For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत ऑनर किलिंगची घटना

06:30 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत ऑनर किलिंगची घटना
Advertisement

वडील-भावाकडून 19 वर्षीय तरुणीची हत्या

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या हरी नगर परिसरात 19 वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण ऑनर किलिंग मानून वडील आणि भावाला अटक केली आहे. पोलिसांना पीसीआर कॉल आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एका तरुणीची हत्या झाल्याची आणि तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात असल्याची माहिती कॉलद्वारे प्राप्त होताच पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाला प्रारंभ केला आहे. पोलिसांनी अंत्यविधी थांबवत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक चौकशीत मृत तरुणी गेल्या दोन वर्षांपासून तिच्याच गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होती, ज्याला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता, असे स्पष्ट होत आहे. तिचे वडील मोहम्मद मनीर आणि भाऊ मेराज अली यांनी याच कारणावरून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.