रेपो दरात कपातीची वाढली आशा, 5 पासून आरबीआयची बैठक
वृत्तसंस्था/ मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्प उत्तम सादरीकरण करण्यात आलेला असून आता अनेकांचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे लागलेले आहे. 7 फेब्रुवारी रोजी रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीच्या 6 सदस्यांची बैठक नूतन गर्व्हनर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 फेब्रुवारीपासून तीन दिवस आयोजीत करण्यात आली आहे. पहिल्या दोन दिवसात पतधोरणाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. 7 तारखेला गव्हर्नर रेपो दराबाबत निर्णय जाहीर करतील. सुस्तावलेल्या अर्थविकासाला गती देण्यासाठी रेपो दर कमी केला जातोय का हे पाहावे लागेल. तज्ञांच्या मते याखेपेला 0.25 टक्के इतकी रेपो दरात कपात होऊ शकते. गेल्या 11 सलगच्या पतधोरण समितीच्या बैठकांमध्ये रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला आहे. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 250 बेसीस पॉइंटने रेपो दर वाढवण्यात आला होता. जुलै-सप्टेंबर 2024-25 दरम्यान जीडीपी दर 5.4 टक्के इतका सात तिमाहीतला नीचांकी होता. नूतन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीची पतधोरण समितीची बैठक असणार आहे. पहिल्याच बैठकीत ते कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल.