पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; परंतु वृद्धाश्रमात मृत्यू
वाराणसी
काशीतील एका साहित्यिकाची मुलांनीचे केली काशी, अशी काहीही घटना घडली आहे. म्हणजेच वाराणसी येथील साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल (वय ८०) हे पद्मश्री पुरस्कारने सन्मानित असून ही त्यांच्या मृत्यू वृद्धाश्रमात झाला. खंडेलवाल हे प्रसिद्घ साहित्यिक असून त्यांनी शेकडो पुस्तके लिहीली आहेत.
खंडेलवाल हे आध्यत्मिक व्यक्तीही होते. तर आर्थिकदृष्ट्या कोट्याधीश होते. पद्मश्री श्रीनाथ खंडेलवाल यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांच्या माघारी दोन मुले आणि एक मुलगी आहे. यापैकी एक मुल व्यावसायिक आहे तर मुलगी सर्वोच्च न्यायलयात वकील आहे. या सुशिक्षित मुलांनी वडीलांची ८० कोटींची संपत्ती लुबाडली. दरम्याने श्री नाथ यांची प्रकृती अस्थिर झाली, त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. श्रीनाथ यांच्या म्हातारपणी मुलांनी त्यांच्या सांभाळ करणे गरजेचे होते, पण मुलांनी मात्र सांभाळ करण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी काशी येथील कुष्ठरोग वृद्धश्रमात श्रीनाथ यांना सोडले. या वृद्धाश्रमात ते १० महिने राहिले. परंतु पडत्या काळात कुटुंबियांनी ही त्यांची साथ सोडली.
साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांना २०२३ साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजवर ४०० हुन अधिक पुस्तके लिहीली आहेत. श्रीनाथ यांनी लिहिलेल्या ३ हजार पान्यांच्या मस्त्य पुराणची रचना अजूनही चर्चेत आहे. ते ८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांनी मात्र अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. यामागचे कारण सांगण्यासही नकार दिला.