राज्यात हनीट्रॅपचा अॅटमबॉम्ब !
शत्रू राष्ट्रावर मात करायची असल्यास संबंधीत राष्ट्राकडून अनेकदा हनीट्रॅप सारख्या घातक शस्त्राचा वापर केला जातो. मात्र हेच हनीट्रॅपचे मोहजाल राज्याचा रहाटगाडा चालविणाऱ्या राज्य सरकारमधील सरकारी बाबू, आजी-माजी मंत्री तसेच लोकप्रतिनिधींवर आजमावून त्यांनाब्लॅकमेल केले जात असेल तर नक्कीच चिंतेची बाब आहे. सध्या राज्यात याच हनीट्रॅपच्या अॅटमबॉम्बचा बोलबाला सुऊ आहे. राज्याचा रहाटगाडा चालविणाऱ्या राज्य सरकारमधील 72 अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यापासून ते आजी-माजी मंत्री आणि आमदारांचा देखील समावेश असल्याचा अॅटमबॉम्ब नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विरोधकांनी टाकला. मात्र अशा प्रकारचा कोणतीही नो हनी, नो ट्रॅप झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यात तथ्यही असू शकते. कारण राज्याच्या हितासाठी काम करणाऱ्या सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी हनीट्रॅपचा बागुलबुवा देखील केल्याची शक्यता आहे. मात्र त्यातूनही चाणाक्ष असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे याची चाचपणी आणि तपास करण्यास सुऊवात केली आहे. हनीट्रॅप प्रकरणात अनेकदा देशावर देखील यापूर्वी संकटे आली आहेत. यामुळे ताकही फुंकुन पिणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याच्या मुळाशी जाण्याचा घाट घातला आहे. जर यामध्ये कोणी दोषी आढळले तर कर्तव्यदक्ष असलेल्या मुख्यमंत्र्यांशी त्यांचा सामना असणार हे मात्र नक्की. कारण राज्याचा रहाटगाडा या सरकारी बाबू, मंत्री आणि लोकप्रतिनिधीवर असतो. तेच असे वागायला लागले तर सामान्य नागरिकाने विश्वास ठेवायचा कोणावर. यामुळे जोपर्यंत याप्रकरणाच्या मुळाशी स्वत: मुख्यमंत्री जात नाहीत तोपर्यंत राज्यात
हनीट्रॅपचा फुसका अॅटमबॉम्ब टाकण्याचे काम विरोधक करणारच. मुळातच हनीट्रॅपच्या अॅटमबॉम्बची पेरणी झाली ती नाशिक जिह्यातून. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता. नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्याचे सांगितले जाते. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानुसार राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली. या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुऊ आहे. ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आल्या आहेत. या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वऊपांचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक कऊ नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेऊन प्रकरणाचा तपास केला जात आहे. या तक्रारीचा भाग म्हणून ठाणे गुन्हे शाखेने शुक्रवारी नाशिक जिह्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये रेड टाकली. ज्या हॉटेलमधून हनीट्रॅपची सुऊवात झाली. तेथूनच पोलिसांनी तपासाला सुऊवात केली आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी सर्रासपणे हनीट्रॅपचा वापर केला जातो. हे काही पहिल्यांदाच घडले नाही. यापूर्वी देखील हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून देशाची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्रांच्या हाती पोहचल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
