सत्यघटनांवर आधारित ‘हनीमून से हत्या’
क्राइम डॉक्यूमेंट्री सीरिज
एक नवी क्राइम डॉक्यूमेंट्री सीरिज ‘हनीमून से हत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘हनीमून से हत्या : व्हाय वुमन किल’ ही सीरिज सत्यघटनांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या सीरिजमध्ये पत्नींनी स्वत:च्या पतींची हत्या केल्याच्या सत्य घटनांच्या कहाण्यांना दाखविण्यात आले आहे. ही सीरिज बाहेरून आनंदी दिसणाऱ्या वैवाहिक नात्यामधील काळे सत्य उघड करणारी आहे.
देशातील काही चर्चेत राहिलेल्या प्रकरणांवर ही सीरिज आधारि अताहे. सीरिजमध्ये या घटनांचा सखोल तपास, मुलाखती आणि सीन रिक्रिएशन दाखविण्यात येणार आहे. याचे एकूण 5 एपिसोड्स आहेत. यात मेघालयातील सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण (हनीमूनदरम्यान हत्या), मेरठ येथील निळ्या रंगाच्या ड्रमचे प्रकरण (पत्नी मुस्कानने पती सौरभची हत्या करून मृतदेह ड्रममदेय सिमेंटने भरला होता), भिवंडीतल इन्फ्लुएंसर प्रकरण (युट्यूबर रविनाने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली), मुंबईच्या नालासोपऱ्यातील टाइल्स प्रकरण (पत्नीने पतीची हत्या करत मृतदेह घराच्या टाइल्सखाली दफन केला), दिल्लीतील विजेचा झटका प्रकरण (पत्नीने झोपेच्या गोळ्या देत वीजेद्वारे पतीची हत्या केली) दाखविले जाणार आहे.
ही सीरिज झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ही सीरिज वैवाहिक जीवनाचा दबाव, नात्यांमधील भेगा आणि घरातील मौन संघर्ष दाखविणारी आहे.