For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार, प्रसाराचे कार्य कौतुकास्पद

03:57 PM Apr 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गात पतंजली योग समितीचे योगप्रचार  प्रसाराचे कार्य कौतुकास्पद
Advertisement

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्द्गार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले योगप्रचार आणि प्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून पतंजली योग समितीच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. त्यावेळी प्रमोद कामत बोलत होते. यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास उर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे आणि पतंजलीचे कर्मठ कार्यकर्ते रवींद्र वालावलकर आदी उपस्थित होते.यावेळी पतंजली योग समितीने जिल्हाभरात सध्या सुरू असलेल्या सहयोग शिक्षण प्रशिक्षणासह जिल्हाभरातील कार्याची माहिती प्रमोद कामत यांना दिली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.