For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेला ओसाम बिन लादेनचा विसर पडला नसेल, हीच अपेक्षा!

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेला ओसाम बिन लादेनचा विसर पडला नसेल  हीच अपेक्षा
Advertisement

तिरुअनंतपुरम : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांना प्रीतिभोजनासाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी निमंत्रित केल्यावर अमेरिकेला ओसामा बिन लादेन आणि 9/11 च्या हल्ल्याची आठवण करून दिली. पाकिस्तानी सैन्यप्रमुख मुनीर यांना जेवू घालताना अमेरिकेने त्यांना दहशतवाद रोखण्याची ताकीद दिली असेल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमेरिकेत घुसून 2 हजारांहुन अधिक लोकांचा जीव घेतला होता, तो दिवस अमेरिकेने विसरू नये असे थरूर यांनी म्हटले आहे. व्हाइट हाउसमधील जेवण चांगले असेल आणि यादरम्यान मुनीर यांना काही विचार करण्याचा वेळही मिळाला असावा, अशी अपेक्षा आहे. या भेटीत पाकिस्तानला दहशतवाद्यांना न पोसण्याचा आणि शस्त्रास्त्र न पुरविण्याची आठवण अमेरिकेच्या नेत्यानी करून दिली असावी असे थरूर म्हणाले.

Advertisement

ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेत पोहोचलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेच्या खासदारांनी दहशतवाद न फैलावण्याची ताकीद दिली होती. अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरू शकत नाहीत. क्रूरकर्मा ओसामा हा पाकिस्तानी सैन्यतळानजीक सुरक्षित राहत होता. ओसामाला लपविण्याचा पाकिस्तानचा गुन्हा अमेरिका सहजपणे विसरू शकत नाही तसेच माफही करू शकत नाही. पाकिस्तानी जनरलला जेव्हा वाइन दिली गेली असेल तेव्हा या सर्व गोष्टींची आठवण करून दिली गेली असावी. अमेरिकेचे कल्याण यातच असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पाकिस्तानी सैन्यप्रमुखांचा पाहुणचार केला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.