोड मिठाई वाटा

तूळ

स्थावर मालमत्तेशी संबंधित कामे होऊ शकतात, तुमचे नवीन घरही बांधता येईल. व्यवसायात गती सामान्य राहील. नशिबाची साथ लाभेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. जग तुमच्या कामाचे कौतुक करेल. मान-सन्मान वाढेल. तुम्हाला कामात लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो, परंतु चांगली बातमी अशी आहे की, तुमचे सर्व प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

निळे फूल जवळ ठेवा

वृश्चिक

प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या मित्राची अचानक भेट होण्याची शक्मयता आहे, जी फायदेशीर ठरेल. विद्यार्थी मेहनतीने शिक्षण घेतील. विवाहित स्त्री-पुऊषांच्या मनोकामना पूर्ण होतील. इच्छित जोडप्यांना संततीचा लाभ मिळेल. उत्पन्न वाढेल. व्यवसायातील गुंतवणुकीचे दूरगामी परिणाम होतील. क्रोध हा तुमचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे रागाला स्वत:पासून दूर ठेवणे चांगले.

धनु

उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेत रहा, कारण जेव्हा तुम्ही मेहनतीने काम कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मुलांसाठी आणि शिक्षणासाठी वेळ प्रतिकूल आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. विनाकारण कायदेशीर अडचणीत अडकणे टाळा.

हळदीचा टिळा लावा

मकर

या राशीच्या लोकांना यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. शत्रू तुमचे नुकसान करण्यात यशस्वी होऊ शकतात. जोडीदारासोबतही वाद होऊ शकतात. शत्रूंच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे, कठोर परिश्र्रम करावे लागतील. तुम्ही काही जुन्या मित्रांना भेटाल आणि ते तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतील. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा.

अंध, अपंगांना अन्नदान करा.

कुंभ

आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची तयारी करा, कारण अनेक महिन्यांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील, जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनाही नोकरी मिळण्याची शक्मयता आहे. कुटुंबात शांतता राहील आणि त्यामुळे तुमची प्रगतीही होईल. लांबचा प्रवास होण्याचीही शक्मयता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्हाला उच्चपदस्थ लोकांचा स्नेह मिळेल.

काजळाची डबी जवळ ठेवा.

मीन

कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करा, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळा. लक्षात ठेवा, मित्रांशिवाय यश मिळवणे सोपे नाही, म्हणून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. तुमचे प्रेमसंबंध अडचणी निर्माण करू शकतात. तुमचे कार्ड सांगत आहे की, तुम्ही या आठवड्यात तुमचा खर्च थांबवू शकणार नाही. जे काही काम कराल ते नियोजनपूर्वक करा.

गोमती चक्र जवळ ठेवा

टॅरो उपाय:

भीमसेनी कापराचे अनेक उपयोग आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे नकारात्मकता दूर करणे. ज्या घरामध्ये सतत भांडणे होतात, कायम निगेटिव्ह वातावरण असते अशा घरात  प्रत्येक खोलीत, कोपऱ्यात वरच्या बाजूला  कागदावरती भीमसेनी कापूर ठेवला तर तो आठ ते दहा दिवसात हवेत विरघळतो.   वातावरणाबरोबर  मानसिक  शुद्धीही होते. हा उपाय दर दहा दिवसांनी करावा.

Advertisement
Tags :
×

.