For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीक्षा नाईक विशेष कर्तृत्व पुरस्काराने सन्मानित

05:38 PM Dec 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
दीक्षा नाईक विशेष कर्तृत्व पुरस्काराने सन्मानित
Advertisement

दादर - मुंबई येथे गौड ब्राह्मण सभा वार्षिक स्नेहसंमेलनात पुरस्कार प्रदान

Advertisement

कुडाळ -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी - कुडाळ येथील प्रसिद्ध नृत्यांगणा दिक्षा प्रमोद नाईक हिला नृत्य क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौड ब्राह्मण सभा यांच्यावतीने “विशेष कर्तृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दादर - मुंबई येथे गौड ब्राह्मण सभा वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख मान्यवरांच्या  उपस्थितीत तिला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिक्षा हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.दिक्षा नाईक हिचे मूळ गाव मालवण तालुक्यातील गोळवण येथे असून सध्या ती आपल्या कुटुंबासह पिंगुळी येथे वास्तव्यास आहे. कुडाळ येथील शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी येथे ती नृत्याचे शिक्षण घेत आहे,तर कुडाळ हायस्कूल या प्रशालेत अकरावीत शिकत आहे.वयाच्या 17 व्या वर्षी तिला हा पुरस्कार मिळाला असून नृत्य क्षेत्रासाठी मिळालेला हा तिचा पहिला पुरस्कार आहे.गौड ब्राह्मण सभाअध्यक्ष प्रा.जगदीश वालावलकर ,कार्याध्यक्ष रमेश झारापकर , खजिनदार योगेश खानोलकर ,कार्यवाह महेश राळकर , कै.रा.ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला ट्रस्टचे विकास मोतीरामशेठ देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा सन्मान करण्यात आला. दीक्षाने वयाच्या 6 व्या वर्षांपासन आत्तापर्यंत नृत्य स्पर्धेत प्रथम ,द्वितीय ,तृतीय असे क्रमांक प्राप्त करीत राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा आपल्या कलेची छाप पाडून यशाची झेप घेतली आहे.

Advertisement

अलीकडेच फुलवंती या रील्स वरती केलेल्या नृत्यासाठी दिक्षा हिला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी टॉप 5 मध्ये तिची निवड करून पुणे येथे फुलवंती सिनेमाच्या पहिल्या प्रीमियर साठी दिक्षाला विजेती म्हणून विशेष आमंत्रण दिले होते.तिने कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी, चिपळूण ,सिंधुदुर्ग अशा बऱ्याच ठिकाणी डान्स शो सादर करून रसिकांचे मनोरंजन केले आहे.तसेच ती स्वतः होतकरू मुलांसाठी “डान्स विथ दिक्षा“या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन नृत्यावे मोफत शिक्षण देत आहे.तिच्या या नृत्य क्षेत्रातील उत्तुंग यशामध्ये तिचे आई - वडील, चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा नृत्य मार्गदर्शक रवि कुडाळकर,नातेवाईक आणि योगेश खानोलकर तसेच संपूर्ण गौड ब्राह्मण परिवार यांचा मोलाचा वाटा आहे.

Advertisement
Tags :

.