यापूर्वी अशा प्रकारचा हनीट्रॅप डीआरडीओ संस्थेत काम करणारा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुऊलकर यांच्यावर झाला होता. एकेकाळी हा शास्त्रज्ञ अतिशय शिस्तप्रिय आणि देशभक्त असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अचानक हा शास्त्रज्ञ देशद्रोही नेमका झाला कसा? हा प्रश्न अनेकांना पडला. तर या ठिकाणी देखील कुऊलकर हे जिहाद-ए-शहद का जालला बळी पडले. कुऊलकर यांचे सोशल मीडियावर अनेक लेख आणि पोस्ट असत. नेमके याच पोस्ट आणि लेख वाचून आपण प्रभावित झाल्याचे मेसेज कुऊलकर यांना येण्यास सुऊवात झाली. हे सर्व मेसेज एका महिलेच्या सोशल मीडियाच्या खात्यावऊन येत होते. प्रथम दुर्लक्ष केल्यानंतर कुऊलकर यांची नस या महिलेच्या लक्षात आली आणि तीने शेवटचा बॉम्ब टाकला. तो म्हणजे मला भारत देशाबद्दल प्रेम वाटते. देशा संदर्भात अशाच प्रकारची पोस्ट आणि लेख पाठवित जा, हे सर्व लेख मी पाकिस्तानात अनेक हिंदू तसेच भारत देशाबद्दल प्रेम असणाऱ्यांना पाठवित जाईन. बस्स आपले कौतुक होत आहे, असे समजताच कुऊलकर यांनी प्रथम या मेसेजला उत्तर दिले. येथूनच सुऊ झाला तो हनीट्रॅपचा खेळ. एकमेकांचे फोन नंबर घेतल्यानंतर हे कॉल कधी व्हिडीओ कॉलवर वळले तेच समजले नाही. तेही अश्लिल व्हिडीओ कॉल सुऊ झाल्यानंतर वासनेच्या भरात कुऊलकर यांनी अतिसंवेदनशील माहिती या ललनेला पुरविण्यास सुऊवात झाली. तर नेमका याचा संशय रॉ. संस्थेला आला. यावेळी त्यांनी तत्काळ डिआरडीओला कळविले. डिआरडीओच्या वरिष्ठांनी कुऊलकर यांचा लॅपटाप जप्त केला. यावेळी त्यांनी अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी ललनेला पुरविल्याचे समोर आले. डिआरडीओने तत्काळ कुऊलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाअंती राज्य एटीएसने त्यांना अटक केली.
अशाच प्रकारचा हनीट्रॅपमध्ये माझगाव डॉकच्या कर्मचारी असलेला कल्पेश बैकर अडकला. त्याने तर माझगाव डॉकमधील सर्व माहिती या तरूणीला देण्यास सुऊवात केली. येथे कोणत्या युद्धनौका बनत आहेत, कोणत्या स्वऊपाच्या पाणबुड्या आहेत. कोणती शस्त्रs बनत आहेत, याची इत्थंभूत माहिती देण्यास सुऊवात केली. युद्धनौका आणि पाणबुड्या यांच्या 25 आरेखनांची माहिती त्याने या तरूणीला दिली होती. मात्र वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. अगदी त्याचप्रमाणे या 72 अधिकारी, माजी मंत्री, लोकप्रतिनिधींनी कोणत्या स्वऊपाची गोपनीय माहिती दिली आहे. तसेच कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर काम केले आहे का? याबाबत आताच काही एक अंदाज बांधता येत नाहीत. सध्या आपण किती साधे असून आपल्यावर अन्याय झाला असल्याची भावना जर या 72 जणांची असेल. तर त्यांनी ते मनातून काढावी. ज्यावेळेस तुम्ही ललनेच्या आहारी जात होता, त्यावेळी तुमची मती गुंग झाली होती की शेण खायला गेली होती.
जर तपासाअंती हे 72 जण दोषी आढळले तर त्यांच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही दया-माया दाखवू नये. यांच्याबाबतीत अशा प्रकारचा निर्णय घ्यावा की पुन्हा कोणता अधिकारी, मंत्री अथवा लोकप्रतिनिधी अशा हनीच काय कोणत्याही ट्रॅपमध्ये अडकला नाही पाहीजे. कारण सध्या हनीट्रॅपचा अॅटमबॉम्ब हा राज्य सरकारवरच नाही तर राज्यातील तमाम जनतेवर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
अमोल राऊत