महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे !

05:14 PM Nov 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सह.संस्थेतर्फे ए.आय . आय. ओ वर्कर स्वप्नील सावंत यांचा सन्मान

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित संस्था कलंबिस्त तर्फे कलंबिस्त पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दुग्ध व्यवसायाकडे वळवण्याच्या दृष्टीने गाई म्हशी संगोपन पालन उपक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतन धारक प्राथमिक उपचार ए. आय . आय . ओ वर्कर म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे . स्वप्नील सावंत या तरुणाने गोकुळ व जिल्हा बँक व जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तो एआयओ वर्कर म्हणून कार्यरत झाला आहे . त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमनॲड. संतोष सावंत दुग्ध शेतकरी आनंद बिडये ,सचिव रमेश सावंत आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दिवाळी भेट व बोनस वाटप संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले . दरवर्षी दिवाळी पाडवा दिवशी संस्थेच्या दुग्ध शेतकऱ्यांना दिवाळी भेट व बोनस वाटप करण्यात येतो यंदाच्या वर्षी संस्थेतर्फे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जनावरांची निगा व प्राथमिक उपचार व्हावेत यासाठी गावातीलच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतन धारकचे प्रशिक्षण देऊन गावातच पशुवैद्यकीय प्राथमिक उपचार वर्कर निर्माण करावेत या दृष्टीने गावातील बीकॉम पदवीधारक दुग्ध शेतकरी तरुण स्वप्निल सावंत याला कृत्रिम रेतनधारक ए आय ओ वर्करचे प्रशिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे पूर्ण केले आहे. 35 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करून तो गावात आता पशुवैद्यकीय जनावरांची प्राथमिक उपचार करण्यास सज्ज झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व कोल्हापूर गोकुळ दूध संघ , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , आणि भगीरथ प्रतिष्ठान झाराप तसेच कलंबिस्त दुग्ध संस्था यांच्या वतीने ए आय ओ वर्करचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ए आय ओ वर्कर स्वप्निल बाबाजी सावंत चा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .

सुशिक्षित तरुणांनी आता नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा पशुवैद्यकीय उद्योग उभारून कृषी व पशु उद्योजक व व्यावसायिक बनावे त्यासाठी निश्चित संस्था तुम्हाला प्रोत्साहन देईल. जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर व संचालक महेश सारंग , रवींद्र मडगावकरआदी सर्व संचालक तसेच गोकुळ ची टीम यांनी एआयओ वर्कर साठी सहकार्य केले . त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. असे स्पष्ट केले यावेळी संस्थेचे सचिव रमेश सावंत ,संचालक लक्ष्मण राऊळ ,प्रकाश तावडे, गजानन राऊळ, आनंद बिडये ,लवु राऊळ, शिवाजी राऊळ ,सिद्धेश सावंत स्वप्निल सावंत ,हरिश्चंद्र सावंत ,श्री प्रकाश पवार ,दूध संकलक श्री राजन घाडी ,आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # kalambist #
Next Article