जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्यावतीने गौरव
बेळगाव : म्हैसूर येथे दसरा महोत्सवानिमित्त दसरा क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात कडोली गावची कन्या स्वाती पाटील दसरा किशोरी व सीएम चषकासह दुहेरी मुकुट पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्यावतीने स्वाती पाटील व प्रशिक्षक स्मिता पाटील यांचा खास गौरव करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरती पैलवान स्वाती पाटील व प्रशिक्षिका स्मिता पाटील यांचे आगमन झाले. स्वाती पाटीलने 49 वजनी गटात दसरा किशोरी हा मानाचा किताब पटकाविला. त्याचप्रमाणे सीएम चषक स्पर्धेतही अजिंक्यपद पटकाविले. तिने केलेल्या या कार्याची दखल घेऊन बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव जोतिबा हुंदरे, शिवाजी पाटील, अभिजित पाटील, मंथन हणमशेट, आनंद स्तावरमठ, विनायक मुतगेकर, दीपक फडके आदी मान्यवरांच्या हस्ते पैलवान स्वाती पाटील व प्रशिक्षिका स्मिता पाटील यांचा खास सत्कार करण्यात आला. सत्कार करून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्वाती पाटीलचे वडील राजू पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.